पर्यावरण व्याख्या

पर्यावरण म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

पर्यावरण म्हणजे काय?

3
पर्यावरण

पर्यावरण म्हणजे काय ?

             हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते. निसर्गामध्ये या सगळयांचे प्रमाण व त्यांची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते की, पृथ्वीवर एक संतूलित जीवन चालत राहावे अनेक कोटी वर्षापूर्वी जेव्हा माणूस , पशुपक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ लागले तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रितीने चालत आले आहे. ज्याला जितकी आवश्यक आहे. तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठीही व्यवस्था करत आलेला असतो.

             पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.

            आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट पक्षी, प्राणी, डोंगर, जंगल, शेती, नदी, नाले, गवत, समुद्र, झाडे, आकाश हे सगळे आपण पाहात असतो, त्याप्रमाणे न दिसणारी परंतु वातावरणात असणारी हवा आपल्याला जाणवत असते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण शोध घेतला तर आपल्याला नव्यानव्या आपण पूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टीही दिसू लागतात. गावातही नदी कुठून वाहात आली आणि ती आपल्या गावातून पुढे कुठे जाते आपण पाहीले तर आपल्याला वेगळी दृश्ये वेगळी माणसे, वेगळे वृक्ष, सगळेच वेगळे दिसू लागते वेगळे म्हणजे नव्याने नेहमी पाहतो त्यापेक्षा वेगळे आपण जातो. हा त्या त्या ठिकाणचा परिसर वेगवेगळा असतो, त्या त्या परिसरातल्या सर्व सजीवांचे एकमेकांशी वैशिष्टयपूर्ण संबंध असतात. आपण त्या परिसरात राहिलो तर आपलाही इतरांशी संबंध येत असतो. असा परस्परसंबंध असलेले तिथले तिथले वातावरण म्हणजेच पर्यावरण - परिसर परस्परसंबंधित असलेले घटक आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजेच परिसर अभ्यास पर्यावरणाचा अभ्यास.

पर्यावरणातील घटक :

पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे सूर्य, पाणी जमीन, हवा आणि यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व सजीव सृष्टी.
उत्तर लिहिले · 4/10/2019
कर्म · 10670
0

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. यात हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी आणि इतर सर्व नैसर्गिक गोष्टींचा समावेश होतो.

पर्यावरणाचे दोन मुख्य घटक आहेत:

  1. जैविक घटक: वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजंतू आणि इतर सजीव गोष्टी.
  2. अजैविक घटक: हवा, पाणी, जमीन, खनिजे आणि इतर निर्जीव गोष्टी.

पर्यावरण आपल्या जीवनावर आणि जीवनावर परिणाम करते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

I love you म्हणजे काय?
आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू यांची व्याख्या आणि उदाहरण लिहा?
अनुरूप म्हणजे काय?
कलाकार म्हणजे काय ते सांगा?
अस्ताई चा अर्थ काय?
वाड्मयीन म्हणजे काय?
गृहव्यवस्थापन व्याख्या लिहा?