शब्दाचा अर्थ भूगोल संकल्पना

उगमस्थान म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

उगमस्थान म्हणजे काय?

3
नदी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा रुंद प्रवाह होय. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणाऱ्या नैसर्गिक जलप्रवाहाला नदी असे म्हणतात. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशाचे जल नि:सारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात.[१] नदी ही एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाते.

नदी म्हणजे नैसर्गिकरीत्या वाहणारा थंड पाण्याचा प्रवाह आहे. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. आणि हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते. अति प्रचंड नद्यांना नद असे म्हणतात. उदा. ब्रह्मपुत्रा नद. कमी रुंदीच्या जलप्रवाहाला झरा, ओहोळ, नाला, किंवा ओढा म्हणतात. नदी असे म्हणण्यासाठी कोणतेही प्रमाणित नियम नाहीत. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात. समुद्रापासून दूर असलेल्या मोठ्या जलाशयाला, तलाव, तळे किंवा सरोवर म्हणतात.[२] परंतु हे दरच वेळी असेल असे नव्हे.[३]

नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वाहत येतयेत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हणजेच साठ्यातूनही येते. हिमालय/हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या बहुधा अशा प्रकारच्या असतात. उदा. बियास नदी.
उत्तर लिहिले · 1/12/2019
कर्म · 9405
0

उगमस्थान म्हणजे नदी, ओढा किंवा इतर जलस्त्रोताचा आरंभ बिंदू. याला 'स्रोत', 'आगम' किंवा 'उद्गम' असेही म्हणतात.

उगमस्थानाचे काही प्रकार:

  • नदीचा उगम: नदीचा उगम सहसा डोंगराळ भागात, हिमनदीमध्ये किंवा तलावामध्ये असतो.
  • झऱ्याचा उगम: झऱ्याचा उगम जमिनीतून पाण्याचे नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याने होतो.
  • तलावाचा उगम: तलावाला अनेक लहान नद्या किंवा झरे येऊन मिळतात.

उगमस्थान हे जलचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. तेथूनच पाणी प्रवाहित होऊन नद्या, तलाव आणि समुद्रांना मिळते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील साइटला भेट देऊ शकता:

विकिपीडिया
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?