3 उत्तरे
3
answers
नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय?
2
Answer link
नैसर्गिक आपत्ती हा नैसर्गिक धोक्याचा एक प्रभाव असतो (उदाहरणार्थ पूर, झंझावात, चक्रीवादळ, ज्वालामुखी, भूकंप, उष्णतेची लाट किंवा भूस्खलन). यामुळे आर्थिक, पर्यावरणात्मक अथवा जीवहानी होऊ शकते. प्रभावित लोकसंख्येच्या हानीप्रवणतेवर, हानी अवलंबून असते. हानी त्या लोकांच्या कणखरपणावरही अवलंबून असते. “धोका जेव्हा हानीप्रवणतेस भेटतो तेव्हा आपत्ती येत असते” ह्या उद्गारांत हेच तथ्य सामावलेले आहे. म्हणूनच जी क्षेत्रे हानीप्रवण नसतात तिथे, नैसर्गिक धोकाही, नैसर्गिक आपत्ती आणू शकत नाही. उदाहरणार्थ निर्जन भागात घडून आलेला तीव्र भूकंपही, आपत्ती आणू शकत नाही. यातील नैसर्गिक शब्दाबद्दल वाद आहेत, कारण माणसे त्यात समाविष्ट असल्याखेरीज एखादी घटना ही, धोका किंवा आपत्ती ठरत नाही. नैसर्गिक धोका आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यातील फरकाचे ठोस उदाहरण म्हणजे १९०६ साली सॅन फ्रँसिस्को मध्ये झालेला भूकंप ही आपत्ती होती, तर सर्वसामान्यपणे भूकंप हा धोका असतो. ह्या लेखात दखलपात्र नैसर्गिक आपत्तींची ओळख करून दिलेली आहे. नैसर्गिक आपत्तींच्या सर्वंकष यादीकरता संदर्भित यादी पहावी.
अनुक्रमणिका
१. भूपृष्ठीय आपत्ती
१.१. हिमस्खलन
१.२. भूकंप
१.३. ज्वालामुखी
२. भूपृष्ठ-जलीय आपत्ती
२.१. पूर
२.२. अपान-विस्फोट
२.३. सुनामी
३. हवामानशास्त्रीय आपत्ती
३.१. हिमवादळ
३.२. वादळी वारे
३.३. अवर्षण
३.४. गारपीट
३.५. उष्णतेची लाट
३.६. झंझावात
४. आग
५. आरोग्य आपत्ती
५.१. साथीचे रोग
५.२. दुष्काळ
६. अवकाशीय आपत्ती
६.१. आघात
६.२. सौर वादळे
६.३. गॅमा किरण विस्फोट
७. आंतरराष्ट्रीय कायद्याचे संरक्षण
८. हे ही पाहा
९. संदर्भ
१०. बाह्य दुवे
१.०. भूपृष्ठीय आपत्ती
१.१. हिमस्खलन
१९१० वेलिंग्टन हिमस्खलन
१९१० रॉजर्स पास हिमस्खलन
१९५४ ब्लोन्स हिमस्खलन
१९९९ गाल्तुर हिमस्खलन
२००२ कोल्का-कार्मादोन खडक बर्फ स्खलन
अनुक्रमणिका
१. भूपृष्ठीय आपत्ती
१.१. हिमस्खलन
१.२. भूकंप
१.३. ज्वालामुखी
२. भूपृष्ठ-जलीय आपत्ती
२.१. पूर
२.२. अपान-विस्फोट
२.३. सुनामी
३. हवामानशास्त्रीय आपत्ती
३.१. हिमवादळ
३.२. वादळी वारे
३.३. अवर्षण
३.४. गारपीट
३.५. उष्णतेची लाट
३.६. झंझावात
४. आग
५. आरोग्य आपत्ती
५.१. साथीचे रोग
५.२. दुष्काळ
६. अवकाशीय आपत्ती
६.१. आघात
६.२. सौर वादळे
६.३. गॅमा किरण विस्फोट
७. आंतरराष्ट्रीय कायद्याचे संरक्षण
८. हे ही पाहा
९. संदर्भ
१०. बाह्य दुवे
१.०. भूपृष्ठीय आपत्ती
१.१. हिमस्खलन
१९१० वेलिंग्टन हिमस्खलन
१९१० रॉजर्स पास हिमस्खलन
१९५४ ब्लोन्स हिमस्खलन
१९९९ गाल्तुर हिमस्खलन
२००२ कोल्का-कार्मादोन खडक बर्फ स्खलन
0
Answer link
मला वाटते या अगोदर या प्रश्नाचे उत्तर दिले होते. नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गाने आणलेली आपत्ती, उदाहरणार्थ भूकंप, अतिवृष्टी, त्सुनामी लाटा, वादळ, चक्रीवादळ, ढगफुटी याना नैसर्गिक आपत्ती म्हणतात.
0
Answer link
नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गामध्ये अचानक उद्भवलेल्या आणि मानवी जीवनावर तसेच मालमत्तेवर विपरित परिणाम करणाऱ्या घटना. या घटनांमध्ये भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, पूर, दुष्काळ, वादळे, भूस्खलन, हिमस्खलन आणि वणवे यांचा समावेश होतो.
नैसर्गिक आपत्तींचे काही मुख्य प्रकार:
- भूकंप: भूगर्भातील हालचालीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे कंपन.
- त्सुनामी: समुद्रातील भूकंपांमुळे निर्माण होणाऱ्या मोठ्या लाटा.
- ज्वालामुखी: पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, राख आणि वायू बाहेर पडणे.
- पूर: अतिवृष्टी किंवा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे मैदानी भागात पाणी शिरणे.
- दुष्काळ: दीर्घकाळ कमी पाऊस झाल्यास पाण्याची कमतरता निर्माण होणे.
- वादळे: वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणारी जोरदार वारे.
- भूस्खलन: जमिनीचा भाग गुरुत्वाकर्षणामुळे खाली सरकणे.
नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. या आपत्तीमुळे अनेक लोक बेघर होतात, शेती आणि इतर व्यवसायांचे नुकसान होते. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नाहीत, परंतु योग्य उपाययोजना करून त्यांचे परिणाम कमी करता येतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
- आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र शासन: dmrd.maharashtra.gov.in