2 उत्तरे
2
answers
शेत रस्ता अडविल्यास शेतकऱ्यांनी काय करावे?
7
Answer link
*📚⚖ शेती आणि कायदा...*
**************************
*🔵👉🏽शेतरस्ता अडविल्यास शेतकऱ्यांनी काय करावे ?*
शेतकऱ्यांना शेतात शेत कसण्यासाठी स्वतः किंवा मजुरांना घेऊन जावेलागते ,बी ,बियाणे,खत,असतील किंवा शेतमाल निघाला असेल तर बैलगाडी किंवा ट्रॅक्टर वापरावा लागतो परन्तु मुजोर लोक आपल्या बांधावरून जाण्यास अडवणूक करतात .
शेतकरी जर तो रस्ता पूर्वापार वापरत असेल तर कुणालाही अडवणूक करता येत नाही. त्या साठी तहसीलदारा कडे *मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 कलम 5 नुसार वादपत्र (अर्ज) दाखल करावे* .या मध्ये रस्ता अडविनाऱ्यास प्रतिवादी करावे,
अडवणूक केल्याची घटना तारीख व वेळेसह सविस्तर लिहावी, त्यात साक्षदार असल्यास नाव टाकावे,अर्जा खाली सत्यापन (verification )करावे .योग्य ती तिकीट लावावी. सोबत ,दोन्ही शेताचे सातबारा जोडावे,कच्चा नकाशा तलाठ्यांकडून घेऊन जोडावा.असल्यास साक्षदारांचे नाव द्यावेत
हा अर्ज अडवणूक केल्याच्या घटनेपासून पासून 6 महिन्याच्या मुदतीत दाखल करावा लागतो.
जुना रस्ता असून तो अडवू नये या साठी *तहसीलदारांना मामलेदार न्यायालय कायदा 1906 कलम 5 नुसार शेतकऱ्यांना रस्ता पुर्ववत करून देण्याचा अधिकार आहे .*
तसेच जुना रस्ता जरी नसेल तरी जमीन महसूल कायदा कलम 143 नुसार
कोणत्याही शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्त्याची मागणी करता येते.ही मागणी तहसीलदार यांना करावी लागेल.
वहिवाट कायदा 1982 कलम15 नुसार 20 वर्षं अधिक काळ कोणत्याही रस्त्यावरून मग तो शेतात जाण्याचा असो की घराचारस्ता असल्यास त्या रस्त्यावरुन जाण्यासाठी अधिकार प्राप्त होतो .तो अडविल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो .
रस्त्यावरून जातांना अडवणूक करणे हा भा द वि कलम 341 नुसार गुन्हा होतो.
शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवू नये या साठी अर्ज तहसीलदार न्यायालयात वरील तरतुदी नुसार करता येतो किंवा दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया कायदा ऑर्डर 39 रूल 1 व 2 नुसार तात्पुरत्या मनाई आदेशा साठी अर्ज व निरंतर मनाईआदेशा साठी दावा दाखल करता येतो.
या सर्व कारवाई साठी तालुक्यातील जाणकार वकिलाची मदत घेतल्यास चांगले.
*✍🏼अनिल वैद्य*
माजी न्यायाधीश
9657758555
✍✍✍
*(लेखक स्वतः शेतकरी आहेत)*
*☘संकलन ☘*
*Anil Salve Sir*

0
Answer link
1. **तहसीलदार कार्यालयात अर्ज:**
शेत रस्ता (Farm Road) अडवल्यास, त्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या तहसीलदारांच्या कार्यालयात अर्ज दाखल करावा.
2. **पोलिसात तक्रार:**
शेत रस्ता अडवणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा.
3. **न्यायालयात दावा:**
दिवाणी न्यायालयात (Civil Court) शेत रस्त्याच्या हक्कासाठी दावा दाखल करू शकता.
4. **ग्रामपंचायत:**
आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून न्याय मागू शकता. ग्रामपंचायत स्तरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
5. ** Land Record Department तलाठी कार्यालयात अर्ज:**
Land Record Department तलाठी कार्यालयात अर्ज दाखल करून रस्त्या विषयी माहिती मिळवू शकता.
6. **नोटीस:**
रस्ता अडवणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवा.
7. **मध्यस्थी:**
गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे समोपचाराने तोडगा निघू शकेल.
महत्वाचे मुद्दे:
- आपल्या अर्जात किंवा तक्रारीत blockage (अडथळा) केलेल्या रस्त्याची संपूर्ण माहिती, गट नंबर आणि अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे नाव नमूद करा.
- आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे सादर करा.