2 उत्तरे
2
answers
एंग्लो इंडियन म्हणजे काय?
3
Answer link
अँग्लो इंडियन’ हा शब्द प्रथम भारतात राहणाऱ्या ब्रिटिश लोकांसाठी वापरला जात होता. त्या काळात ब्रिटिश आणि भारतीय स्त्री-पुरुषांना झालेल्या संततीला ‘युरेशियन’ असे म्हणत. पुढे हे शब्द गेले आणि ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री यांच्यापासून झालेल्या संततीलाच ‘अँग्लो इंडियन’ समाज असे नाव पडले.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात अंमल असताना, विशेषत: अठराव्या, एकोणिसाव्या शतकात त्यांच्या सन्य दलात साधारणत: २००० ब्रिटिश अधिकारी आणि ४० हजार ब्रिटिश सनिक होते. परंतु ब्रिटिश स्त्रिया त्या काळात भारतात येत नव्हत्या. त्यामुळे अनेक ब्रिटिश अधिकारी आणि सनिकांनी भारतीय स्त्रियांशी विवाह केले. या ब्रिटिश-भारतीय विवाहातून निर्माण झालेल्या संततीला अँग्लो इंडियन असे नाव झाले. १९ व्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश स्त्रिया भारतात येऊ लागल्या आणि त्यामुळे ब्रिटिशांचे भारतीय स्त्रियांशी विवाहांचे प्रमाण नगण्यच झाले. पुढे १८५७ च्या शिपायांच्या बंडानंतर असे विवाह होण्याचे थांबले.
पुढे अँग्लो इंडियनांचा विवाह अँग्लो इंडियनांशीच करण्याची पद्धत सुरू झाली. त्यातून अँग्लो इंडियन समाज तयार झाला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय प्रदेशात अँग्लो इंडियन समाजाची लोकसंख्या साधारणत: पाच लाख होती. परंतु त्यानंतर त्या समाजातल्या अनेक लोकांनी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा वगरे देशांत स्थलांतर केले तर काही लोक भारतातल्या विविध समाजांत विलीन झाले. २०१० सालच्या जनगणनेत या समाजाची संख्या दीड लाख इतकी रोडावली. या समाजाने आपली जीवनशैली, पेहराव, भाषा ब्रिटिश पद्धतीने ठेवून भारतीय समाजापेक्षा वेगळेपण जपले. अँग्लो इंडियन्स बहुधा रेल्वे, कस्टम्स, एक्साइज, शैक्षणिक संस्थांत नोकरी करताना आढळतात. चेन्नई, बेंगळूरु, मुंबई, दिल्ली, म्हैसूर या शहरांमध्ये या समाजाची वस्ती अधिक आहे. भारतीय लोकसभेत या समाजासाठी दोन प्रतिनिधींची जागा राखीव आहे. क्रिकेट खेळाडू रॉजर बिन्नी, बिलियर्ड्स खेळाडू विल्सन जोन्स, सेवानिवृत्त एअर व्हाइस मार्शल मॉरिस बार्कर वगरे अँग्लो इंडियन व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे .
आतापर्यंतचे लोकसभेतील एंग्लो इंडियन खासदार
१९५२ ते १९५७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९५२ ते १९५७ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९५७ ते १९६२ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९५७ ते १९६२ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९६२ ते १९६७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९६२ ते १९६७ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९६७ ते १९७० - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९६७ ते १९७० - श्री. ए.इ.टी. बैरो
१९७१ ते १९७७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९७१ ते १९७७ - श्रीमती मर्जरी गॉडफ्रे
१९७७ ते १९७९ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९७९ ते १९७९ - श्री. रुडॉल्फ रॉड्रीग्ज
१९८०ते १९८४ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९८० ते १९८४ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९८४ ते १९८९ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९८४ ते १९८९ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९८९ ते १९९१ - श्री. जॉस फर्नांडीज
१९८९ ते १९९१ - श्री. पॉल मंतोष
१९९१ ते १९९६ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९९१ ते १९९६ - मेजर जनरल रॉबर्ट इ विल्यम्स
१९९६ ते १९९७ - श्री. नील ओब्रायन
१९९६ ते १९९७ - श्रीमती हेडविग रेगो
१९९८ ते १९९९ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा
१९९८ ते १९९९ - लेफ्टनंट जनरल नेविल फॉले
१९९९ ते २००४ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा
१९९९ ते २००४ - श्री. डेन्झेल बी. एटकिन्सन
२००४ ते २००९ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड
२००४ ते २००९ - श्री फ्रान्सिस फान्थोमे
२००९ ते २०१४ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड
२००९ ते २०१४ - डॉ. श्री. चार्ल्स डायस
२०१४ ते पुढे - प्रा. रिचर्ड हे
२०१४ ते पुढे - श्री. जॉर्ज बेकर.
संदर्भ :- लोकसत्ता June 2019

0
Answer link
एंग्लो इंडियन म्हणजे काय:
एंग्लो इंडियन म्हणजे असे व्यक्ती ज्यांच्या पूर्वजांमध्ये युरोपियन आणि भारतीय वंशाचे मिश्रण आहे. विशेषतः, हे शब्द अशा लोकांसाठी वापरले जाते ज्यांचे वडील युरोपियन वंशाचे आहेत आणि आई भारतीय वंशाची आहे किंवा या उलट.
घटनात्मक व्याख्या:
भारतीय संविधानात एंग्लो इंडियनची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे:
“एंग्लो इंडियन म्हणजे असा व्यक्ती ज्याचे वडील किंवा इतर पुरुष पूर्वज युरोपियन वंशाचे आहेत, परंतु तो भारतात जन्मलेला आहे किंवा भारतात वास्तव्य करत आहे.”
उदाहरण:
- जर एखाद्या व्यक्तीचे वडील ब्रिटिश (युरोपियन) असतील आणि आई भारतीय असेल, तर त्या व्यक्तीला एंग्लो इंडियन म्हणता येईल.
महत्व:
- भारतात, एंग्लो इंडियन समुदायाला काही विशेष अधिकार आणि संरक्षण देण्यात आले आहेत, विशेषतः शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये.
- भारतीय संसदेत एंग्लो इंडियन सदस्यांचे नामांकन राष्ट्रपतींद्वारे केले जात होते, परंतु हे आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: