राजकारण व्यक्तिमत्व राजकारणी

शरद पवार यांच्याबद्दल विशेष माहिती द्या?

3 उत्तरे
3 answers

शरद पवार यांच्याबद्दल विशेष माहिती द्या?

10


​*🧐 शरद पवार ते ‘पवार साहेब’*


दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार, मुरब्बी राजकारणी, पद्मविभूषण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा काटेवाडी ते मंत्री पदापर्यंतचा अनोखा प्रवास...

अजून एका वर्षभराने ते आपल्या वयाची 80 वर्ष पूर्ण करतील. या एकोणऐंशी वयाचा एकूण एक अंश म्हणून वटवृक्षाच्या पारंब्या देशभरात, प्रत्येक क्षेत्रात खोलवर रुजल्या गेल्या आहेत.

12 डिसेंबर 1940 ला पुणे जिल्ह्यात काटेवाडी, बारामती येथे त्यांचा जन्म झाला. आणि बारामतीच्या सहकारी बँकेचे व्यवस्थापक गोविंदराव, शिक्षण समितीच्या प्रमुख शारदाबाई या दोघांकडून त्या बीजाची मशागत झाली.




वयाच्या 16 व्या वर्षी 1956 साली शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देत त्या बीजाने मूळ धरण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.

*🚨 राजकीय कारकीर्द*

● 1967 : बारामती मतदारसंघातून आमदार
● 1978 : पहिल्यांदा मुख्यमंत्री
● 1988 : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
● 1990 : तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
● 1993 : चौथ्यांदा मुख्यमंत्री
● 1991 : केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री
● 1996 : राज्य विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते
● 2004 : देशाचे कृषिमंत्री
● 2010 : बीसीसीआयचे अध्यक्ष

*🧐 विशेष*
पवारसाहेबांची स्मरणशक्ती फार अफलातून आहे. आयुष्यात एकदा भेटलेली माणसे त्यांना कायमची लक्षात राहतात. जुन्याजाणत्यांना ते अगदी नावानिशी हाक मारतात.

*🥇 पुरस्कार पद्मविभूषण (सार्वजनिक क्षेत्र)*

📗 पदावर असताना घेतलेले महत्वाचे निर्णय

‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ हा दूग्ध व्यवसाय राबवला.

● यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य.
● आणिबाणीत 50 ते 55 वयाच्या सक्तीने निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले.

● मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात योगदान.

● हिंगोलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे विद्यापीठ.

● केंद्रीय कृषिमंत्री असताना माथाडी मंडळावरचा 248 कोटींचा आयकर माफ केला.

● 1989 साली नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना.

● सहित्य अकादमी पुरस्कार मिळणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून 1 लाख रुपये देण्याचा निर्णय.

● महाराष्ट्रासाठी 3 वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

● महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्याचा निर्णय सरंक्षणमंत्री असताना घेतला.

● लातूरच्या किल्लारी भूकंपावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार 3 महिने तळ ठोकून होते.

● स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आणि राज्य महिला आयोग स्थापन करण्यात योगदान.

● गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भारताने यशस्वी झेप घेतली ती शरद पवार कृषिमंत्री असताना.

● कृषिमंत्री झाल्याबरोबर शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले.

आजही तेवढ्याच हिमतीने धैर्याने राजकारणात राहून समाजकारण करत शरद पवार हे ‘पवार साहेब' बनले आहेत. पवारसाहेबांचे राजकारण की, राजकारण म्हणजेच पवारसाहेब हे भल्या-भल्यानां आजही समजणे कठीण आहे.
उत्तर लिहिले · 12/12/2019
कर्म · 569265
3
*|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽  ɱαɦเƭเ. |͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽|͓̽*

_*‼ शरद पवार नावाचं गारूड ‼*_


_शरद पवार यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस. त्यानिमित्ताने_
____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि. १२  डिसेंबर २०१९_* 📯
        बाळासाहेब ठाकरेंसारखं समोरच्यांना आपल्या कवेत घेईल अमोघ वक्तृत्व नाही, लाखा-लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाहीत, शिवसैनिकांसारखे जीव ओवाळून टाकतो, असे म्हणणारे कार्यकर्ते नाहीत, ते कधीही कोणताही आदेश देत नाही पण तरीही शरद पवार या नावाचं गारूड या महाराष्ट्रभर का असावं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित असतं. लाखाच्या सभा भरल्या नसल्या ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं. एखाद्या माणसाचे पैलू एवढे असू शकतात?
पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात रहातात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची कधी होते, ते कळतही नाही. अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारांच्या डोक्यात असतात. एकदा तर एका सभेला समोरच्या सभाजनांमधील एका शाळूसोबतीला पवारांनी हाक मारून बोलाविल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे.
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=866143540450237&id=100011637976439
____________________________
माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू रहात नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. रतन टाटा असो वा राहूल बजाज किंवा अनिल, मुकेश अंबानी असो वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. पण नाट्य क्षेत्रातील जब्बार पटेल, मोहन आगाशे, मोहन जोशी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.
पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत. पवारांमुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक चांगली मंडळी राजकारणात आली. ना. धो. महानोर व रामदास फुटाणे यांची उदाहरणं समोर आहेत.
पवारांच्या सभा मोठ्या मोठ्या नसतात. यालाही अपवाद आहेत. पण ते अगदी स्थानिक पातळीवर जाऊनही प्रचार करतात. पण त्यांची सभा काही तरी देऊन जाणारी असते. श्रोतृवंदाला बांधून ठेवण्याचे काम ते अतिशय चांगले करतात. प्रसंगी तिखट आणि उपहासही त्यांच्या बोलण्यात नेमकेपणाने येतो. विशेषतः विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना हे प्रकर्षाने जाणवते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पुरेपूर माहित आहे. तेथील प्रश्न काय आहेत. याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे ज्या भागात जातात, तेथील प्रश्न, समस्या त्याच्या भाषणात येतात. राजकारणात असल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यामुळे त्यांच्यात आलेल्या बहुश्रुततेचा हा परिणाम आहे. समोरच्याचं ऐकून घेऊन ते समजावून घेण्याची त्यांची वृत्ती नेहमी त्यांना अपडेट ठेवते.
टीका झाली तरी शांतपणे झेलण्याचा त्यांचा स्वभाव आहे. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली. राज्याच्या सुरक्षा यंत्रणेबद्दल प्रचंड टीका होऊ लागली. याच काळात अनेक भ्रष्टाचाराची कथित प्रकरणे उकरून काढण्यात आली. मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनारांनी तर त्यांच्याविरूद्ध जणू मोहिमच ऊघडली. हा काळ पवारांच्या दृष्टीने अतिशय कसोटी पाहणारा होता. पण पवार निश्चल होते. पुढे या सर्व प्रकरणातून ते तावून सुखावून बाहेर पडले.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्यांच्या राजकारणाच्या चालीही त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाला गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्यालाही लागत नाही. १९७७ मध्ये वसंतदादांचे सरकार पाडण्याच्या प्रसंगाताही त्यांनी या कानाचे त्या कानालाही कळू दिले नव्हते. त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९९१ मध्ये छगन भुजबळांसह बारा आमदारांना त्यांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. शिवसेनेला फार मोठा धक्का देण्याचे काम पवारांनी या कृतीने केले. अर्थातच शिवसेना या कृत्याने चवताळली. पण काही करू शकली नाही. आजही भुजबळ पवारांसोबतच आहेत. त्यांचा एखाद्या चालीत झालेला पराभव ते लक्षात ठेवून दुसऱ्या वेळी त्यात यश कसे मिळेल ते पहातात. त्यासाठी योग्य अभ्यासही करतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद हे त्याचे उदाहरण आहे. जगमोहन दालमिया यांनी पहिल्यांदा त्यांचा पराभव केल्यानंतर दुसऱ्यांदा मात्र पवारांनी एवढे हुशारीने जाळे विणले की दालमिया यांच्यासारखा मुरब्बीही त्यात अडकला.
पवारांना माणसं चांगली ओळखता येतात. नेतृत्वगुणांची त्यांना चांगली पारख आहे. अनेकदा एका व्यक्तीने काढलेले पक्ष हे खासगी संस्थान होऊन जाते. त्यात इतरांना फारसे स्थान नसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तसे नाही. तेथे इतरांच्या मतालाही तितकीच किंमत आहे. आर. आर. पाटील हे त्यांचे फाईंड. त्यांनीच त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्यांना पुढे आणले. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. योग्य जागी योग्य मंडळी. हे त्यांचे धोरण म्हणूनच त्यांनी सुरू केलेल्या संस्थांवरची मंडळी चांगल्या पार्श्वभूमीची असतात. यशवंतराव चव्हाण सेंटरची जबाबदारी सध्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या विनायकदादा पाटील यांच्यावर सोपवली.
पवारांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत. त्यांचा वेधही घेणे अवघड आहे. पण एक बाब मात्र खरी की पवारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही.
___________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*

    _*🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_🎈
_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓
.       _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *ℰ⍲‿⍲ℰ*

0

शरद पवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी काम केले आहे.

जन्म आणि शिक्षण:
  • शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला.
  • त्यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले.
राजकीय कारकीर्द:
  • १९६७ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.
  • १९७८ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
  • त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.
  • १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
  • ते अनेक वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत आणि त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणूनही काम केले आहे.
सामाजिक कार्य:
  • शरद पवार यांनी शिक्षण, कृषी आणि सामाजिक विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  • त्यांनी महाराष्ट्रात अनेक विकास प्रकल्प सुरू केले.
पुरस्कार आणि सन्मान:
  • शरद पवार यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
  • त्यांना अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.
टीका:
  • शरद पवार यांच्यावर काही वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, परंतु ते आरोप सिद्ध झालेले नाहीत.
  • त्यांच्या काही धोरणांवर टीका झाली आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3500

Related Questions

भाऊसाहेब खाणारे, पुणे कोण आहेत?
आदिती तटकरे कोण आहेत?
शिवेंद्रराजे विजयसिंह भोसले यांची सविस्तर माहिती हवी आहे?
परमेश्वराचे मुकुंद राजाचे गाव कोणते होते?
राजाची करतो या पाठाचे लेखक कोण आहेत?
राजाची कर्तव्य या पाठाचे लेखक कोण?
भारतीय राजकारणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विभूतींविषयी चर्चा कशी कराल?