रामायण
रावणाचे सासर जोधपुर आहे काय?
2 उत्तरे
2
answers
रावणाचे सासर जोधपुर आहे काय?
6
Answer link
रावणाच्या सासरी आजही त्याचं ‘श्राद्ध’ केलं जातं
रावण हा एक महाज्ञानी होता. त्याच्या तोडीचा विद्वान पुरुष कोणीच नाही असे मानल्या जाते. या विद्वानाच्या मृत्यू नंतर स्वतः राम देखील दुखी झाले होते. आपण दर वर्षी विजयादशमी साजरी करतो ती रामाचा विजय झाला म्हणून.. पण तुम्हाला माहित आहे, त्याच वेळी भारतातील एका गावात रावणाच श्राद्ध केल्या जात, त्याच्या मृत्यूवर शोक केला जातो.

राजस्थानच्या जोधपुर येथे रावणाचे वंशज आजही रावणाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानून त्याची पूजा करतात, एवढचं नाही तर रावणाचं श्राद्ध देखील करतात. यावेळी संपूर्ण विधिवत यज्ञ केल्या जात, सोबतच रावण ज्या देवीला त्याची कुलदेवता म्हणून पुजायचा त्या खरानना देवीला नैवेद्य देण्यात येतं._*
संपूर्ण जगात रावण हा एकच असा जावई असेल ज्याच श्राद्ध त्याच्या सासरी केल्या जातं. प्राचीन काळातील जोधपूरची राजधानी मंडोर रावणाचं सासर म्हणून ओळखल्या जातं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,हा योगायोगच म्हणावा की, रावणाचे वंशज देखील जोधपुरमधेच राहतात. जोधपुर येथे राहणारे दवे-गोधा श्रीमाली ब्राह्मण समाजाचे लोकं के स्वतःला रावणाचे वंशज मानतात. येथे राहणारे रावणाचे हे वंशज अनेक वर्षांपासून रावणाच श्राद्ध संपूर्ण विधिवत स्वरुपात करतात. रावणाचे हे नातेवाईक दरवर्षी यज्ञ आणि पिंडदान करतात सोबतच ते ब्राह्मणांना जेवण देखील देतात.
जोधपुरच्या श्री अमरनाथ मंदिर येथे रावणाची एक मूर्ती स्थापित आहे. जिथे रावणाचे वंशज त्याची पूजा करतात. भारतात शंकरजीची पूजा करताना रावणाची ही एकच मूर्ती आहे.
खीर-पुरी रावणाच्या आवडीचा पदार्थ होता, म्हणून या श्राद्धा दरम्यान आवर्जून खीर-पुरी बनविली जाते.
ही परंपरा येथे अनेक काळापासून सुरू आहे. रावणाचा श्राद्धावेळी दवे-गोधा श्रीमाली ब्राह्मण समाजाचे लोकं त्याच प्रकारे एकत्र येतात जसे इतर कुठल्या समान्य व्यक्तीच्या श्राद्धावेळी. यामागे यांची अशी भावना आहे की, याद्वारे ते त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
रावण याला भलेही अन्याय आणि विकृतीचं प्रतिक मानल्या जात असलं तरी देखील रावण हा महाज्ञानी ब्राह्मण होता, हे देखील सत्य आहे आणि त्याचा हा गुणधर्म त्याला पूजनीय बनवतो, असे हे लोकं मानतात.
श्री अमरनाथ मंदिर येथे रावणाच्या मंदिरा समोरच त्याच्या पत्नीचे म्हणजेच मंदोदरीचे देखील मंदिर आहे. या मंदिरात मंदोदरीच्या हातात शिवलिंग आहे, तिची शिव भक्ती दाखविणारी ही मूर्ती या मंदिरात स्थापित आहे. २००७ साली हे मंदिर रावणाच्या वंशजांनी बनवलं. त्यांच्या मते मंदोदरी ही मंडोर (जोधपुर)ची कन्या होती. रावण आणि मंदोदरीच्या मंदिरांचं मध्यभागी एक शिव वाटिका आहे. श्री अमरनाथ मंदिर परिसरातच रावणाची कुलदेवी खरानना देवीच मंदिर देखील आहे.
रावण भलेही विकृत मानसिकतेचा असला तरी तो एक विद्वान ब्राह्मण होता त्यामुळे तो त्याच्या या गुणामुळे पूजनीय नक्कीच आहे…
https://bit.ly/3ciR5Vk
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

0
Answer link
रावणाचे सासर जोधपूर येथे होते की नाही याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु काही लोकांच्या मतानुसार रावणाची पत्नी मंदोदरी ही जोधपूरची होती.
* kavyakalp.com [https://kavyakalp.com/kavyakalp/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/]
* bhaskar.com [https://www.bhaskar.com/local/rajasthan/jodhpur/news/interesting-facts-about-ravana-in-jodhpur-129724944.html]