फरक भौतिकशास्त्र विज्ञान

वेळ व काळ यातील फरक कसा करावा?

2 उत्तरे
2 answers

वेळ व काळ यातील फरक कसा करावा?

3
काळ म्हणजे तुमचे अभ्यासाचे वय व तुमच्यापुढील उपलब्ध संधी, तर वेळ म्हणजे तो काळ वापरून घ्यायची संधी. काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही.

काळ आणि वेळ

प्रत्येकाकडे वेळेचा एक विशिष्ट कोटा असतो. त्याचा योग्य वापर करता येणे हे एक ‘वेळ कौशल्य’ (time skill)आहे. आइनस्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडला होता. त्यानुसार वेळ ही एक सापेक्ष कल्पना आहे. वेळेचा सदुपयोग कसा होणार ते योग्य व्यूहरचना, अभ्यास कौशल्ये, इच्छाशक्ती व आरोग्य या सर्वांवर अवलंबून आहे. काळ म्हणजे तुमचे अभ्यासाचे वय व तुमच्यापुढील उपलब्ध संधी, तर वेळ म्हणजे तो काळ वापरून घ्यायची संधी. काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही.

वेळेचे भावचक्र

कधी प्रसन्न वाटते तर कधी निराश. कधी विचारांनी मन गजबजून जाते तर कधी मन निर्विकार होते. कधी वेळ कसा निघून गेला हे कळत नाही तर कधी वेळ जाता जात नाही. वेळेचे हे भावचक्र असे खाली वर होत असते. वेळ चुकली तर काय होते याचे उदाहरण म्हणजे नेपोलिअन. तो पाच मिनिटे रणांगणात उशिरा पोहोचला आणि घात झाला. त्याने पुढे कारावासातून लिहिले आहे, की वेळ वाया घालवला आणि वेळेने मला दगा दिला.

स्पर्धा परीक्षा या स्थूलरूपाने (संपूर्ण परीक्षेचे व्यवस्थापन) व सूक्ष्म रूपाने (परीक्षेच्या कालावधीचे व्यवस्थापन) या दोन्ही प्रकारे वेळेच्या व्यवस्थापनाचा खेळ आहे.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग

आठवड्यातील सहा दिवसांचेच वेळापत्रक करा. एक दिवस मोकळा ठेवा. अभ्यासाचे वेळापत्रक चुकत गेले असेल तर या दिवसात ते ट्रॅकवर आणता येईल. पूर्ण वर्षाचे, महिन्याचे व आठवड्याचे असे वेळापत्रक बनवून त्यानुसार अंमलबजावणी करता आली तर उत्तम. वेळापत्रक आवाक्यातील असावे. कोणाकडूनही रेडीमेड वेळापत्रक बनवून घेऊ नका. आपल्या अभ्यासानुसार आपले वेळापत्रक बनवा. प्रत्येक अभ्यासघटकाला समान वेळ देणे भोंगळपणा ठरेल. एखाद्या घटकाला जास्त वेळ लागू शकतो, दुसरा एखादा घटक लवकर पूर्ण होऊ शकेल.

वेळेचे सूक्ष्म नियोजन

साधारणपणे एक तास सलग अभ्यास करणे फायदेशीर असते. त्यानंतर मात्र छोटा ब्रेक घेणे चांगले. थोडे फिरून आले किंवा दैनंदिन जीवन, निसर्ग यांचे निरीक्षण केले तर ताजेतवाने वाटते. स्वतःबरोबर थोड्या नोट्स घेऊन नेहमी फिरावे. म्हणजे रिकामा वेळ मिळाला तर त्याचा वापर करून घेता येतो. प्रवासात अभ्यास करून यश मिळवणाऱ्या उमेदवारांची मोठी यादी देता येईल. ते प्रवास त्यांना यशाकडे घेऊन गेले. आरिफ शेख हा विद्यार्थी (आता IPS) दोन तासिकांमधील जी काही पाच-दहा मिनिटे मिळतात, त्यातही काहीना काही वाचून काढे. श्रीकर परदेशी तयारी करीत असताना ते बाथरूममध्ये असतानाही घरचे त्यांना बाहेरून अभ्यासाची पाने वाचून दाखवीत. अशाप्रकारे प्रत्येक यशस्वी उमेदवाराने काहीना काही वेगळेपण दाखवले आहे.

वेळ कसा वाया जातो?

१) मोबाइलला रेंज नसल्यास दर दोन मिनिटांनी तो बघत बसणे. (हे सारखे मोबाइल बघण्याचे प्रकरण आता काहींच्या बाबतीत मानसिक विकार या पातळीवर पोहचले आहे.) २) मित्र मैत्रिणींना एखादा विषय शिकवित राहणे. (मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन ही भावना)

३) नातेवाईकांचे सण, समारंभ साजरे करणे. (आता IPS म्हणून काम करणारे रवींद्र शिसवे हे अभ्यास करताना घरचे लोक त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावून घेत. म्हणजे मग कोणी आले-गेले तरी फरक पडत नसे.)

४) सार्वजनिक कामांमध्ये, सणांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

५) सर्व यशस्वी उमेदवार/अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारणे.

६) नको असलेली पुस्तके, नोटस यांच्या फोटोप्रती काढून आणणे.

झोपी गेलेला जागा झाला

काहीजण वेळापत्रकाचे उल्लंघन झाल्यास झोपेचे तास कमी करून ती वेळ भरून काढायचा प्रयत्न करतात. हे बरे नव्हे. झोपेच्या वेळेवर अतिक्रमण नको. आपल्या मनाचा CPU आपण झोपेत असताना कार्यरत असतो. दिवसभरात केलेल्या अभ्यासाचे तो आपण गाढ झोपेत असताना व्यवस्थापन करतो. तेव्हा या प्रकियेला पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. झोप अपुरी झाली तर अन्नाचे पचनही नीट होत नाही. त्यातून शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते. त्यामुळे रात्री फक्त चार ते पाच तास झोपून उर्वरित वेळ अभ्यास करणारे या गैरसमजात असतात की ते इतरांना मागे टाकत आहेत. पण, यात नुकसानच जास्त आहे, फायदा कमी.

दुपारी वामकुक्षी घेणे हा एक शवासनासारखाच प्रकार आहे. ज्यात मन व शरीर यांना कमी वेळात विश्रांती मिळते. वामकुक्षी घेणाऱ्यांची उर्जा इतरांपेक्षा जास्त दिसून आली आहे. मात्र, झोप व वामकुक्षी यात फरक आहे. वामकुक्षी म्हणजे झोप नव्हे. दुपारची झोप टाळलेली बरी. एकतर परीक्षा दुपारीच असतात. शिवाय दुपारच्या झोपेने डोके व शरीर जड होते. अंगात आळस मुरतो. त्यानंतर रात्री जबरदस्ती जागावे लागते. त्यापेक्षा दुपारची झोप टाळलेलीच बरी.

- परतीचे दोर कापले आहेत

परीक्षेचा फॉर्म भरणे हा अप्टेंम्ट नसल्याने काही उमेदवार शेवटच्या दिवसांमध्ये माघार घेतात. काही वेळा कारणे खरी असतात. पण, कधीकधी भीती हे त्यामागील कारण असते. अप्टेंम्ट वाया जाऊ नये ही भावना प्रबळ असते. खुल्या वर्गाचे अटेंम्ट लोकसभा निवडणुकीच्या वेळी चारवरून सहावर करण्यात आले. आता परत ते आयोग चारवर आणणार, अशी अफवा उमेदवारांमध्ये आहे.

अशावेळी अटेंम्ट वाचवलेला बरा असे काहींना वाटते. प्रत्यक्षात असे वाढवलेले अटेंम्ट मागे घेणे आयोगाला सोपे जाणार नाही किंवा कमी करायचे म्हटले, तरी दोन वर्षांची तरी नोटीस द्यावी लागेल. ते पाहता या कारणाने तरी माघार घेऊ नका. एक अप्टेंम्ट सोडला की मग अख्खे वर्ष वाया जाते. पुढचा निकाल थेट दोन वर्षांच्या अंतरानेच मिळतो.

व्यूहरचना

शेवटच्या दिवसांमध्ये नवीन काही अभ्यास करण्याचा अट्टहास सोडून, आहे तो पक्का करण्याकडे लक्ष पुरवा. फेसबुक, व्हॉट्स अॅप यांना तात्पुरती रजा दया. मोबाइलचा वापर कमीत कमीवर आणा. टीव्ही बघणे बंद करा. फक्त तुमचा माफक व्यायाम मात्र चालू दे.

‘सीसॅट पेपर – २’चा दोन तासांचा सराव शेवटपर्यंत चुकवू नका. चालू घडामोडींना जास्त महत्त्व द्या. त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मागच्या दोन्ही वर्षी पूर्वपरीक्षेत चालू घडामोडींवर फार कमी म्हणजे सहा व आठ प्रश्न विचारले होते. त्यामुळे काहींना त्या करायचीच गरज नाही असे वाटते, ते बरोबर नाही. अचानक चालू घडामोडींवर प्रश्न वाढू शकतात. शत्रूला कमी लेखू नये, असे म्हणतात. आयोगाच्या सर्व चाली आपल्याला कळल्या आहेत अशा भ्रमात राहू नये. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येवो न येवो चालू घडामोडींना मोडीत काढू नका.

सराव एके सराव

शेवटच्या टप्प्यात आकलनाचा, प्रश्न सोडवण्याचा या सगळ्याचाच वेग वाढलेला असतो. त्याचा फायदा घेऊन पर्यायी उत्तरांचे प्रश्न सोडवायचा सपाटा लावा. या चाचण्यांमध्ये किती गुण मिळत आहेत, हे आता बघू नका किंवा बघितले तरी मनावर घेऊ नका. गट चर्चा आता कमी करत आणा किंवा बंद करून टाका. नकारात्मक विचाराच्या लोकांना भेटणे टाळा. कोणी भेटले तरी उभ्याउभ्याच बोला म्हणजे बोलणे लवकर संपते.

अभ्यासाचा कंटाळा आला, तर अभ्यासाचा विषय बदलून बघा. त्यानेसुद्धा विरंगुळा मिळतो. हॉलतिकीटचे प्रिटंआऊट काढून ठेवा. आपले केंद्र कुठे आहे व तिथे कसे पोहचायचे याची चौकशी करून ठेवा. ते केंद्र इतर कुणा आळखीच्या उमेदवारांना आले आहे का, याची माहिती घ्या.

इस पार या उस पार

सर्व विचार अभ्यासावर केंद्रीत करून बाकी सर्व विचारांना दूर पळवून लावा. दिवसाला १४ ते जास्तीत जास्त १६ तासापर्यंत अभ्यास करायला हरकत नाही. पण, त्याहून जास्त शरीराला ताणू नका. आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्या. कुठल्याही परिस्थितीत शरीराने वा मनाने आजारी पडू नका. मसालेदार जेवण, गोडाचे पदार्थ, आईस्क्रीम अशा गोष्टींपासून दूर रहा. पावसात भिजणे टाळा. पाणी शक्यतो उकळलेले प्या.

विजयी व्हा!

फारच टेंशन आले, तर हा विचार करा की अजून तर मुख्य परीक्षा, मुलाखत व अंतिम निकाल बाकी आहे. (पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त) आताच इतके टेन्शन घेतले, तर पुढच्या टप्प्यांसाठी काय राहील. अर्थात इतका पुढचा विचार करायची गरज नाही. एका वेळी एकाच गोष्टीचा विचार केला तर टेन्शन कमी होते. सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा!

-
उत्तर लिहिले · 17/1/2022
कर्म · 121765
0

वेळ आणि काळ ह्या दोन संकल्पना अनेकदा आपण एकाच अर्थाने वापरतो, पण त्या दोहोंमध्ये सूक्ष्म फरक आहे. तो खालीलप्रमाणे:

वेळ (Time):
  • वेळ म्हणजे विशिष्ट क्षणी असणारी स्थिती. हे एक परिमाण आहे जे आपल्याला घटना कधी घडली हे सांगते.
  • वेळ मोजता येतो.second, minute, तास, दिवस, महिना, वर्ष ह्यांमध्ये आपण वेळ मोजतो.
  • वेळ हा क्षणिक असतो. तो सतत बदलत असतो.
  • उदाहरणार्थ: "आता 2 वाजले आहेत", "मी 10 मिनिटांत परत येतो".
काळ (Kaal):
  • काळ म्हणजे घटनांचा क्रम किंवा घटनांची लांबी. हा एक अमूर्त (abstract) आणि व्यापक (broader) संकल्पना आहे.
  • काळ मोजण्यासाठी वेळेचा वापर केला जातो, पण तो केवळ वेळेपुरता मर्यादित नाही.
  • काळ भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तीन भागांमध्ये विभागलेला असतो.
  • उदाहरणार्थ: "भारताचा इतिहास", "वैज्ञानिक क्रांतीचा काळ".

थोडक्यात, वेळ हा एक विशिष्ट बिंदू आहे, तर काळ हा त्या बिंदूंच्या दरम्यानचा विस्तार आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3500

Related Questions

भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेची गरज व महत्त्व स्पष्ट करा?
मणके म्हणजे काय?
मनुष्याच्या मानेत किती मनके असतात?
भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते?
विज्ञान आणि तंत्रज्ञान नोंदवही इयत्ता दहावी?
थॉमस एडिसन यांनी लावलेले शोध?
रिकामी जागा या द्रव्याच्या अभावामुळे होतो?