2 उत्तरे
2
answers
सनदी अधिकारी म्हणजे काय?
6
Answer link
सनद या शब्दाचा समानार्थी शब्द अधिकार, सत्ता असा होतो. ज्या व्यक्तीला विशेष अधिकार देऊन एखाद्या पदाचा कारभार दिला जातो त्याला सनदी अधिकारी म्हणतात.
विशेषतः सनदी अधिकारी हा शब्द एखाद्या कामासाठी नेमून दिलेल्या पदासाठी वापरतात. जसे की तहसीलदार, जिल्हाधिकारी, दुय्यम निबंधक हे सर्व काही ठराविक अधिकार (सनद) घेऊन आपल्या पदावर काम करत असतात, म्हणून त्यांना सनदी अधिकारी म्हणतात.
जुन्या बखरींमध्येही सनद या शब्दाचा उल्लेख आढळतो. जसे की एखादा राजा आपल्या दरबारातील एखाद्या व्यक्तीला विशेष अधिकार (सनद) देऊन दुसऱ्या राजाकडे पाठवत असे.
0
Answer link
सनदी अधिकारी म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झालेले अधिकारी. हे अधिकारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाच्या पदांवर काम करतात.
सनदी अधिकाऱ्यांची काही प्रमुख कार्ये:
- धोरणे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
- कायदा व सुव्यवस्था राखणे.
- विकास योजनांचे व्यवस्थापन करणे.
- सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे.
सनदी अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित केलेल्या नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: