अलंकार खनिज रत्नशास्त्र

रत्नांची ओळख याबद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

रत्नांची ओळख याबद्दल माहिती द्या?

5
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

      *चौ-याऐंशी रत्नांचा संक्षिप्त परिचय*
____________________________
*१. माणिक*– याला माणिक्य असेही म्हणतात. काही माणिक हे लाल रंगाचे तर काही माणिक गुलाबी रंगाचे, आकाशी, शामल रंगाचे असतात.
*२. मोती* – मोती हे जलजन्य रत्न आहे. पाण्यातील प्राण्यापासून तयार होते. म्हणून प्राणीजन्य पांढरे पिवळे, लाल, काळ्या रंगाचे मोती सापडतात.
*३. प्रवाळ* – याला पोवळे असेही म्हणतात. हेही जलजन्य रत्न आहे. प्रवाळ लाल, शेंदरी सफेद इत्यादी रंगात सापडतो.
*४. पाचू* – पाचू या रत्नांचा रंग हिरवा असतो. हे खनिजजन्य आहे. इतर रत्नांपेक्षा हे ठिसूळ आहे.
*५. पुष्कराज* – अतिशय लोकप्रिय खनिजरत्न आङे. याला पुष्कराज असेही म्हणतात.
*६. हिरा* – अतिशय मौल्यवान रत्न, पांढ-या रंगाचे असते. तसेच पिवळ्या, काळ्या लाल, गुलाबी रंगामध्येही सापडते.
*७. नीलम* - याला नीलमणी असही म्हणतात. निळ्या रंगाचे किंवा मोराच्या मानेच्या निळ्या रंगासारखे दिसते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=666769717054288&id=100011637976439
*८. गोमेद*– या रत्नाला गोमेदक असेही म्हणतात. याचा रंग गायीच्या गोमुत्रासारखा किंवा मधासारखा असतो.
*९. वैडूर्य* – याला सुत्रमणी, लसण्या असे म्हणतात. मांजरीच्या डोळ्यासारखे हे रत्न दिसते. त्याच्या पृष्टभागावर १ ते ३ सफेद रेषा असतात. त्यांना तेजाचे पट्टे असे म्हणतात.
*१०. लालडी* – हे माणिक परीवारातील रत्न असून याचा रंग गुलाबाच्या रंगासारखा असतो. हे माणिकाचे उपरत्न होय. याला स्पायनल असे म्हणतात.
*११. फिरोजा* – हे रत्न आकाशी रंगाचे असून अपारदर्शक असते. हे अल्पमोली रत्न आहे.
*१२. तुरमली* – हे रत्न सर्व रंगामध्ये सापडते. याचा स्पर्श मुलायम असून हे ठिसूळ रत्न आहे.
*१३. ओपल* – याला उपल असेही म्हणतात. सर्वात सुंदर व देखणे असे हे रत्न आहे. या रत्नावर इंद्रधनुष्याचे रंग बघावयास मिळतात. मराठी सागरराज
*१४. पेरीडॉट* – भारतीय लोक जबरजद्द, घृतमणी या नावाने ओळखतात. स्फटिकाप्रमाणे हे रत्न पारदर्शक असून अल्पमोली रत्न आहे.
*१५. गौंदता* – हे रत्न गाईच्या दातासारखे असून सफेद रंगात पिवळसर झाक असते. या रत्नावर उभ्या आडव्या रेषाही असतात.
*१६. सितारा* – हे रत्न भगव्या रंगाचे असून त्यावर सोनेरी रंगांचे ठिपके असतात.
*१७. रौमनी* – हे गडद लाल रंगाचे रत्न असून थोडा काळसर रंग दृष्यमान होत असतो.
*१८. नरम* – रौमनीप्रमाणेच लाल रंगाचे असून काळ्या रंगाची झाक दिसून येते. रोमनी हे रत्न जड असून नरम हे रत्न वजनाला हलके असते. परंतु रौमनीपेक्षा चांगले दिसते
*१९. सुलेमानी* – शामल रंगाचे, काही रत्ने काळ्या रंगाची असून त्यांच्यावर उभ्या पांढ-या रेषा दिसतात.
*२०. जजेमानी* – हे सुलेमानी रत्नांच्या जातीतले असून याचा रंग धुसर पांढरा असतो. यावर गडद सफेद रंगाच्या रेषा असतात.
*२१. आबरी* – हे काळ्या रंगाचे खनिज असून अल्पपारदर्शक आहे.
*२२. हजरते उद* – हे काळ्या रंगाचे रत्न असून यापासून नेत्रविकारावर औषध तयार करतात.
*२३. पनधन* – हे काळ्या रंगाचे रत्न असून यात किंचित हिरवा रंग असतो.
*२४. डूर/कूर* – हे कथिलाच्या रंगाचे रत्न असून यापासून वनऔषधी व भस्म कुटण्याकरीता लागणारा खलबत्ता तयार करतात.
*२५. पाराजहर* – हे पांढ-या रंगाचे रत्न असून हे रत्न जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.
*२६. चित्ती / चित्रि* – हे रत्न काळ्या रंगाचे असते व त्यावर सोनेरी रंगांची रेषा असते.
*२७. हालन/हालत* – हे गुलाबी रंगाचे रत्न आहे. हे रत्न हालविल्यात त्यातील रंग हालताना दिसतो.
*२८. खात* – या रत्नातील काही प्रकार लाल तर काही प्रकार निळया रंगाचे असतात. उष्णतेच्या विकारावर औषधी म्हणून उपोयोगी आहे.
*२९. सोहन मक्खी/मकवी* – याचा रंग पाढं-या रेतीसारखा असून हे रत्न अपारदर्शक आहे याचा उपयोग मुत्रविकारावर औषधी म्हणून केला जातो.
*३०. पारसमणी* – लोखंड्याचे सोन्यात रुपांतर करणारे हे रत्न. अतिदुर्लभ याला परीस असेही म्हटले जाते.
*३१. जहरमोहरा* – पांढ-या रंगात हिरवी किंवा हिरव्या रंगात पांढरी झाक या रत्नात असते. या रत्नांच्या पेल्यात विष जरी टाकले तरी विषारीपणा नाहीसा होतो.
*३२. मकनातीस* – सफेद किंवा किंचित काळ्या रंगाचे हे रत्न असून गारगोटीसारखे दिसते. अग्नी प्रदीप्त करण्यास उपयुक्त.
*३३. मरगज* – हे रत्न हिरव्या रंगांचे असते. परंतु चमक दिसत नाही.
*३४. दर्वेनज्फ/दुवैनजफ* – हे रत्न तांदळाच्या रंगाचे असून पोटविकारावर उपयुक्त आहे.
*३५. तुरसावा* – हे रत्न गुलाबी हिरव्या रंगाचे असून नाजुक व ठिसूळ असते.
*३६. सुरमा* – हे काळ्या रंगाचे खनिजरत्न आहे. यापासून डोळ्यात घालण्यासाठी सुरमा बनवितात.
*३७. लिलियर* – हा काळ्या रंगाचा रत्न दगड असून यापासून शोभेच्या वस्तू बनवितात.
*३८. खारा* – या रत्नाच्या काळ्या रंगात हिरवी झाक दिसून येते. हे रत्न पिण्याच्या पाण्यात टाकल्यास अपचनाचे विकार दर होतात.
*३९. हकिक-कल-बहार* – केशरी, पांढरा, हिरवा लाल. पारदर्शी पांढरा, पिवळा, काळसर, इ. रंगात हकिक सापडतात. हे दगडरत्न नदीकाठी सापडतात. मुसलमान फकिर या रत्नाच्या माळा वापरतात.
*४०. मुबेनज्फ* – पांढ-या रंगाचे हे रत्न असून यात केसासारख्या बारीक रेषा आढळतात.
*४१. कहरूवा* – हे लाल रंगाचे रत्न असून मुलसमान व फकिर हे रत्न फक्त जपमाळेसाठी वापरतात.
*४२. संगबसरी/संगबदरी* – हे काळ्या रंगाचे असून यापासून सुरमा तयार केला जातो.
*४३. गौरी* – हे रत्न सर्व संगामध्ये आढळत असून यात पांढ-या रंगाच्या रेषा दिसतात. यापासून खेळणी तयार करतात.
*४४. सीमाक* – हे रत्न लाल पिवळ्या रंगाचे असून त्यावर गुलाबी रंगाचे ठिपके असतात. यापासून वनौषधी व रत्नभस्म कुटण्यकरीता लागणारा खलबत्ता बनवितात.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट
*४५. सीरखडी* – हे रत्न काळ्या रंगाचे असून यापासून खेळणी बनवितात.
*४६. अमलिया/अमोलिया* – काळ्या रंगाचे हे रत्न असून हे मुर्ती बनविण्यसाठी वापरतात.
*४७. मूसा* – काळ्या रंगाचे असून खेळणी, खलबत्ता प्याले तयार करण्यासाठी वापरतात. हे गंगा नदीच्या उपनद्याच्या पात्रात सापडते.
*४८. कुदरत* – काळ्या रंगाचे असून पांढ-या रंगाचे डाग असतात. हे रत्न वापरल्यास भाग्योदय लवकर होतो.
*४९. संगसन* – याचा आकार ल रंग द्राक्षासारखा असतो. काही रत्ने पांढ-या रंगाची असतात. औषधी म्हणून याचा वापर होतो.
*५०. दाना फिरंग* – या रत्नाचा आकार व रंग पिस्त्याप्रमाणे असतो.
*५१. कसोटी* – हे रत्न काळ्या रंगाचे असून याचा उपयोग सोन्याची परीक्षा करण्याकरीता होतो.
*५२. सिजरी* – हे पांढ-या रंगाचे रत्न असून यात काळसर रंगाची झाडाची प्रतिमा दिसते.
*५३. मकडा* – या रत्नात कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे चित्र दिसते. याचा रंग काळा असतो.
*५४. हरीद* – काळ्या रंगाचे हे आकारमानापेक्षा जड असते. याची जपमाळ बनवितात.
*५५. हवास / हास* – हे रत्न सोनेरी किंवा हिरव्या रंगाचे असून औषधात याचा उपयोग करतात.
*५६. माखर* – लाल किंवा पांढ-या रंगाचे गंडमाळेच्या विकारावर औषध म्हणून याचा उपयोग करतात.
*५७. सुनेहल्ला* – पिवळसर सोनेरी रंगाचे हे रत्न त्याच्या आकारमानापेक्षा बरेच हलके असते.
*५८. निलि* – हे रत्न निलमच्या जातीतील असून निळ्या रंगाचे पण ठिसूळ असते.
*५९. बेरूंज* – पाचूच्या जातीतील हे रत्न असून हिरवा रंग फिकट असतो.
*६०. आलेमानी* – सुलेमानी रत्नाचाच हे एक रत्न मानले जातात. भुरकट रंगाचे असून त्यावर सफेद रेषा असतात.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=666769717054288&id=100011637976439
*६१. सावोर* – फिकट हिरव्या रंगाचे असून त्यावर भुरकट रंगाच्या रेषा दिसतात.
*६२. अहवा* – गुलाबी रंगाचे रत्न असून पांढ-या रंगाचे रत्न ठिपके असतात.
*६३. लारू / लाख* – माखर जातीतील रत्न
*६४. सिंया* – सर्व रंगात सापडत असून यापासून मुर्ती बनवितात.
*६५. सिंगली* – हे रत्न माणिकाच्या जातीतील अशून याचा रंग लालसर काळा असतो.
*६६. ढेडी* – हे रत्न काळ्या रंगाचे असून यापासून शोभेच्या वस्तू, खेळणी प्याले, खलबत्ते तयार करतात. लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून याचा उपयोग ताईतात करतात.
*६७. सिफरी* – आकाशी रंगाचे रत्न असून याचा उपयोग औषधासाठी केला जातो.
*६८. संगिया* – हे रत्न शंखाच्या रंगाचे असून शोभेच्या वस्तू व लॉकेटसाठी याचा वापर करतात.
*६९. गुदडी* – हे रत्न सर्व रंगात सापडते. याचा उपयोग मुसलमान लोक जपमाळेसाठी करतात.
*७०. कामला* – हे हिरव्या रंगाचे असून मुसलमान लोक वापरतात.
*७१. दातला* – हे रत्न हस्तीदंतासारखे असते.
*७२. बसरी* – हे रत्न काळसर रंगाचे असून यापासून सुरमा तयार करतात.
*७३. झना* – हे मंळकट रंगाचे असून यावर पाण्याचा थेंब टाकला तर तो स्थिर रहात नाही.
*७४. दारचना* – हे पिवळ्या रंगाचे असून याचा आकार हरभरा डाळीसारखा असून याचा उपयोग औषधात केला जातो.
*७५. लाजवर्त* – हे निलमचे एक प्राचीन उपरत्न आहे. निळ्या रंगाचे ठिसूळ रत्न आहे. याला सफायर असेही म्हणतात.
*७६. वासी* – फिकट हिरव्या रंगाचे रत्न.
*७७. पित्तोनिया* – याचा मुळ रंग हिरवा असून त्यात लाल रंगाच्या छटा दिसतात. याला ब्लड स्टोन असे म्हणतात.
*७८. धुनेला* – भुरकट रंगाचे असून त्यावर सोनेरी ठिपके असतात.
*७९. सिंदुरिया* – भुरकट गुलाबी रंगाचे रत्न असून औषधी म्हणून उपयोग केला जातो.
*८०. लुधया* – लाल रंगाचे अल्पमोली रत्न.
*८१. मरियम* – पांढ-या रंगाचे रत्न असून पैलू पाडल्यावर सुंदर दिसते.
*८२. फिकट* – बिल्लोरी रत्नातील एक जात पांढ-या व पिवळ्या रंगाचे हे अपारदर्शक व अल्पमोली असते.
*८३. कटेला* – याचा रंग आकाशी किंवा निळसर असून उपरत्नांमध्ये सर्वात सुंदर रत्न.
*८४. तामडा* – मुळ काळ्या रंगात लालसर रंगाची झाक असते. याला गार्नेट असेही म्हणतात.
*दत्तराज साने.*
*गजानन  जेम्स ठाणे*
*९८७०३८४५८१*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
0

रत्नांची ओळख:

रत्ने ही मौल्यवान खनिजे आहेत, जी त्यांच्या दुर्मिळता, सौंदर्य आणि टिकाऊपणामुळे ओळखली जातात. रत्नांचा उपयोग दागिने आणि इतर अलंकारांमध्ये केला जातो. त्यांची ओळख खालीलप्रमाणे करता येते:

  1. रंगावरून ओळख: रंगावरून रत्ने ओळखणे हा एक महत्त्वाचा भाग आहे.
    • माणिक लाल रंगाचा असतो.
    • पाचू हिरव्या रंगाचा असतो.
    • पुखराज पिवळ्या रंगाचा असतो.
    • नीलमणी निळ्या रंगाचा असतो.
  2. चमक (Luster): रत्नांच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या गुणधर्माला 'चमक' म्हणतात. हिऱ्यामध्ये 'अ‍ॅडमेंटाईन' चमक असते, जी खूप तेजस्वी असते.
  3. कठोरता (Hardness): रत्‍नांची कठोरता मोजण्यासाठी मोह स्केल (Mohs scale) वापरला जातो. या स्केलनुसार, हिरा सर्वात कठोर (10) आणि टाल्क (Talc) सर्वात मऊ (1) असतो.
  4. वजन: रत्‍नांचे वजन कॅरेटमध्ये मोजले जाते. एक कॅरेट म्हणजे 200 मिलीग्राम.
  5. पारदर्शकता: रत्‍ने किती पारदर्शक आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे. रत्‍ने पारदर्शक, अर्ध-पारदर्शक किंवा अपारदर्शक असू शकतात.
  6. आकार आणि कट: रत्‍नांना योग्य आकार देणे आणि त्याला पैलू पाडणे महत्त्वाचे आहे. हिऱ्याला उत्तम चमक येण्यासाठी विशिष्ट कोनात कापणे आवश्यक असते.

इतर गुणधर्म:

  • विशिष्ट गुरुत्व (Specific Gravity): रत्‍नाचे वजन आणि त्याच आकारमानाच्या पाण्याच्या वजनाचे गुणोत्तर म्हणजे विशिष्ट गुरुत्व.
  • अपवर्तनांक (Refractive Index): रत्‍नामधून प्रकाश किती वेगाने जातो हे अपवर्तनांक दर्शवतो.

रत्नांची खरेदी करताना, ते प्रमाणित आहेत का हे तपासणे आवश्यक आहे. अनेक प्रयोगशाळा रत्नांना प्रमाणित करतात, जसे की Gemological Institute of America (GIA).

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. रत्नांबद्दल अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3000

Related Questions

नैसर्गिक क्रिस्टल म्हणजे काय?
खनिजांचे उपयोग लिहा?
रत्न खरे आहे की नाही हे कसे चेक करायचे?
24 टन म्हणजे किती ब्रास वाळू?
कॅसिटराइट धातूकाचे संहतीकरण करताना चुंबकीकरण पद्धत का वापरतात?
भारतातील खनिजांचे साधनसामग्री असलेली राज्ये कोणती आहेत?
दिग्बोई येथील खनिजतेल विहिरीची माहिती मिळेल का?