प्रेम मानसशास्त्र

prem mhanje kay ?

जसजसं आपण वयात येतो तसतसं आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण व्हायला लागतं. कुणी तरी आवडू लागतं, कुणी तरी भेटावं असं
वाटायला लागतं. कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात. होतं का नाही हे? या वयात बहुतेक सगळ्याच मुला-मुलींना हे होतं. आता प्रत्येकाला हे वाटायलाच पाहिजे असा काही नियम नाही पण बहुतेक जणांना हे वाटतं. कुणी तरी आपल्याकडे पाहावं, आपल्याला सतत भेटावं, बोलावं असं वाटायला लागतं आणि ते नैसर्गिक असतं.
कसं आहे, आपल्या शरीरात आणि मनात जे बदल होतात त्यामुळे हे आकर्षण वाढू लागतं. सतत आपल्याला आवडणारी व्यक्ती, तिचं बोलणं, राहणं, तेच मनात येत राहतं. कधी-कधी तिचा स्पर्श व्हावा, तिला स्पर्श करावा, असंही वाटतं. ह्यात वाईट काही नाही. तसंच प्रत्येकाला हे होईलच असा काही नियम पण नाही.
पण आपण प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं? एखाद्याला आपण आवडतो, हे त्या व्यक्तीच्या वागण्यातून, बोलण्यातून समजतं. तिच्याशी किंवा त्याच्याशी बोलणं, त्याचा किंवा तिचा आवाज ऐकणं, स्पर्श होणं या सगळ्या गोष्टींनी आपण सुखावतो. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला भेटायला आपण आतुर होतो, तो किंवा ती नाही भेटली तर अस्वस्थ होतो, दुःखी होतो. असं तुम्हालाही होत असेल.
प्रेमात पडणं आणि आपण कुणाला तरी आवडणं या खूप छान गोष्टी आहेत. महत्वाचं म्हणजे प्रेमात पडायचं तर दोघंही एकमेकांना मनापासून आवडायला पाहिजेत.
एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा आवडत नसेल तर आपण जबरदस्ती करू शकत नाही. तसंच एखाद्या मुलीने नकार दिला तर उगीचचं जेवण नको, खेळायला नको, अभ्यास नको, काम नको, मित्र नकोत असं करत बसण्यात काहीही अर्थ नाही. या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला कुणी पण आवडो, त्या मुलीला किंवा मुलाला जर आपण आवडत नसलो किंवा समोरच्याच्या मनात आपल्याविषयी प्रेमाच्या भावना नसतील तर आपण त्या मान्य करायला पाहिजेत आणि आपल्या भावना आपल्यापाशी ठेवल्या पाहिजेत. जबरदस्ती करून, मागे लागून, पिच्छा पुरवून कुणाचं प्रेम मिळत नसतं. तसं फक्त सिनेमात होतं. कारण सिनेमा हा माणसांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे घडवलेला असतो. आता समजलं का प्रेम म्हणजे काय असतं ते?
1 उत्तर
1 answers

prem mhanje kay ?

3
खरे प्रेम कायम राहते. उडते ती वासना. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे हृदय ठरवते. प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
उत्तर लिहिले · 19/9/2019
कर्म · 15575

Related Questions

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, काव्य गुण ओळखा?
I love you म्हणजे काय?
माझ्या वहिनीच्या भावाच्या भाचीशी लग्न केलं तर चालेल का? माझं तिच्यावर प्रेम आहे आणि ती पण माझ्यावर प्रेम करते. पण आमच्या दोघांच्या वयातील फरक सात वर्षांचा आहे. मी काय करावं, मला काही कळत नाहीये?
एक मुलगी मला आवडत होती, ५ वर्षांआधी ती १२ वी मध्ये होती, म्हणून वाटले १-२ वर्षांनी मागणी पाठवू. पण तिने त्याच वेळेस एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केले, १ वर्ष राहिली तिथे, तो मारायचा वगैरे म्हणून घटस्फोट झाला. आता तिच्यासोबत संपर्क झाला आहे, आणि ती आवडते, प्रेम आहे, तर मी लग्न केले तर चालेल का?
आद्यआत्मा, अध्यात्म, विद्य, विज्ञान, सुज्ञ, प्रज्ञान, सत्संग, विवेक तसेच आर्त, आर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन, आयुष्याचे वस्त्र विणणे, याला प्रेम, नम्रता, एकत्वाची जोड देणे याला जीवन असे नाव? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे, आषाढी एकादशी आहे.
सतत चालणं, सतत सक्रिय राहणं, सतत हसतमुख राहणं, सतत संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज कायम जपणं, विवेकवृत्ती, मिळून मिसळून वागणं, परिवर्तन आणि नवं नवीन चांगलं ते देणं हेच सत्य, प्रेम, आनंदी मन जपणं व विनम्र राहणं हे जीवन पूर्ण तृप्त असेल का?
वयस्कर लोकांनी अनेक लोकसभा निवडणुकांत मतदान करून सत्ताधारी निवडले, या वयस्कर मंडळींच्या ईपीएस पेन्शन वाढीचा विचार का केला नाही? खासदार सदस्य वैयक्तिक फायदे, पेन्शन, भत्ते इत्यादी सुविधा घेत आहेत, हे खरे असेल, तर बुजुर्ग वयस्कांना न्याय हवा आहे, असे सत्य, प्रेम, एकत्व वाढीस लागेल काय?