सरकार सरकारी योजना कल्याणकारी योजना

तेलंगणा सरकारने चालू केलेली कोडी अम्मा योजना काय आहे?

4 उत्तरे
4 answers

तेलंगणा सरकारने चालू केलेली कोडी अम्मा योजना काय आहे?

6
तिकडे आर्थिकरित्या गरीब असणारे आपल्या मुलांना कमी वयात कामाला लावतात ते कुठेतरी थांबवण्याचा एक छोटा प्रयत्न आहे. तिकडे जो आपल्या पाल्याला शाळेत टाकेल आणि शिक्षण चालू ठेवेल त्या पालकांना वर्षाला 15,000 रुपये भेटेल अशी योजना आहे.
उत्तर लिहिले · 11/1/2020
कर्म · 860
4
हैदराबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींनी काल राज्य सरकारच्या 'अम्मा वोडी' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छिणाऱ्या गरीब आणि गरजू महिलांसाठी 'अम्मा वोडी' योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत मुलांना शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक आईच्या बँक खात्यात दर वर्षाला १५ हजार रुपये जमा होतील. मुलांच्या शिक्षणात मदत व्हावी, या हेतूनं रेड्डी सरकारनं ही योजना तयार केली आहे. 'अम्मा वोडी' या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील ८२ लाख मुलांना होईल. या योजनेच्या अंतर्गत ४३ लाख मातांच्या खात्यात दर वर्षी १५ हजार रुपये जमा करण्यात येतील. लॅपटॉपचं बटन दाबून रेड्डींनी या योजनेचा शुभारंभ केला. तिरुपतीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या चित्तूरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना रेड्डींनी या योजनेची माहिती दिली. 'राज्यातील ८२ लाख मुलांना अम्मा वोडी योजनेचा फायदा होईल. सरकार जवळपास ४३ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असून यावर ६,३१८ कोटी रुपये खर्च होतील,' असं रेड्डींनी सांगितलं. २०१७ आणि २०१८ मध्ये जगनमोहन रेड्डींनी पदयात्रा काढली होती. त्या दरम्यान अम्मा वोडी योजनेची कल्पना सुचल्यानं रेड्डींनी सांगितलं. 'घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं अनेक महिला त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याचं पदयात्रेदरम्यान मला जाणवलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मुलांच्या शिक्षणाआड येऊ नये असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. त्यातून अम्मा वोडी योजनेची कल्पना सुचली,' असं रेड्डी म्हणाले. शाळा, महाविद्यालयात अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि आयकर भरणाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. 
उत्तर लिहिले · 11/1/2020
कर्म · 18385
0

तेलंगणा सरकारने सुरू केलेली 'कोडी अम्मा' योजना ही गर्भवती महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना पोषण आहार किट पुरवले जाते.

या योजनेचा उद्देश काय आहे?

  • गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना योग्य पोषण देणे.
  • ॲनिमिया (anemia) म्हणजे रक्ताची कमतरता आणि कुपोषण कमी करणे.
  • माता आणि बालमृत्यू दर कमी करणे.

या योजनेत काय दिले जाते?

  • पोषण आहाराचे किट (Nutrition kit)
  • आरोग्य शिक्षण (Health education).

अधिक माहितीसाठी, आपण तेलंगणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

बांधकाम कामगारांचे भांडे थंब झालेले आहे पण भांडे मिळत नाही, काय करावे लागेल? ऑनलाईनमध्ये नावे आहेत का?
कष्टकरी जीवनाला सोन्याचा दिवस कधी येणार?
एकाच मुलगी असलेल्यांसाठी सरकार च्या काय योजना आहेत?
अपंगांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती कुठे मिळेल?
अनुसूचित जमातीसाठी कोणत्या योजना आहेत आणि अप्लाय कशा करायच्या?
बांधकाम कामगार कल्याण योजनांबद्दल माहिती काय आहे? व ती कशी राबवतात?
मला दोन मुली आहेत तर कुठल्या योजनेचा फायदा घेता येईल?