व्यक्ती इतिहास

रावण चांगला होता की वाईट?

3 उत्तरे
3 answers

रावण चांगला होता की वाईट?

9
दसऱ्याच्या आसपास सोशल मीडियावर रावण कसा चांगला होता, त्याने सीतेला कसा हात ही लावला नव्हता अशा प्रकारचे मेसेज फिरू लागतात. असाच एक मेसेज मध्ये एका बहिणीला रामापेक्षा रावणासारखा भाऊ हवा असतो, कुणी रावण आर्मी म्हणून एक संघटना स्थापन करतो, एका फेसबुक पोस्टवर तर  रावण चक्क भगवान बुद्धांचा आशीर्वाद घेताना पाहिलं होतं.
कोणाच्या सुपीक डोक्यातून या कल्पना येतात याच आश्चर्य वाटतं. रावण ब्राह्मण, शिवभक्त, संस्कृत पंडित होता.   म्हणजे एकीकडे  या जातीला नाव ठेवायची पण केवळ  भावना दुखवायचा हेतूने रावणाचे गोडवे गायचे.
रावण हा अत्यंत स्त्रीलंपट होता. स्त्रीकडे केवळ भोगविलासाची वस्तू म्हणूनच तो बघत असे. रावणाने सीतेला हात का नाही लावला, त्या मागे देखील त्याचे एक पापकर्म दडलेले आहे. एकदा देवलोकावर आक्रमण करण्याच्या हेतूने निघाला असता त्याच्या सैन्याचा कैलास पर्वतावर तळ पडला. त्याच वेळी स्वर्गलोकीची अप्सरा रंभा तिथून जात असलेली त्याला दिसली. तिच्यावर अनुरक्त झालेल्या रावणाने तिला त्याच्याशी रत होण्याविषयी विनंती केली . पण रंभा त्याला नकार देत म्हणाली की "हे रावण महाराज, मी तुमचे बंधू कुबेर महाराजांचा पुत्र नलकुबेर याच्यावर अनुरक्त झाले असून मी त्याला भेटायला चालले आहे. तस्मात मी तुमच्या सुनेसारखी आहे. तेव्हा असे वागणे आपल्याला शोभत नाही." रंभेच्या या बोलण्याचा रावणावर काहीही परिणाम झाला नाही. कामातुराणां न भयं न लज्जा म्हणतात त्याप्रमाणे तो म्हणाला, "हे रंभे, तू स्वर्गलोकीची अप्सरा आहेस. तुम्ही अप्सरा कोणत्याही एका पुरुषाबरोबर लग्न करुन राहूच शकत नाही. तू कुणा एकाची असूच शकत नाहीस." असं म्हणून रावणाने रंभेवर बलात्कार केला. हे कुबेरपुत्र नलकुबेर याला समजताच त्याने रावणाला शाप दिला की तू रंभेची इच्छा नसताना तिच्याशी रत होण्याचे पाप केले आहेस, त्यामुळे तू यापुढे कोणत्याही स्त्रीशी तिच्या परवानगीशिवाय रत होऊ शकणार नाहीस. तू तसं केलंस तर तुझ्या मस्तकाचे सात तुकडे होऊन तू मृत्यू पावशील / भस्म होशील'. म्हणून सीतेला प्रदीर्घकाळ बंदीवासात ठेऊन देखील तिला तो साधा स्पर्श करु शकला नाही. त्यामुळे सीतेला त्याने हातही लावला नाही यात त्याचा सात्त्विकपणा नव्हे तर नाईलाज आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही नाही का, सिग्नल लाल असला तर इकडे तिकडे बघता आणि पोलीसमामा दिसला की चुपचाप थांबून आपण किती कायदा पाळतो हे दाखवायला अगदी गाडीची पुढची चाकं झेब्रा क्रॉसिंगच्या मागे ठेऊन भोळेभाबडे भाव चेहर्‍यावर आणून थांबता, अगदी तसंच. त्यामुळे रावण सीतेला फक्त हत्या करण्याची धमकीच देऊ शकला. अनेक विनवण्या करुन सीता बधत नाही हे बघितल्यावर शापग्रस्त रावणाने सीतामातेला एक वर्षाची मुदत देऊन सांगितलं की एक वर्षाच्या आत तू स्वतःहून माझ्याशी रत झाली नाहीस तर मी तुझी हत्या करेन. सीतेने आपल्याशी स्वतःहून रत व्हावे म्हणून तिचे मन वळवण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे (वाल्मिकी रामायण, सुंदरकांड, सर्ग २२). अशी विशिष्ठ धमकी देण्याचे कारण म्हणजे रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता. जेव्हा हनुमान सीतेला भेटायला लंकेला गेला, तेव्हा त्याने रावणाला "तू माझ्याशी स्वतःहून रत झाली नाहीस तर तुझी आणखी दोन महिन्यांनी हत्या करेन" अशी धमकी सीतेला देताना ऐकलं. यावरुन काय ते समजून जा. रावणाला फक्त स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय होती. जेष्ठांनी व हितचिंतकांनी दिलेला सल्ला ऐकणे त्याला आवडत नसे. म्हणूनच सीतामातेला परत करा आणि रामाशी शत्रूत्व करू नका असा सल्ला देणार्‍या स्वतःच्या सख्ख्या भावाला म्हणजेच बिभीषणाला स्वतःपासून दूर केलं. मंत्री शुक आणि स्वतःचे आजोबा माल्यवान यांचाही योग्य पण त्याच्या मताविरुद्ध जाणारा सल्ला पसंत न पडल्याने या दोघांनाही त्याने स्वतः पासून दूर केलं.
रावणाची बहीण शूर्पणखेच्या सन्मानाला धक्का लागला म्हणून रावणाने युद्ध केलं अशी फेकाफेकी केली जाते. त्याच बहिणीशी तो कसा वागला याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. शूर्पणखेचं पाळण्यातलं नाव मीनाक्षी असं होतं. तारुण्यात पदार्पण केल्यावर तिने दुष्टबुद्धी या असुराशी रावणाच्या परवानगी शिवाय विवाह केला. दुष्टबुद्धी हा महत्वाकाक्षी असल्याने रावणाला असा संशय होता की शूर्पणखेशी विवाह करण्यामागे दुष्टबुद्धीचा रावणाचे राज्य हडप करण्याचा उद्देश असावा, म्हणून त्याने प्रथम या विवाहाला आक्षेप घेतला. मात्र पत्नी मंदोदरीने त्याला बहिणीच्या इच्छेचा मान राखण्याविषयी विनवलं तेव्हा त्याने या विवाहाला मान्यता दिली. असे जरी असले तरी त्याच्या मनात राग खदखदत होताच. पुढे रावणाने दुष्टबुद्धीवर हल्ला करुन त्याला ठार मारलं. याला आपण आजच्या काळात काय म्हणतो बरं? बरोब्बर, हॉनर किलिंग. बहिणीच्या नवर्‍याची हत्या करणारा रावण तुम्हाला महात्मा आणि आदर्श भाऊ वाटतो? यामुळे साहजिकच कृद्ध झालेली शूर्पणखा सूडाने खदखदू लागली. आपल्या नवर्‍याची हत्या करणार्‍या भावाचा सूड घेण्यासाठी ती तडफडू लागली. अशात इकडे तिकडे भटकत असताना तिला राम व लक्ष्मण हे रघुकुळातले वीर पुरुष दिसले व तिच्या मनातल्या रावणाविषयीच्या सूडभावनेने आता एका षडयंत्राला जन्म दिला. आधी राम व नंतर लक्ष्मणावर अनुरक्त झाल्याचे दाखवणार्‍या शुर्पणखेने सीतेवर हल्ला करताच लक्ष्मणाने तिला रोखून तिचे नाक कापले. शूर्पणखेने याची तक्रार आधी तिचा एक भाऊ खर या राक्षसाकडे केली. खर आणि दूषण हे दक्षिण भारतात रावणाचे राज्य राखत असत. या दोन राक्षसांनी राम व लक्ष्मणावर हल्ला केला असता राम व लक्ष्मण या दोघांनी त्यांचे सहजपणे पारिपत्य केले. रावणाचे राज्य थोडे थोडे कुरतडले जाण्याने आनंदीत झालेली शूर्पणखा आता रावणाकडे राम व लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली. आता मात्र रावण भडकला, कारण राम व लक्ष्मणांनी "त्याच्या राज्यात घुसखोरी करुन त्याच्या बहिणीला विद्रूप केलं होतं आणि मग खर आणि दूषण या भावांना ठार मारलं होतं." आत्तापर्यंत शूर्पणखेच्या सन्मानाशी काहीही कर्तव्य नसणारा रावण त्याच्या राज्यावर झालेल्या हल्ल्याने मात्र चिडला व त्याने रामपत्नी सीतामातेचे हरण केले. पुढे जे घडलं ते सर्वविदीत आहेच त्यामुळे ते सांगत बसत नाही. रावणाच्या वासनांधते विषयी आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा हिमालयात फिरत असताना रावणाला ब्रह्मर्षी कुशध्वज यांची कन्या वेदवती दिसली. मुळातच स्त्रीलंपट असणारा रावण तिच्यावर लट्टू झाला नसता तरच नवल होतं. तिला बघताच रावणाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व तिला अविवाहित राहण्याचे कारण विचारले. तिने रावणाला सांगितले की तिचा विवाह भगवान विष्णूंशी करण्याचा माझ्या पित्याचा मानस होता. हे कळताच माझी अभिलाषा बाळगणार्‍या एका दैत्यराजाने माझ्या वडिलांची हत्या केली. त्याने दु:खी झालेल्या माझ्या मातेनेही त्यांच्या मागे आपला जीव दिला. तेव्हा पासून माझ्या पित्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मी श्रीविष्णूची आराधना करत आहे. हे ऐकताच अनाथ व 'उपलब्ध' असलेल्या वेदवतीला रावणाने 'त्याची' होण्याविषयी विनवणी करण्यास सुरवात केली. पण वेदवती मनाची पक्की होती. तिने रावणाला साफ नकार दिला. रावणाने तिचे केस पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच वेदवतीने स्वतःचे केस कापून टाकले व अग्नीत प्रवेश केला. आणि मरता मरता रावणाला शाप दिला की मी आता मृत्यू पावते आहे पण पुन्हा जन्म घेऊन तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेन.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला रावण व्हायचं आहे का?
मूळ लेख
https://mandarvichar.blogspot.com/2016/08/blog-post_15.html?m=1
उत्तर लिहिले · 18/10/2019
कर्म · 99520
6
रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, भविष्य जणू शकत होता, ब्रम्हाचा नातू होता, पृथ्वी जिंकणारा दिग्विजयी सम्राट होता पण त्याबरोबरच तो अतिशय स्त्रीलंपट होता,त्याच्या सावत्र भावाच्या मुलाला नलकुबेराला वरायला चाललेल्या रंभा अप्सरेवर म्हणजे त्याच्या होणाऱ्या सूनेवर त्याने बलात्कार केला त्यामुळे नलकुबेराने त्याला शाप दिला होता की जर कुठल्याही स्त्रीवर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्या डोक्याचे शंभर तुकडे होतील त्यामुळे इच्छा असूनही त्याला सीतेला हात लावता आला नाही त्याधी आपले विष्णुंशी लग्न लावण्याची आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तप करीत असलेल्या वेदवतीच्या मागे फक्त एकदा संबंध ठेवता यावे यासाठी लागला होता, त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी वेदवतीने शेवटी अग्निप्रवेश केला पण मरण्याआधी तिने शाप दिला की त्याच्या मृत्यूला तिचं कारणीभूत होईल, फार पूर्वीपासूनच राक्षस आणि देवांमध्ये शत्रुत्व होते, विष्णूंनी हिरण्यकश्यपू ला ठार मारल्यानंतर त्याचा मुलगा प्रल्हाद नवा राक्षस सम्राट बनला, तो असेपर्यंत राक्षस आणि देव मित्र होते पण त्याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा विरोचन नवा राक्षस सम्राट बनला आणि त्याने आजोबांचे धोरण परत सुरू केले, त्याने देवांविरुद्ध मोठे युद्ध सुरू केले त्यात त्याच्याबरोबर होता त्याचा परममित्र राक्षसांचा कुबेर माली, मालीचे दोन लहान भाऊ सुमाली आणि माल्यवान ऋषी भारद्वाज सारखेच बुद्धिमान मानले जात, युद्धात राक्षस हरायला लागले त्यावेळी हे सततची युद्ध करून कंटाळलेल्या देवांनी हा प्रश्न कायमचा संपवायला देव सैन्याची एक तुकडी राक्षस राज्यात पाठवली, त्यांनी मागे राहिलेल्या राक्षस कुटुंबांना मारायला सुरुवात केली, सुमली आणि माल्यवान हे पहात होते त्यांनी सुमालीची लहान मुलगी कैकसीला उचलले आणि गुप्त स्थानी पळून गेले, नंतर त्यांना बातमी मिळाली की लंकेच राज्य इंद्राने कुबेराला दिलं, कैकसी मोठी झाल्यावर त्यांनी तिला कुबेराचे वडील विश्रवा ऋषींच्या आश्रमात सोडले, तिथे तिला ते ऋषींच्या वेशात भेटायला यायचे, आजोबांच्या वयाचे असलेल्या विश्रवा ऋषिंपासून तिला तीन मुले झाली रावण,कुंभकर्ण आणि विभिषण, सूमाली आणि माल्यवान रावणाच्या मनात देवांविषयी आणि त्याचा मोठा सावत्र भाऊ कुबेरविषयी विष कालावत रहायचे, एक दिवस ते नेहमीप्रमाणे विश्रवा ऋषींच्या आश्रमात येऊन परत जात असताना त्याचवेळी भारद्वाज ऋषी विश्रवा ऋषींना भेटायला आले, आश्रमाच्या दारात तिघांची भेट झाली, भारद्वाज ऋषी आणि त्या दोघांची नजरानजर झाली आणि भारद्वाज ऋषींनी त्यांना ओळखले, ते पूर्ण हादरून गेले, बुद्धिमत्तेच्या बाबतीत त्यांचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे सुमालि आणि माल्यवान राक्षस जिवंत आहेत, त्या दोघांनाही लक्षात आले की भारद्वाज ऋषींनी आपल्याला ओळखले, भारद्वाज ऋषी आत गेले आणि त्यांनी विश्रवा ऋषींना सगळं सांगितले आधी त्यांनी विश्वास ठेवला नाही पण जेव्हा ते भारद्वाज ऋषींच्या सांगण्यावर कैकसी तिची मुलं आणि तिचे वडील व काका यांना शोधायला गेले तेव्हा कोणीही सापडले नाहीत निराश होऊन ते एका जागी बसले, फसवणुकीने डोळ्यात अश्रू वाहत होते, त्या संतापात त्यांच्या तोंडातून शाप बाहेर पडला, सुमाली आणि माल्यवान या विश्रवा ऋषिला फसवून तुम्ही राक्षस वंश पुन्हा वाढवलात पण राक्षस वंशाच्या उद्धारासाठी ज्याला तुम्ही जन्माला घातलात त्याच रावणाच्या हातून त्या राक्षस वंशाचा संहार झालेला तुम्हाला असहाय्यपणे पहात रहाव लागेल आणि तुम्ही काही करू शकणार नाही, राम रावण युद्ध थांबवण्याचे माल्यवान चे सर्व प्रयत्न अपयशी ठरले, रावणाने आडमुठेपणाने समझोता करायला नकार दिला आणि राक्षसांचा सर्वनाश ओढवून घेतला.
उत्तर लिहिले · 18/10/2019
कर्म · 695
0
रावण चांगला होता की वाईट, हा एक कठीण प्रश्न आहे, कारण रामायणात त्याचे अनेक पैलू दर्शविले आहेत.
  • रावणाचे चांगले गुण:
    • महान विद्वान: रावण एक महान विद्वान आणि ज्ञानी होता. त्याला वेद, ज्योतिष, आणि आयुर्वेद यांचे उत्तम ज्ञान होते.
    • उत्कृष्ट योद्धा: तो एक पराक्रमी योद्धा होता आणि त्याने अनेक युद्धे जिंकली होती.
    • शिवभक्त: रावण भगवान शिव यांचा निस्सीम भक्त होता आणि त्याने त्यांच्यासाठी तांडव स्तोत्र लिहिले.
    • प्रशासक: तो एक चांगला शासक होता आणि त्याने आपल्या राज्यात समृद्धी आणली.
  • रावणाचे वाईट गुण:
    • अहंकारी: रावणाला त्याच्या शक्तीचा आणि ज्ञानाचा खूप अहंकार होता.
    • क्रूर: तो क्रूर आणि निर्दयी होता आणि त्याने अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार केले.
    • सीताहरण: त्याने सीतेचे अपहरण केले, ज्यामुळे रामायणाचे युद्ध झाले.
    • अन्यायी: तो अन्यायी होता आणि त्याने देवांचा आणि ऋषींचा अपमान केला.

रावणाच्या चांगल्या आणि वाईट गुणांमुळे तो एक जटिल व्यक्तिमत्व बनतो. त्याचे गुण त्याला आदरणीय बनवतात, तर त्याचे दुर्गुण त्याला खलनायक ठरवतात.

रावणाबद्दल अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

डॉ. स. ना. सेन यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?
भारतातील ऐतिहासिक क्रांती व त्यांचे जनक?
जिवा महाले यांची वंशावळ?
धनंजय मुंडेंवर आरोप करणारा रणजीत कासले कोण आहे?
धावजी पाटील यांच्याबद्दल माहिती?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर दवाखाना व भाऊसाहेब खिलारे यांचा काय संबंध आहे?
भाऊसाहेब खिलारे पुणे कोण आहेत?