औषधे आणि आरोग्य एचआयव्ही आरोग्य

मी ३ ते ४ जणांसोबत असुरक्षित सेक्स केला आहे तर मला HIV होईल का?

4 उत्तरे
4 answers

मी ३ ते ४ जणांसोबत असुरक्षित सेक्स केला आहे तर मला HIV होईल का?

4
काही सांगता येत नाही कारण जर जोडीदार एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर होऊ शकते. पण लवकरच ब्लड टेस्ट करा. काही सरकारी हॉस्पिटल मध्ये फ्री चेकअप होते. तेव्हा काळजी करू नका. मन शांत ठेवा. असे शक्यतोवर होत नाही, पण काळजी घेतली तर बरे. धन्यवाद.
उत्तर लिहिले · 20/11/2019
कर्म · 3580
3

१००० मध्ये १०-५० लोकांना एचआयव्हीची शक्यता नाकारता येत नाही. शक्यता कमी आहे पण नाकारता येत नाही.

जर तपासणी करून तुम्ही पॉझिटिव्ह नाही दिसले म्हणजे तुम्हाला आतापर्यंत एचआयव्ही नसू शकेल, पण याचा अर्थ त्यांना एचआयव्ही नसेल असा घेऊन परत चुकूनही असुरक्षित संबंध येऊ देऊ नये.

या उत्तरावर काही प्रश्न पडले असतील तर विचारा.

उत्तर लिहिले · 25/11/2019
कर्म · 15400
0
असुरक्षित लैंगिक संबंधातून HIV (Human Immunodeficiency Virus) होण्याची शक्यता असते. असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे कंडोमचा वापर न करता संबंध ठेवणे. एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत असुरक्षित संबंध ठेवल्यास HIV चा धोका वाढतो.
HIV चाचणी करणे हाच HIV आहे की नाही हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे.
HIV च्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, पुरळ येणे, रात्री घाम येणे, स्नायू दुखणे, घसा खवखवणे, थकवा येणे, सुजलेल्या लिम्फ नोड्स आणि तोंडाला व्रण येणे यांचा समावेश होतो.
प्रतिबंधात्मक उपाय:
  • लैंगिक संबंध टाळा.
  • कंडोमचा योग्य वापर करा.
  • HIV चाचणी नियमितपणे करा.
अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1620

Related Questions

एचआयव्हीची ओळख कशी होते?
एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या जखमेचा सामान्य व्यक्तीच्या जखमेशी स्पर्श झाल्यास एचआयव्हीची बाधा होईल का?
शारीरिक संबंध ठेवून जर HIV होतो तर मग लग्न कशाला करायचे, मला पडलेला प्रश्न, उत्तर कोणी सांगू शकेल का? मी दोन मुलींसोबत बिना कंडोमचे संबंध ठेवले तर मला भीती वाटत आहे की मला HIV झालेला आहे. असे असेल का? माझ्या शंकेचे निरसन करा. कृपा करून सांगा HIV कधी होतो आणि त्या व्यक्तीला नसेल तर आपल्याला संबंध ठेवल्या नंतर होतो का?
माणसाला एचआयव्ही (HIV) झाली हे किती दिवसात कळते?
माझा एक मित्र आहे, त्याला आणि मला दोघांनाही पोटाचा नेहमी त्रास असतो, जसे की गॅस वगैरे. त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित न लागल्यामुळे शरीर थकून जाते, मसल्स लहान होत आहेत. त्याला भीती वाटत आहे की त्याला HIV झाला आहे. तर, तब्येत खराब होणे आणि HIV चा काही संबंध आहे का, कृपया सांगा?
एचआयव्ही टेस्ट मध्ये रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तीला एचआयव्हीचा धोका असतो का?
एचआयव्ही कशामुळे होतो?