क्रीडा आरक्षण

शासकीय ५% आरक्षण खेळ कोणते?

2 उत्तरे
2 answers

शासकीय ५% आरक्षण खेळ कोणते?

3
5% आरक्षण कोणत्या खेळांना व त्यासाठीची नियमावली.)*
*( 5% आरक्षण कोणत्या खेळांना व त्यासाठीची नियमावली.)*

      शासनाने 10 Oct 2017 रोजी 5% आरक्षणाबाबत नव्याने शुद्धीपत्रक जारी करून कनिष्ठ गटातील खेळाडूंना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या 5 % आरक्षणात कोणते खेळ येतात व कोणती सर्टीफिकेट 5 % आरक्षणासाठी ग्राह्य धरतात या विषयीचा लेखाजोखा आपणा समोर मांडत आहे.5 % आरक्षणाच्या नावाखाली चाललेला सर्टीफिकेटचा गोरखधंदा बंद व्हावा , ही अपेक्षा.

       5 % आरक्षण मिळाविण्यासाठी आवश्यक असणारी क्रीडा अहर्ता

*अ गट*

         1) अधिकृत आंतरराष्ट्रीय वरीष्ठ गट क्रीडा स्पर्धा 2) पॅरा ऑलंपिक क्रीडा स्पर्धा 3) जागतिक आंतरविदयापीठ क्रीडा स्पर्धा 4) जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा 5) ग्रँडमास्टर किताब -- या स्पर्धात प्राविण्य प्राप्त करणे  किंवा ऑलंपिक स्पर्धेत सहभाग  आवश्यक आहे.

*ब गट*

1) कनिष्ठ गटातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2) वरीष्ठ गट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 3) कनिष्ठ गट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 4) पॅरा ऑलंपिक राष्ट्रीय स्पर्धा 5) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 6) राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडास्पर्धा 7) अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा 8) आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा -- *या स्पर्धेेत प्राविण्य मिळविणे किंवा मास्टर स्पर्धेेत आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविणे आवश्यक .

*क गट*

1) राज्यस्तर वरीष्ठ गट क्रीडा स्पर्धा 2) राज्यस्तर कनिष्ठ गट क्रीडा स्पर्धा 3) राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा 4) ग्रामीण व महिला राज्य स्पर्धा 5) राज्यस्तर आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा ( अश्वमेध ) 6) राज्य आदिवासी क्रीडा स्पर्धा  7) राज्य पॅरा ऑलंपिक स्पर्धा 8) राज्यस्तर अपंग क्रीडा स्पर्धा --- या स्पर्धेेत प्राविण्य संपादन करणे आवश्यक आहे.

*ड गट*

1) राष्ट्रीय वरीष्ठ गट क्रीडा स्पर्धा 2) पॅरा ऑलंपिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा --- या स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक.

( अ गट, ब गट, क गट व ड गट असे चार गट असून त्यास आपण Class - 1, Class - 2, Class - 3, Class - 4 म्हणतो.)

*कोणत्या खेळांना 5% आरक्षण मिळणार*

महाराष्ट्र ऑलंपिक असो. च्या ५/४/२०१७ च्या पत्रान्वये खालील खेळ 5 % आरक्षणास पात्र आहेत.

*1) सेपक टाकरा 2)अॅथलेटिक्स 3)जलतरण 4)बॅडमिंटन 5)बास्केटबॉल 6)बॉक्सींग 7)सायकलिंग 8)फुटबॉल 9)जिम्नॅस्टिक 10)हँडबॉल 11)हॉकी 12)जुडो 13)कबड्डी 14)खो खो 15)लॉन टेनिस 16)रायफल शुटींग17)योगा 18)रोईंग 19)टेबल टेनिस 20)ट्रायथलॉन 21)तायक्वांदो 22)व्हॉलीबॉल 23)वेटलिफ्टींग 24)कुस्ती 25)कनॉईंग व कयाकिंग 26)तलवारबाजी 27)वुशू 28)पेंटॅथलॉन 29)आट्यापाटया 30)बॉल बॅडमिंटन 31)बॉडी बिल्डींग 32)कॅरम 33)मल्लखांब 34)नेटबॉल 35)रोलबॉल 36)रग्बी 37) आर्चरी 38)सॉफ्टबॉल 39)सॉफ्ट टेनिस 40)स्क्वॅश 41)रिंग टेनिस 42)रस्सीखेच 43)इक्वेस्टेरीअन( हॉर्स रायडिंग) 44)कराटे 45) स्केटिंग 46)थ्रोबॉल*

     या शिवाय 27 मार्चच्या शासन निर्णयानुसार ज्या खेळाच्या नोंदणीकृत राज्य संघटना त्यांच्या राष्ट्रीय संयटनेशी सलग्न असतील, तसेच खेळांच्या राष्ट्रीय संघटनेला इंडिअन ऑलंपिक असोशिएशनने सलग्नता दिलेली असल्यास , अशा राज्य संघानेच्या स्पधेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना आरक्षणा या लाभ मिळेल. त्या साठी संबंधीत संघटनेला महाराष्ट्र ऑलंपिक असोशिएशनची सलग्नता हा निकष अनिवार्य असणार नाही.

*आरक्षण मिळण्यासाठी अटी व शर्ती*

*अ*)

1) अ व ब गटातील स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीशी सलग्न असणाऱ्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनने अथवा इंडियन  ऑलंपिक असो.ने आयोजित केलेल्या असाव्यात. आमंत्रित स्वरूपाच्या स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना आरक्षणाचा लाभ मिळत नाही .

2) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन भारतीय ऑलंपिक समितीशी सलग्न असणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन अथवा संघटनेने केलेले असावे.

3) राज्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र ऑलंपिक असोशिएशनशी सलग्न खेळाच्या राज्य संघटनेने केलेले असावे.

4) १७ मार्चच्या २०१७ च्या शासन निर्णयानुसार *महाराष्ट्र ऑलंपिकची मान्यता नसेल पण त्या खेळाच्या संघटनेला भारतीय ऑलंपिक संघटनेची सलग्नता असेल अशा खेळाच्या संघटनेद्वारा आयोजित राज्य अजिंक्यपद स्पर्धा.*

*आ*)

1) जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धा या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पोर्टस् बोर्ड द्वारा आयोजित केलेल्या असाव्यात.

2) अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा या भारतीय विद्यापीठ कीडा बोर्डामार्फत आयोजित केलेल्या असाव्यात.

3) राज्यस्तर आंतरविदयापीठ ( अश्वमेध) स्पर्धांचे आयोजन संबंधित विद्यापीठाने केलेले असावे.

*इ*)

1) पॅरा ऑलंपिक स्पर्धा या पॅरा ऑलंपिक समितीने किंवा सलग्न असणाऱ्या संघटनेने आयोजित केलेल्या असाव्यात.

*ई*)

1) शालेय स्पर्धांचे आयोजन हे आंतरराष्ट्रीय शालेय महासंघ, भारतीय शालेय महासंघ किंवा क्रीडा व युवक सेवा संचलनालया मार्फत केलेले असावे.

*उ*)

1) आदिवासी क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदिवासी विकास विभागामार्फत केलेले असावे.

*ऊ*)

1) आंतरराष्ट्रीय स्पर्धात किमान १२ खेळाडू किंवा १२ संघांचा समावेश असावा.

2) राष्ट्रीय व राज्य अजिंक्यपद स्पर्धत किमान ६० %  राज्ये/जिल्हे सहभागी होणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 20/2/2020
कर्म · 3860
0

शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी ५% आरक्षण खालील खेळांमध्ये लागू आहे:

  • ऑलिम्पिक खेळ: ॲथलेटिक्स, जलतरण, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, तीरंदाजी, सायकलिंग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, लॉन टेनिस,rowing, sailing, shooting, triathlon, volleyball, taekwondo.
  • आशियाई खेळ: कबड्डी, खो-खो, मल्लखांब,speedball, वुशू, सेपक टकरा.
  • राष्ट्रकुल खेळ: यात समाविष्ट खेळ.
  • अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा
  • शालेय क्रीडा स्पर्धा
  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

खेळाडू आरक्षणासंबंधी अधिक माहितीसाठी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वेबसाइटला भेट द्या.

टीप: खेळाडू आरक्षणाचे नियम आणि पात्रता निकष वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नवीनतम माहिती तपासा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2840

Related Questions

तुम्हाला माहित असलेल्या धावपटूंची नावे लिहा. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत?
तुमच्या शाळेतील खो-खो खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.?
खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कोठे आयोजित केले होते?
विटीचे माप किती असते?
ग्रामीण खेळ कोणते त्यांची नावे लिहून थोडक्यात माहिती लिहा?
जागतिक पत्त्यातील चार हुकुमती प्रकार कोणते?
क्रिकेट या खेळाला मराठी मध्ये काय म्हणतात?