शिक्षण उच्च शिक्षण वसतिगृह

पंजाबराव देशमुख वसतिगृहच्या फॉर्म विषयी माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

पंजाबराव देशमुख वसतिगृहच्या फॉर्म विषयी माहिती मिळेल का?

2
🔖महाराष्ट्र सरकारने ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना’ सुरू केली.

ही योजना पुढील विभागांतील नमूद केलेल्या अभ्यासक्रमांसाठी लागू होते.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग


पदविका - दहावीनंतर इंजिनीयरिंग डिप्लोमा, १२ वीनंतर फार्मसी डिप्लोमा, १२ वीनंतर हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा.

पदवी - इंजिनीयरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर.

पदव्युत्तर पदवी - एम.बी.ए./एम.एम.एस., एम.सी.ए.

वैद्यकीय शिक्षण विभाग

पदवी - एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, नर्सिंग.

कृषी विभाग

पदविका - कृषी पदविका

पदवी - फलोत्पादन, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन.

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग

पदविका – दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवर्धन व्यवस्थापन.

पदवी – प्राणीशास्त्र व पशुसंवर्धन, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान.

पदव्युत्तर पदवी – प्राणीशास्त्र.

पात्र महाविद्यालये

राज्यातील सर्व खासगी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये/तंत्रनिकेतने (खासगी अभिमत/स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठे वगळून) आणि सरकारी, सरकार अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतनांमधील (सरकारी अभिमत विद्यापीठांसह) या योजनेंतर्गत निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिकरणामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणारे विद्यार्थी पात्र असतील.

पात्रता निकष

सरकारने निर्धारित केलेल्या वरील व्यावसायिक अभ्यासक्रमांना सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतनामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत मजूर आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे.

योजना

वरील निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी राज्यातील महानगरांमधील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी प्रतिमाह रुपये ३,०००/- व राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी प्रतिमाह रुपये २,०००/- इतका वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येईल. हा निर्वाहभत्ता सुट्टीचे दोन महिने वगळता १० महिन्यांकरिता देण्यात येईल.

या योजनेबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे विकसित करण्यात येणाऱ्या 'महाडीबीटी' या संकेतस्थळावरून घेता येईल. तसेच प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या नियामक मंडळांच्या संकेतस्थळावरही या योजनेची लिंक देण्यात येईल.

व्यावसायिक अभ्यासक्रम नियामक मंडळांची संकेतस्थळे :

इंजिनीयरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए अभ्यासक्रम

https://www.dtemaharashtra.gov.in

मेडिकल व पॅरामेडिकल अभ्यासक्रम

http://www.dmer.org

कृषी अभ्यासक्रम

http://www.mcaer.org

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रम

http://www.mafsu.in
0
मी तुम्हाला पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या फॉर्मबद्दल अचूक माहिती देण्यासाठी तपशीलवार माहिती शोधू शकलो नाही. तरीही, तुम्ही खालीलप्रमाणे माहिती मिळवू शकता:
  • महाविद्यालयाच्या website ला भेट द्या: तुमच्या महाविद्यालयाच्या website वर वसतिगृहाच्या फॉर्मबद्दल माहिती दिली जाते. तिथे तुम्हाला online फॉर्म भरण्याची सोय मिळू शकेल.
  • वसतिगृह कार्यालयात संपर्क साधा: वसतिगृहाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही फॉर्म कधी उपलब्ध होतील आणि भरण्याची प्रक्रिया काय असेल, याची माहिती मिळवू शकता.
  • मित्रांशी संपर्क साधा: तुमच्या मित्रांना किंवा कॉलेजमधील सीनियर्सना विचारून तुम्ही फॉर्मबद्दल माहिती मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1820

Related Questions

महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी इयत्ता ११ वी आणि १२ वी साठी मोफत वसतिगृह आहे?
बहुउद्देशीय संस्था ओपन केली आहे, त्यात वसतिगृह कसे चालू करावे?
मुलुंड मध्ये लेडीजHostel कुठे आहे? माझ्या मैत्रिणीला तिच्या आई वडिलांनी घरातून काढून टाकले. Hostel सांगू शकत कोणी?
मुंबईत राहण्यासाठी स्वस्तात राहण्याचे वसतिगृह किंवा सरकारी वसतिगृह कुठे आहे का?
मिलिटरी बॉईज हॉस्टेल, सातारा बद्दल माहिती पाहिजे?
नागपूर एसटी हॉस्टेल मिळवण्याची प्रोसेस काय आहे???
मी यंदा 75 गुणांसह 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालो आहे. पुढच्या शिक्षणासाठी मला बाहेर जायचे आहे. मी ओबीसी प्रवर्गात मोडतो, तर मला वसतिगृह मिळेल का?