3 उत्तरे
3 answers

ग्रहण म्हणजे काय?

7
ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते?

सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते. ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास सूर्यग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास सूर्यग्रहण होय. अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खंडग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो.



उत्तर लिहिले · 26/12/2019
कर्म · 9405
1
ग्रहणं म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा, आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात. ग्रहणाचे साधारण तीन प्रकार आहेत: ग्रहण (सूर्यग्रहण, चंद्रग्रहण) अधिक्रमण पिधान
उत्तर लिहिले · 26/12/2019
कर्म · 15490
0

ग्रहण म्हणजे काय?

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जी एका खगोलीय वस्तूच्या सावलीमुळे दुसऱ्या खगोलीय वस्तूवर पडते.

ग्रहणाचे मुख्य प्रकार:

  • सूर्यग्रहण: जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण होते.
  • चंद्रग्रहण: जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

सूर्यग्रहण व चंद्रग्रहण लागणे म्हणजे काय?
चंद्रग्रहण म्हणजे काय? अवतंबरीकरण म्हणजे काय होतं? वतन आणि ग्रँड वतन म्हणजे काय?
दक्षिणायन म्हणजे काय?
सूर्य अचानक बुडाला?
अमावस्या संज्ञा स्पष्ट करा?
अयनदिन म्हणजे काय.?
आयन दिन म्हणजे काय?