वित्त पैसा अर्थशास्त्र

पैसा म्हणजे काय? पैशांचे विविध प्रकार स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

पैसा म्हणजे काय? पैशांचे विविध प्रकार स्पष्ट करा?

9
पैसा म्हणजे काय?
पैसा = चलन + पत
सामान्यतः आपण चलन (करन्सी) व पत (क्रेडिट) यात फरक करत नाही. चलन व पत यांनी मिळून पैसा बनलेला असतो.
थोडक्यात फक्त छापलेले चलन म्हणजे पैसा नव्हे. तो तर पैशाचा फक्त दृश्य भाग झाला. त्यापलीकडे 'पत' नावाचा अदृश्य भागदेखील कार्यरत असतो. पत ही चलनाने निर्माण केलेली क्षमता किंवा शक्ती असते. बाजारात चलन कमी व पत जास्त असते. चलन पाया तर पत ही इमारत असते.
चलन मूर्त वस्तू तर पत ही त्याची सावली असते. वस्तूशिवाय सावली असू शकत नाही तसे चलनाशिवाय बाजारात पतनिर्मिती होत नाही.

* पैसा ही वस्तू व्यवहाराचे सर्वात सक्षम साधन आहे. वस्तूंच्या अदलाबदलीने होणाऱ्या व्यवहारांमधील प्रचंड गैरसोय पैशाच्या वापराने दूर झाली.
* वस्तू आणि सेवा या दोन्हींचे मूल्य पैशात करता येत असल्यामुळे पैसा हे माध्यम सर्वच व्यवहारांना उपयुक्त आहे.
* पैसा हे संपत्तीचे अर्थात श्रीमंतीचे मोजमाप आहे.

पैसा कसा मिळवावा?
* "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी', ही तुकोबांची उक्ती डोळ्यासमोर ठेवून पैसा मिळवावा आणि खर्च करावा.
धन मिळवण्याच्या मार्गाच्या भलेपणाविषयी थोडी जरी शंका असेल, तरी तो मार्ग त्याज्य समजावा.
* प्रामाणिकपणे कोणाचीही फसवणूक न करता आणि उचित व्यवहारांचा अवलंब करून पैसा मिळवावा.
* "पैसा म्हणजेच सर्व काही आहे,' हे मानणारे पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. मिळविलेल्या पैशाचा आनंद घेता येईल इतकाच पैसा मिळवावा.

उदा:- पंधरा हजार रुपयांत घर कसे चालवावे?
* तुम्ही ज्यावर खर्च करता, यावरून तुमच्या आयुष्यात महत्त्व कशाला आहे, ते कळते.
* आपला जमा आणि खर्च किती होतो, याचा अनेक जणांना पत्ताच नसतो. 80ः20 तत्त्वाचा उपयोग करून महत्त्वाचे खर्च लिहून ठेवावेत. सर्वात जास्त रकमेपासून खर्च कमी करायला सुरवात करावी.

धन्यवाद....
उत्तर लिहिले · 22/11/2019
कर्म · 5540
0

पैसा म्हणजे काय?

पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे. वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी तसेच देणी देण्यासाठी याचा उपयोग होतो. पैसा हे मूल्यमापनाचे एकक आहे.

पैशांचे विविध प्रकार:

  • वस्तू पैसा (Commodity Money): वस्तू पैसा म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात असलेला पैसा. उदा. धान्य, गुरेढोरे, मीठ, मसाले, इत्यादी. वस्तू पैसा चलनात वापरला जात असे.
  • धातूचा पैसा (Metallic Money): धातूचा पैसा म्हणजे धातूच्या स्वरूपात असलेला पैसा. उदा. सोने, चांदी, तांबे, पितळ या धातूंच्या नाण्यांचा उपयोग केला जात असे.
  • कागदी पैसा (Paper Money): कागदी पैसा म्हणजे कागदाच्या स्वरूपात असलेला पैसा. हा पैसा सरकार किंवा मध्यवर्ती बँक जारी करते.
  • प्लास्टिक मनी (Plastic Money): प्लास्टिक मनी म्हणजे प्लास्टिकच्या स्वरूपात असलेला पैसा. उदा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड इत्यादी.
  • डिजिटल पैसा (Digital Money): डिजिटल पैसा म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेला पैसा. हा पैसा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, डिजिटल वॉलेट्स इत्यादी माध्यमांद्वारे वापरला जातो.

टीप: पैशांचे प्रकार हे त्या त्या वेळेनुसार बदलत गेले आहेत.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळाची माहिती?
अतिधारण नफा हा वित्तपुरवठ्याचा कोणता स्त्रोत आहे?
अंकेश्वर वादाचा पुरस्कार करणाऱ्या संस्था कोणत्या?
आर्थिक प्रश्न कसा उभा राहतो?
संस्थात्मक वित्तव्यवस्थापनाच्या तत्वांची प्रस्तावना, संस्थात्मक वित्तव्यवस्थेच्या स्त्रोतांची प्रस्तावना किंवा व्याख्या?
सिडबी म्हणजे काय?
नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण काय आहे?