शिक्षण सामान्य ज्ञान दिनविशेष दिनदर्शिका

14 नोव्हेंबर बालदिन: जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन का साजरा केला जातो?

3 उत्तरे
3 answers

14 नोव्हेंबर बालदिन: जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन का साजरा केला जातो?

10
दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिन (Bal Din) साजरा केला जातो, याच दिवशी 1889 मध्ये भारताचे सर्वात प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा जन्म झाला होता. लहान मुलांवरील नेहरूंचे प्रेम पाहता हा दिवस पुढे बाल दिन म्ह्णून साजरा केला जाऊ लागला. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टिकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यात बाल कल्याण उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. ''मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे'',  अशी भूमिका मांडणारे नेहरू हे आजही चाचा नेहरू म्हणून सर्वत्र ओळखले जातात.



बालदिनाचा इतिहास
1954 साली संयुक्त राष्ट्राने  20 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली होती.  असं असंल तरीही, जगातील विविध देशांमध्ये विविध तारखांना बालदिन पार पडतो. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी आपल्याकडे हा दिवस बालदिन म्ह्णून साजरा केला जातो. नेहरूंना सुरुवातीपासूनच लहान मुलांच्या प्रति विशेष जिव्हाळा होता. ही बाब लक्षात घेता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना आदरांजली देण्याच्या हेतूने भारत सरकार कडून हा दिवस बाल दिन म्ह्णून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. 27 मे 1964 साली सर्वांनुमताने हा दिवस बाल दिन म्ह्णून घोषित करण्यात आला.

लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना बनवल्या होत्या. यासाठीच 'बाल दिन'च्या निमित्ताने विविध ठिकाणी लहानग्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

या सगळ्याच्या पलीकडे देखील जाऊन विचार केल्यास बालदिनाच्या निमित्ताने वयाने प्रौढ असलेल्या पण मनाने बाल अशा मंडळींना देखील पुन्हा एकदा आपले बालपणीच्या आठवणीत रममाण होण्याची ही एक नामी संधी आहे.
उत्तर लिहिले · 14/11/2019
कर्म · 458580
3
🤹🏼‍♂ *बालदिन का साजरा केला जातो?*

◾ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी लहान मुले म्हणजे जीव की प्राण अशीच होती. ते मुले ही देवाघरची फुले आहेत, असे म्हणत असत.

◾ चिमुरड्यांच्या लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

🎯 *उद्दिष्टे काय?*  :

● बालकांच्या गरजा व हक्क यांविषयी जाणीवजागृती करणे.
● बालकल्याणकारी योजना वाढीस लावणे.
● बालकांमध्ये सांप्रदायिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करणे.
● बालकांमध्ये विविध पंथ वा धर्मांबाबत संहिष्णुता निर्माण करून सामंजस्याची भावना वाढीस लावणे.
● जगभरातील मुलामुलींमध्ये बंधुभाव वाढीस लावणे.
● बालकांचे बालपण अधिक समृद्ध बनवणे.
● बालकांमध्ये ‘विश्वकुटुंबाची’ संकल्पना वाढीस लावणे.

🧐 *बालदिन इतिहास* :

● 1925 पासून बालदिन साजरा केला जातो.

● 1953 मध्ये बालदिनाला जगभरात मान्यता मिळाली.

● संयुक्त राष्ट्र संघाने बालदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

● इतर देशांप्रमाणे भारतातही हा दिवस 20 नोव्हेंबरला साजरा होत असे.

👉 आज 'बाल दिन'च्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाच्या संकल्प करूयात. त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील. या दृष्टीने प्रयत्न करूया.
_____
*बालदिन- २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात मात्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.*

भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्यान प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.जागतिक पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला बालदिन उर्फ चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. १९५९ सालापूर्वीपर्यंत बालदिन ऑक्टोबर महिन्यात असायचा. १९५४ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच बालदिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे होता.

२० नोव्हेंबर हीच तारीख निवडण्याचे कारण असे की १९५९ मध्ये ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद (डिक्लरेशन ऑफ चिल्ड्रन्स राइट्स) स्वीकारली. शिवाय १९८९ मध्ये ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर सह्या झाल्या. हे हक्क आतापर्यंत १९१ राष्ट्रांनी मान्य केले आहेत.

ह्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, भारतात मात्र माजी पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्याध प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत.
उत्तर लिहिले · 14/11/2019
कर्म · 569265
0
दिव

भारतात, 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ समर्पित आहे.

बालदिन साजरा करण्यामागची काही महत्त्वाची कारणे:

  • जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवरील प्रेम:

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांबद्दल खूप प्रेम होते. ते नेहमी मुलांमध्ये रमून जात असत आणि त्यांना 'भारताचे भविष्य' मानत. मुलांवरील त्यांचे प्रेम आणि आपुलकी या आदराने त्यांना 'चाचा नेहरू' म्हणून ओळखले जाते.

  • मुलांच्या हक्कांसाठी जागरूकता:

    बालदिन हा दिवस मुलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

  • देशाचे भविष्य:

    मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार मिळणे आवश्यक आहे. या उद्देशाने बालदिन साजरा केला जातो.

बालदिनाच्या निमित्ताने शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मुले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात आणि चाचा नेहरूंच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी सांगतात.

अधिक माहितीसाठी:

  • युनिसेफ (UNICEF) - बालकांच्या हक्कांसाठी कार्य करणारी संयुक्त राष्ट्र संघाची संस्था.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5240

Related Questions

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Slogan - पोषवाक्य टिपा लिहा?
उदाहरण द्या 1. स्वयंपूर्ण?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे?
How many districts in Maharashtra?
भारतीय स्टेट बँक स्थापना दिवस कधी साजरा करतात?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कधी असतो?