ईच्छा मानसशास्त्र मानसिक आरोग्य मनोविज्ञान मानसिक स्वास्थ्य

मनाला कसे नियंत्रित करायचे? मनात, डोक्यात नकारात्मक विचार कसे थांबवावे? डोक्यात जन्म घेत असलेल्या इच्छा कशा थांबवाव्यात?

3 उत्तरे
3 answers

मनाला कसे नियंत्रित करायचे? मनात, डोक्यात नकारात्मक विचार कसे थांबवावे? डोक्यात जन्म घेत असलेल्या इच्छा कशा थांबवाव्यात?

14
मनाला कसं नियंत्रित करायच मनात डोक्यात नकारात्मक विचार कसे थांबवावे
तर नकारात्मक विचार मनात डोक्यात येतात तेव्हा आपलं मन आणि लक्ष कुठल्या तरी कामात मन रमवावे. तरी पण    डोक्यात काही ईच्छा अपेक्षांबद्दल   विचार जन्म घेतात तेव्हा एक काम करावे आणि मी हा माझा अनुभव सांगत आहे जेव्हा काम करत असताना डोक्यात नविन  विचार जन्म घेत असतात तेव्हा आपल्या हातातल काम होण्याऐवजी बिघडत . तेव्हा मग एक करावं हातातलं काम थांबवावे काम करत नसाल तर जरा शांत बसावे आणि डोळे बंद करून आपल्या मनाशी बोलावे माझ्या डोक्यातील विचार थांबु दे असं बोला डोक्यात येणारे विचार नकारात्मक विचार थांबतील
डोक्यातील विचार नकारात्मक विचार. थांबवण्यासाठी सकाळी पहाटे उठून धर्मानं करावे  सकाळी उठल्यावर फक्त ओमकार ध्वनीचा जप करावा याने तुम्हाला शांत आणि डोक्यात येणारे विचार नकारात्मक विचार डोक्यात जन्म घेणाऱ्या ईच्छा  हे सर्व थांबतील तरी पण काहीच फरक नाही आपल्या मनाशी बोलावे ज्याना असं होतं असेल तर हे नक्की करून बघा.
उत्तर लिहिले · 22/12/2019
कर्म · 20950
10
नकारात्मक विचारांनी फक्त आपले नुकसानच होते त्यामुळे ते विचार थांबविणे किंवा त्यांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. यासाठी काही उपाय

१) आपल्या विचारांवर लक्ष ठेवणे - आपल्या मनात कोणते विचार येतात हे आपल्याला कळत देखील नाही. बऱ्याचदा आपण एक विचार करत असतो आणि एकमागे एक असे अनेक विचार आपल्या मनात येत राहतात. विनाकारण आपण या विचारांमध्ये आपला वेळ वाया घालवतो, त्यामुळे विचारांवर लक्ष ठेवल्याने विचार कमी होतील त्याचबरोबर फालतू काय आहे आणि महत्वाचे काय आहे हे पाहणे गरजेचे आहे.

२) स्वीकार करणे - आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत याचा विचार आपण सतत करत राहतो. याचा परिणाम आपल्या कामावर होतो असतो. कोणत्याही गोष्टीला विरोध केल्याने मन अशांत होते, मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या स्वीकारल्याने मनातील विचार कमी होण्यास मदत होते.

३) चांगली कृती करा - दुसऱ्यांना बदलने आपल्या हातात नसते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कृत्यांवर विचार करत बसल्याने आपलेच नुकसान होते.आपल्या मनात नकारात्मक विचारांची वाढ होते. यासाठी आपण आपल्या कृतीतून दुसऱ्यांमध्ये चांगले बदल घडू शकतो त्यासाठी आपण चांगली कृती करणे गरजेचे आहे.

४ ) ध्यान - विचारांवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर ध्यान करणे फार महत्वाचे आहे. ध्यान केल्याने मनाला शांती भेटते तसेच विचारांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ध्यान केल्याने मनावर प्रभुत्व मिळवता येऊ शकते.
उत्तर लिहिले · 22/12/2019
कर्म · 26370
0

मनाला नियंत्रित करण्याचे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  • नियमित ध्यान करा: रोज ठराविक वेळ ध्यान केल्याने मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्यास मदत होते.
    • हे कस करायचं: शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. नकारात्मक विचार आल्यास, त्यांना हळूवारपणे सोडून द्या.
  • सकारात्मक विचार करा: नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा.
    • हे कस करायचं: सकारात्मक गोष्टींची यादी तयार करा आणि त्या नियमितपणे वाचा.
  • नकारात्मक विचार ओळखा: नकारात्मक विचार येतात हे लक्षात आल्यावर, ते विचार का येत आहेत हे समजून घ्या.
    • हे कस करायचं: नकारात्मक विचार डायरीत लिहा आणि त्यावर विचार करा.
  • नकारात्मक विचार थांबवा: नकारात्मक विचार मनात येताच, त्यांना सकारात्मक विचारांनी बदला.
    • हे कस करायचं: 'मी हे करू शकतो' किंवा 'मी आनंदी आहे' असे सकारात्मक वाक्य स्वतःला सांगा.
  • इच्छांवर नियंत्रण ठेवा: अनावश्यक इच्छांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
    • हे कस करायचं: ज्या गोष्टींची गरज आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक इच्छांना टाळा.
  • नियमित व्यायाम करा: शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
    • हे कस करायचं: रोज कमीतकमी ३० मिनिटे व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री ७-८ तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
    • हे कस करायचं: झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा.
  • आहार योग्य ठेवा: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
    • हे कस करायचं: जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा.
  • सामाजिक संबंध वाढवा: मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.
    • हे कस करायचं: सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्या आणि लोकांबरोबर बोला.
  • निसर्गाच्या सानिध्यात राहा: निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मन शांत होते.
    • हे कस करायचं: बागेत फिरायला जा किंवा डोंगर-दऱ्यांमध्ये ट्रेकिंग करा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनाला आणि नकारात्मक विचारांना नियंत्रित करू शकता.

टीप: काहीवेळा नकारात्मक विचार आणि भावनांवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते. अशा स्थितीत, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

आयुष्याचा खूप कंटाळा आला आहे. मनातलं कोणाला बोलता येत नाही आणि कोणी समजावून घेणार पण नाहीये. काय करू काही कळत नाहीये?
मी खूप निराशेतून आज आत्महत्या करत आहे, सॉरी मित्रांनो?
मला आत्महत्या करावीशी वाटते, खूप त्रास आहे खाजगी सावकारांचा?
आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे गाव सोडावे अशी भावना कधीकधी येते का?
शरीर, मन व वाचा यांच्यावर नियंत्रण कसे ठेवावे? त्यासाठी कोणता पर्याय आहे?
मनाने वेगाला आवरणे?
आत्महत्या करण्यासाठी सर्वात सोप्पा पर्याय कोणता?