व्यक्तिमत्व इतिहास

डॉ. बी. आर. आंबेडकर कोण होते?

2 उत्तरे
2 answers

डॉ. बी. आर. आंबेडकर कोण होते?

7
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ.आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.

“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला
माणसाला स्वाभिमान शिकवला
ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले
असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.”

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – Dr. B. R. Ambedkar Biography
नाव: डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म 14 एप्रील 1891
जन्मस्थान महू, इंदौर मध्यप्रदेश
वडिल रामजी मालोजी सकपाळ
आई भीमाबाई मुबारदकर
पत्नी: पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956)
शिक्षण: एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर आॅफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर आॅफ सायन्स
संघ: समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी,
अनुसुचित जाति संघ
राजनितीक विचारधारा: समानता
प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन आॅफ कास्ट)
विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )
मृत्यु: 6 डिसेंबर 1956
भीमराव आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.

भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत ब.याच प्रमाणात बदल केला.

भीमराव आंबेडकरांचे प्रारंभिक जीवन – Dr. Babasaheb Ambedkar Information
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा Dr.Br Ambedkar यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती.

3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता.यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.
उत्तर लिहिले · 25/11/2019
कर्म · 9405
0

डॉ. बी. आर. आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar), ज्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते, ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते.

त्यांचे भारतीय इतिहासातील योगदान:

  • ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.
  • दलित आणि मागासलेल्या वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला.
  • त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आणि सामाजिक समानता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले.
  • ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2580

Related Questions

कालगणना करण्याची एकके कोणती? इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे लिहा. स्वयंप्रकाशी साधने लिहा.
महाराष्ट्रातील कोणता सण राज्य सण म्हणून ओळखला जातो?
भारतातील पहिले महिला राष्ट्रपती कोण?
महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
क्विट इंडिया मूव्हमेंट कोणत्या वर्षी सुरू झाले?
जय जवान जय किसान हे घोष वाक्य कोणी दिले?
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण?