2 उत्तरे
2
answers
बाईक (मोटरसायकल) मध्ये डिझेल इंजिन का नसते?
6
Answer link
🏍 *का नसतं बाईक मध्ये डिझेल इंजिन? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल !*
🛵 मग का नाही वापरत बाईक मधे डिझेल इंजिन? आम्ही आज ह्या लेखात तुम्हाला ह्याच विषयी सांगणार आहोत. डिझेल इंजिन चा कंप्रेशन रेशिओ पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त आहे. डोक्यावरून गेलं असेल तर सोप्प्या भाषेत सांगतो. इंधनाला लागणारी उष्णता वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा डिझेल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त असते. त्यामुळे ह्या उच्च दबावाला सांभाळण्यासाठी इंजिन मोठे आणि टणक धातूचे बनलेले असावे लागते. त्यामुळे डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा मोठे असते आणि ते बाईक सारख्या छोट्या वाहनांवर बसवता येत नाही. उच्च कम्प्रेशन मुळे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त आवाज आणि वायब्रेशन निर्माण करते.
🤔 ह्या उच्च कंप्रेशन मुळेच हे इंजिन बनवण्यासाठी लागणारे धातू महाग मिळतात आणि त्यामुळे ह्याची किंमत सुद्धा वाढते. कमीतकमी ५०,००० चा फरक पडू शकतो. बाईक सारख्या छोट्या वाहनांची एवढी किंमत मोजणे परवडत नाही. मेन्टेनस आणि देखभालीचा खर्च येतो तो वेगळा. तसेच पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिन मध्ये दर ५००० किलोमीटर वर तेल बदलावे लागते पेट्रोल इंजिनासाठी हेच १०,००० किलोमीटर आहे.
❇ ह्या उच्च वायब्रेशन आणि आवाजाला सांभाळण्यासाठी छोट्या वाहनाला शक्य नसतं. त्यामुळे बाईक सारख्या छोट्या वाहनांमध्ये डिझेल इंजिन चा वापर केला जात नाही. तसेच डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत १३% अधिक कार्बनडायऑक्साईड बाहेर फेकते. म्हणून हे इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत जास्त प्रदूषण करते जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणून ह्याचा उपयोग फक्त मोठ्या वाहनांमध्येच केला जातो. मोठी वाहने हि छोट्या वाहनांच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे डिझेल मुळे होणारे प्रदूषण हे कमी होते.
✅ डिझेल इंजिन ला हवा सिलेंडर मध्ये ढकलण्यासाठी टर्बोचार्जर किंवा सुपरचार्जर ची आवश्यकता असते ज्यामुळे त्याची साईज तर वाढतेच पण किंमत ही वाढते. तसेच डिझेल इंजिन ला सुरु करण्यासाठीच जास्त ऊर्जा लागते जी छोट्या वाहनांसाठी योग्य निवड नसते. रॉयल इन्फिल्ड ने सर्व चॅलेंजेस स्वीकारत तत्यांची पहिली डिझेल इंजिन बुलेट टॉरस लाँच केली, पण बुलेट ला आवाज जास्त होता आणि इंजिनामधे ही त्रुटी होत्या. तसेच जास्त वायब्रेशन मुळे आरोग्यविषयक समस्या येऊ लागल्या. त्यामुळे बाईक ला कार्बन उत्सर्जनाचे निकष भारतात पार करता आले नाहीत.
😊 हीच कारणं आहेत बाईक मधे डिझेल इंजिन नसण्याची. आता आपल्या मागे सतत हे डिझेल इंजिन च रडगाणं म्हणणाऱ्या बाइकवाल्या मित्राला ही हा लेख वाचायला द्या आणि इतरांसोबत ही शेयर करा.

0
Answer link
मोटारसायकलमध्ये डिझेल इंजिन न वापरण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
-
वजन: डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिनच्या तुलनेत खूप जड असते. मोटारसायकलला हलके ठेवणे आवश्यक असते, ज्यामुळे तिची गती आणि हाताळणी सुधारते.
-
आकार: डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिनपेक्षा मोठे असते. मोटारसायकलमध्ये लहान आकारमानाचे इंजिन बसवणे सोपे असते.
-
खर्च: डिझेल इंजिन बनवण्यासाठी जास्त खर्च येतो, त्यामुळे मोटारसायकलची किंमत वाढते.
-
प्रदूषण: डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनच्या तुलनेत जास्त प्रदूषण करते.
-
कार्यक्षमता: पेट्रोल इंजिन मोटारसायकलसाठी अधिक कार्यक्षम असते, कारण ते जास्त RPM (revolution per minute) देते, ज्यामुळे वेग वाढण्यास मदत होते.
या कारणांमुळे मोटारसायकलमध्ये सहसा डिझेल इंजिन वापरले जात नाही.