3 उत्तरे
3
answers
लेक टँपिग म्हणजे काय?
5
Answer link
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/lake-tapping-at-modaksagar/articleshow/41556518.cms
कृपया वरील लिंक वर क्लिक करा... लेक टॅपिंग बद्दल आपणास उत्तम माहिती मिळेल...
कृपया वरील लिंक वर क्लिक करा... लेक टॅपिंग बद्दल आपणास उत्तम माहिती मिळेल...
1
Answer link
मोडकसागर तलावात आज लेक टॅपिंग
मोडकसागर तलावाची खोली वाढवण्यासाठी महापालिका आज, बुधवारी तलावात लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगच्या प्रयोगामुळे तलावातील पाण्याचा मृत साठा वापरता येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मोडकसागर तलावाची खोली वाढवण्यासाठी महापालिका आज, बुधवारी तलावात लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगच्या प्रयोगामुळे तलावातील पाण्याचा मृत साठा वापरता येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मोडकसागर तलावाजवळील टेकडीवर महापालिकेने तीन बोगदे बांधले आहेत. त्यातील दोन बोगदे तलावाशी आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याशी जोडले आहेत. मात्र, १३६ मीटर्सचा बोगदा तलावाशी जोडायचा आहे. त्यासाठी लेक टॅपिंगने भूमिगत सुरुगांचे स्फोट करण्यात येणार आहेत. या टॅपिंगमुळे मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात वाढ होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. टॅपिंगसाठी एकूण नऊ कोटी रुपये खर्च होणार आहे.
मोडकसागर तलावाची खोली वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे आज, बुधवारी तलावात लेक टॅपिंग केले जाणार आहे. या प्रयोगाबद्दल टॅपिंगचे काम करणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद.
लेक टॅपिंग म्हणजे काय?
तलावाच्या तळाला पाण्याचा मृत साठा असतो. हा साठा वापरात येत नाही. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने जास्तीत जास्त मृत साठा वापरात आणण्याचा प्रयत्न लेक टॅपिंगद्वारे करण्यात येणार आहे. लेक टॅपिंगसाठी भूमिगत स्फोट घडविले जातात. टॅपिंगची सरुवात २५ वर्षांपूर्वी नॉर्वेत झाली. भारतात १९९९ व २०१२ मध्ये कोयना धरणात असे टॅपिंग करण्यात आले होते. लेक टॅपिंग करणारी मुंबई महापालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
लेक टॅपिंग कसे केले जाते?
लेक टॅपिंग तलावाच्या पृष्ठभागावरून करता येत नाही. तलावाच्या अधिकाधिक खोल भूगर्भात जाऊन असे टॅपिंग करावे लागते. टॅपिंग करण्यासाठी एक शाफ्ट तयार करावा लागतो. मोडकसागर तलावाच्या भूमिगत शाफ्टच्या खाली १९३ मीटर लांबीचा आणि ३.२ व्यासाचा टनेल बनविण्यात आला आहे. सुमारे आठ ते नऊ महिने हे टनेलचे काम सुरू होते. या टनेलखालून स्फोट करण्यात येणार आहे.
स्फोटामुळे बाह्य वातावरणावर काही परिणाम होतो काय?
स्फोट केल्यानंतर २० मीटर प्रति सेकंद वेगाने टनेलमध्ये तलावातील पाण्याचा प्रवेश होईल. हे पाणी १० ते १५ सेकंदाने टनेलच्या बाहेर पडेल. स्फोटासाठी डिले डिटोनेटर्सचा वापर करावा लागणार असून फक्त दोन सेकंदाचा स्फोट होणार आहे. त्यानंतर टनेलच्या आतून बाहेरून वेगवेगळ्या बाजूने आठ वेळा हे स्फोट सुरू राहणार आहेत. या स्फोटाचा बाह्य वातावरणावर कोणताही परिणाम होत नाही.
मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात वाढ होणार काय?
लेक टॅपिंगमुळे कधी वापरात न येणारा पाण्याचा मृत साठा प्रथमच वापरात येणार आहे. पालिकेने तलावांसाठी मूळ ठरविलेल्या पाण्याच्या साठ्यात मुंबईकरांना किमान आणखी एक महिन्याचे अतिरिक्त पाणी लेक टॅपिंगमुळे उपलब्ध होणार आहे.
आताच्या काळात कुमारवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या दिसून येतात. अशा मुलांना श्वसनक्रमात बिघाड होण्याचा, व्यत्ययकारी निद्रा अश्वसनाचा धोका जास्त असतो. झोप कमी झाल्याने किंवा झोप अस्वस्थपणे झाल्याने लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणाचा कुमारवयांतील मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हे या लेखात दिले आहे.
भारतातील कुमारवयीय मुलांमधील (12 ते 19 वर्षे) लठ्ठपणाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणाच्या प्रादुर्भावाचे आणि त्याच्या जोखीम घटकांचे अनुमान काढण्यासाठी अलीकडे घेण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की बॉडी मास इंडेक्सनुसार 12.10% मुले अतिवजनदार होती आणि 8.7% मुले लठ्ठ होती. दक्षिण कर्नाटकामधील कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांच्या आणखी एका अभ्यासातून असे आढळले की कुमारवयांमधील अतिवजनाचा एकूण प्रादुर्भाव 9.9% असून लठ्ठपणाचा प्रादुर्भाव 4.8% एवढा आहे.
obesity
लठ्ठपणाचा कुमारवयांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
लठ्ठ कुमारवयीन मुलांना इतर संबंधित विकार होण्याचा धोका बळावतो. वजन वाढते तशी ग्लुकोज सुसह्यता बिघडण्याची जोखीम वाढते. टाईप 2 डायबिटीस जलद बळावणार्या (प्रोग्रेसिव्ह) न्युरोपाथीशी (एक किंवा अधिक चेतांना अपाय किंवा त्यांच्या कार्यात बिघाड), रेटिनोपाथीशी, नेफ्रोपाथीशी, आणि हृदयविकारांशी निगडित असल्याने, तो टाळणे, त्याचे लवकर निदान होणे आणि त्यावर उपचार करणे अतिशय महत्त्वाचे असते.
टाईप 2 डायबिटीस नसला तरीही लठ्ठ कुमारवयीनांना प्रौढत्वात हृदयविकार होण्याची जोखीम जास्त असते कारण त्यांना उच्च रक्तदाब होण्याची आणि रक्तातील एक किंवा अनेक प्रकारच्या लिपिडच्या (मेद) पातळ्या रोगट प्रमाणात वाढण्याची जोखीम वाढलेली असते.
लठ्ठपणामुळे कुमारवय यांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीझ होऊ शकतो.
लठ्ठ कुमारवयीनांना श्वसनक्रमात बिघाड होण्याचा, व्यत्ययकारी निद्रा अश्वसनाचा धोका जास्त असतो, आणि झोप कमी झाल्याने किंवा झोप अस्वस्थपणे झाल्याने लठ्ठपणा वाढतो. मुलांच्या एका अभ्यासातून असे दिसून आले की 1 आठवडाभर झोप कमी घेतली असता त्यांनी जास्त अन्न खाल्ले आणि त्यांचे वजन वाढले.
लठ्ठ कुमारवयीन मुलांना फ्रॅक्चर होण्याचा धोकाही जास्त असतो कारण शरीराच्या मापाशी तुलना करता त्यांचे अस्थि वस्तुमान कमी झालेले असते.
लठ्ठ कुमारवयीन स्त्रीला वैद्यकीय, मानसशास्त्रीय आणि प्रजननात्मक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने, लघुकालीन आणि दीर्घकालीन संबंधित विकार टाळणे अत्यावश्यक असते.
कुमारवयांसाठी उपलब्ध असणारे विविध वजन व्यवस्थापनाचे पर्याय कोणकोणते आहेत?
आजपर्यंत, जीवनशैलीतील बदलांमुळे वजन घटीवर केवळ अल्प प्रमाणातच परिणाम झालेले दिसून आले आहे. आहारात्मक, औषधशास्त्रीय किंवा एकत्रित वर्तणूक कार्यक्रमांमधून निर्वाही वजन घट क्वचितच साध्य होते. सर्व पारपंरिक उपचार करूनही उपाय होत नसेल तर बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा विचार करता येऊ शकतो.
लठ्ठपणाचा कुमारवयांतील मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक अँड बेरिअॅट्रिक सर्जरी (एएसएमबीएस) ह्यांनी पुढील निकषांची पूर्तता करणार्या कुमारवयीनांसाठी बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा विचार करण्याची शिफारस केली आहे: 35 किंवा त्याहून जास्त बीएमआय असेल आणि त्या संबंधित विकार तीव्र स्वरूपाचा असेल तर (उदा. टाईप 2 डायबिटीस) किंवा बीएमआय 40 किंवा त्याहून जास्त असेल तर आणि त्यासंबंधित विकार सौम्य स्वरूपाचे असतील तर.
श्री. विरेन भगत ह्यांच्या शब्दांत - ‘‘मी व्यवसायाने शेफ आहे आणि मुंबईमध्ये स्थित आहे. मी 193 किलो असताना माझे वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आज माझे वजन 93 किलो आहे. मी 1 वर्षात 100 किलो घटवले आणि अजूनही हे वजन राखून आहे. माझी कंबर 22 इंचांनी कमी झाली. मी व्यायाम करू शकतो, माझे सामान्य आयुष्य जगू शकतो जे 193 किलो असताना जवळपास अशक्य होते. बेरिअॅट्रिक सर्जरी घेण्याचा माझा महत्त्वाचा निर्णय हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता आणि मी त्या क्षणाची आठवण जपून ठेवली आहे.’’
बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया कशासाठी?
अलीकडील पुराव्यातून असे दिसून येते की बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे अतिलठ्ठ कुमारवयीन रुग्णांमध्ये संबंधित विकार आणि निगडित दीर्घकालीन समस्या सोडवल्या जातात ज्यामुळे जीवनमान सुधारते.
बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया केल्यावर काय होते?
शस्त्रक्रियेतून शारीरिकदृष्ट्या बरे होत असतानाच, ही वेळ कुमारवयीन याला स्थायू अन्नपदार्थ खाण्याची सवय लावून घेण्यासाठी आवश्यक असते. बरे होताना, त्यांनी हळूहळू स्थायू अन्नपदार्थ पुन्हा खायला सुरु करायचे असते. सुरुवात द्रव पदार्थांच्या आहाराने करावी, आणि मग प्युरी केलेले (घट्ट रसा) अन्न खावे आणि अंतिमत:, स्थायू पदार्थ. चार ते सहा आठवड्यांमध्ये, रुग्ण स्थायू पदार्थ खाऊ लागतात.
शस्त्रक्रियात्मक आंतरनिरसनासाठी यथायोग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता आणि शस्त्रक्रिया पश्चात साहाय्य पुरवण्याकरिता एक अनुभवी बेरिअॅट्रिक सर्जन, आहार तज्ज्ञ, आणि मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ ह्यांची एक बहु ज्ञानशाखीय टीम आखणे आवश्यक असते.
0
Answer link
लेक टँपिंग (Lake tapping) म्हणजे जलाशयाच्या नैसर्गिक किंवा कृत्रिम बंधाऱ्यातून पाणी थेट बोगद्याद्वारे किंवा पाईपलाईनद्वारे काढणे होय. या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने जलविद्युत प्रकल्पांसाठी (Hydroelectric projects) केला जातो.
लेक टँपिंगचे फायदे:
- पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.
- जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत घट न करता वीज उत्पादन करता येते.
- पुराच्या धोक्याची शक्यता कमी होते.
उदाहरण: कोयना जलविद्युत प्रकल्प (https://msedcl.in/solar/koyna-hydro-electric-project/)