2 उत्तरे
2 answers

चॉकलेट डे कधी असतो?

3
 चॉकलेटचा ‘गोड’ दिवस!   ⭕*_

             *_🍬चॉकलेट खाणे कुणाला आवडत नाही? काही अपवाद वगळता सर्वच आबालवृद्धांना चॉकलेट बार मिटक्या मारत खाणे आवडते. लहानांना त्याची जीभेवर रेंगाळणारी गोड चव आवडते तर प्रौढांना त्यामधील अँटिऑक्सिडंटस् आरोग्यदायी ठरू शकतात. शनिवारी ‘चॉकलेट डे’ आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस ‘चॉकलेट डे’ म्हणून साजरा होतो!_*

*कॉफी म्हणजे जशी विशिष्ट बियांची पूड असते, तसेच चॉकलेट हे कोकोआ फळाच्या बियांपासून बनवले जाते. ही कोकोआ झाडे प्रामुख्याने पश्‍चिम आफ्रिकेत आढळतात व आजही चॉकलेटचा मोठा स्रोत तिथेच आहे. इसवी सनापूर्वी 1900 या काळापासूनचे मानवी आहारातील चॉकलेटचे पुरावे मिळालेले आहेत.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* याचा अर्थ किमान तीन हजार वर्षांपासून तरी माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चॉकलेटचे सेवन करीत आहे. याबाबत सुरुवातीचे पुरावे मेक्सिकोत मिळालेले आहेत. माया आणि अ‍ॅझटेक संस्कृतीमधील लोक चॉकलेटचे सेवन करीत असत. चॉकलेट ज्या कोकोआ फळाच्या बियांपासून बनवले जाते त्या बियांची मूळ चव अतिशय कडवट असते. अशा बिया वाळवून, स्वच्छ करून आणि भाजून नंतर काही प्रक्रिया करून त्यापासून चॉकलेट बनवले जाते. आपण जे चॉकलेट खातो त्यामध्ये लोणी, वनस्पतीजन्य तेल आणि साखरही असते. सध्या अनेक रूपांमध्ये चॉकलेट पाहायला मिळते. जगभरात चॉकलेटच्या व्यवसायात वर्षाला 50 अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते!

0

चॉकलेट डे दरवर्षी ९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

हा दिवस व्हॅलेंटाईन वीकचा भाग आहे, जो 7 फेब्रुवारीला सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो.

या दिवशी लोक एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.

स्रोत:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

चॉकलेट डे कब मनाया जाता है?