भूगोल हवामान

ऋतू म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

ऋतू म्हणजे काय?

3
        ऋतू हा हवामानावर आधारित असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला भाग आहे.

ऋतूंची संख्या

             प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
               उदा० उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंधातील प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.                

                मात्र भारतामध्ये वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे:
उन्हाळा,
पावसाळा आणि
हिवाळा, तर
उपऋतू
सहा (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर) आहेत.



Rajini
उत्तर लिहिले · 28/10/2019
कर्म · 10670
0

ऋतू म्हणजे वर्षभरातील विशिष्ट हवामानाचा काळ. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अक्षामुळे ऋतू बदलतात.

मुख्य ऋतू:

  • उन्हाळा (Summer): या ऋतूमध्ये तापमान वाढते.
  • पावसाळा (Monsoon/Rainy): या ऋतूमध्ये भरपूर पाऊस पडतो.
  • हिवाळा (Winter): या ऋतूमध्ये तापमान घटते आणि थंडी वाढते.
  • शरद ऋतू (Autumn/Fall): या ऋतूमध्ये झाडांची पाने गळतात.
  • वसंत ऋतू (Spring): या ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते.

प्रत्येक ऋतू ठराविक कालावधीनंतर पुन्हा येतो आणि त्याचे हवामान, वनस्पती जीवन आणि मानवी जीवनावर परिणाम होतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

हवेतील बाष्पाचे संघनन होऊन काय तयार होते?
हिमाल‌याच्या क्षेत्रात कोनत्या स्वरूपाचा पाऊस पढ़ता ?
हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ का असतो?
भारत व ब्राझील यांचे स्थान, विस्तार व हवामान, तापमान, पर्जन्यमान या घटकांमध्ये होणारे देश आणि दिशानुसार बदल विश्वकोश किंवा इंटरनेटचा वापर करून सांगा?
थंडी केव्हा कमी होत जायची?
आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत?
ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात?