राजकारण राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट

राष्ट्रपती राजवटीचे परिणाम काय?

3 उत्तरे
3 answers

राष्ट्रपती राजवटीचे परिणाम काय?

6
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यातील विधिमंडळ कोणत्याही प्रकारे काम करू शकणार नाही. सर्वसामान्यांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारांवर गदा येणार नाही. त्यांची सर्व कामे जशीच्या तशी सुरू राहतील.
उत्तर लिहिले · 12/11/2019
कर्म · 458580
5
  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याचे सर्वाधिकार राष्ट्रपतींकडे जातात. यानंतर विधिमंडळाचे काम संसद पाहते.
  • राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणं गरजेचं असतं. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्या राज्यात सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू असते. हा कालावधी वाढवायचा झाल्यास परत संसदेची मंजुरी घेणं आवश्यक असतं. अशाप्रकारे दर सहा महिन्यांनी मान्यता मिळवून राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त तीन वर्षे लागू राहू शकते
  • लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश देऊ शकतात. या घोषणेच्या पूर्ततेसाठी प्रासंगिक अथवा आनुषांगिक व्यवस्था राष्ट्रपती करू शकतो.
परंतू उच्च न्यायालयाची सत्ता स्वतःकडे अगर दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. या सर्व परिस्थितीमध्ये घटकराज्याच्या विधानसभेचे विसर्जन करू शकतो

  • राष्ट्रपती राजवटीदरम्यान सत्तास्थापनेचा दावा करता येऊ शकतो. बहुमताचा आकडा दाखवून सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. सहा महिन्यात सत्ता स्थापन न झाल्यास पुन्हा निवडणुकांचा विचार होऊ शकतो. राज्यात सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते.
  • राष्ट्रपती राजवटीचा न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान जसे नागरिकांचे मूलभूत अधिकार संकुचित केले जातात, तसं राष्ट्रपती राजवटीत होत नाहीत.
  • राष्ट्रपती राजवटीत मुख्य सचिव राज्यपालांच्या सल्ल्यानं निर्णय घेतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नसल्यानं राष्ट्रपती राजवटीत कोणतेही धोरणात्मक निर्णय होत नाहीत. त्याचा परिणाम राज्यावर आणि प्रशासनावर होतो. यामुळे नैसर्गिक संकटं आल्यास मदत करण्यात अनेक अडचणी येतात. याशिवाय निर्णय घेण्यासाठी सरकारच अस्तित्वात नसल्यानं विकासकामांवर मोठा परिणाम होतो.

.
.
.
               ◆धन्यवाद.☺
👍
उत्तर लिहिले · 13/11/2019
कर्म · 10040
0
राष्ट्रपती राजवटीचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
  • राज्याचे सरकार बरखास्त: राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे सरकार बरखास्त होते आणि राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल राज्याचा कारभार पाहतात.
  • विधानसभा निलंबित किंवा बरखास्त: राष्ट्रपती राजवटीत विधानसभेला निलंबित केले जाऊ शकते किंवा बरखास्त देखील केले जाऊ शकते.
  • मंत्रिपरिषद बरखास्त: राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले जाते.
  • अधिकार: राज्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे जातात, जे राज्यपालांच्या माध्यमातून वापरले जातात.
  • कायद्यांचे अधिकार: राज्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला मिळतो.
  • मूलभूत हक्कांवर परिणाम नाही: राष्ट्रपती राजवटीत नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर कोणताही परिणाम होत नाही.
  • नियंत्रण: राज्याचा कारभार केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केला जातो.
Here are the effects of President's Rule:
  • State Government Dismissal: The state government is dismissed, and the Governor administers the state on behalf of the President.
  • Assembly Suspended or Dissolved: The Legislative Assembly may be suspended or dissolved.
  • Council of Ministers Dismissed: The Chief Minister and their Council of Ministers are dismissed.
  • Powers: The powers of the state go to the President, who exercises them through the Governor.
  • Legislative Powers: The Parliament gets the power to make laws for the state.
  • No Impact on Fundamental Rights: There is no impact on the fundamental rights of citizens.
  • Control: The administration of the state is controlled by the central government.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2340

Related Questions

ओ/सी कुंवर केशरसिंह, गव्हर्मेंट ऑफ इंडिया कोण आहेत? आदिवासी
आदिवासी, भारत सरकार हे काय आहे?
ग्रामसभेमध्ये कोणकोणत्या कामांसाठी मीटिंग असते?
भारताचे सरकार कोण आहे?
भारताचे विद्यमान कृषी मंत्री कोण आहेत?
स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी काय करावे लागते?
सांगलीमध्ये निवडणूक कार्यालय कुठे आहे?