भूगोल पृथ्वी

पृथ्वी कोणत्या दिशेला फिरते?

2 उत्तरे
2 answers

पृथ्वी कोणत्या दिशेला फिरते?

7
पृथ्वीचे परिवलन --:


पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.

पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी बरोबर एक दिवसात अथवा २४ तासात एक फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रति दिवशी हा फरक ८६,०००(२४ तासांचे सेकंद)/३६५.२५(एका वर्षातील दिवस) = ३ मिनिटे ५६ सेकंद एवढा असतो.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 24/11/2019
कर्म · 19610
0

पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच आपल्याला सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असा भास होतो.

हे खालील चित्राद्वारे अधिक स्पष्ट होते:

पृथ्वीची दिशा

  • पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला अ axial rotation म्हणतात.
  • पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला orbital revolution म्हणतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2800

Related Questions

कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात?
०° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात?
आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे?
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागांमध्ये विभागते?
66° 30' उत्तर अक्षवृत्त म्हणजे काय?
रेखा वृत्ते कशी असतात?
पृथ्वीवरील पूर्व पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात?