कायदा पोलीस मुंबई

मुंबईला बृहन्मुंबई पोलीस का म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

मुंबईला बृहन्मुंबई पोलीस का म्हणतात?

12
१८८८ पासून महानगर पालिका अस्तित्वात आली, ती फक्त मुंबई शहरापर्यंत मर्यादित होती. कालांतराने मुंबईची व्याप्ती दहिसर, मुलुंड तसेच मानखुर्द पर्यंत वाढविण्यात आली.
                  तेव्हापासून महानगर पालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिका(MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI)MCGM असं ओळखण्यात येऊ लागले.

बृहन् हा संस्कृत शब्द बृहत् या शब्दावरून येतो,
याचा अर्थ महा/विशाल/खूप मोठे/Greater म्हणून आहे.
मुंबई सारख्या मोठ्या उपनगरात सर्व उपनगर जसे बांद्रा, अंधेरी, मुलुंड इत्यादी समावेश आहेत. मुंबई एक विस्तृत संकल्पना असून ज्यामध्ये अगदी पनवेल पासून ते कल्याण वसई विरार पर्यंतचा हि समावेश आहे.
बृहन्मुंबई म्हणजे महा/ग्रेटर मुंबई असा अर्थ होतो.

त्याचप्रमाणे, पोलीसांना बृहन्मुंबई पोलीस असे म्हटले जाते. कारण MCGMमुंबईचा जेवढा विभाग विस्तृत आहे तेवढ्या विभागात बृहन्मुंबई पोलीस कार्य करते.
उत्तर लिहिले · 18/9/2019
कर्म · 458580
0

मुंबईला बृहन्मुंबई पोलीस म्हणण्याचे कारण:

  • विस्तार: 'बृहत्' या शब्दाचा अर्थ 'मोठा' किंवा 'विस्तारलेला' असा होतो. मुंबई शहराचा भौगोलिक आणि प्रशासकीय विस्तार वाढल्यामुळे शहराला बृहन्मुंबई असे म्हटले जाते.
  • समावेश: मुंबई शहर आणि आसपासच्या उपनगरांचा समावेश बृहन्मुंबईमध्ये होतो. त्यामुळे केवळ मुंबई शहरच नव्हे, तर त्याहून मोठ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे नाव वापरले जाते.
  • कायदेशीर मान्यता: महाराष्ट्र शासनाने कायद्याद्वारे मुंबई शहराचे नाव बदलून बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) असे केले आहे. त्यामुळे सर्व शासकीय आणि प्रशासकीय कामांमध्ये 'बृहन्मुंबई' हाच शब्द वापरला जातो.

थोडक्यात, शहराचा विस्तार आणि उपनगरांचा समावेश दर्शवण्यासाठी मुंबईला बृहन्मुंबई म्हटले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: BMC Website

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

झापाचीवाडी गावचा पोलीस पाटील कोण?
कोणत्याही गावातील चोरीचा बैल दुसऱ्या गावात कोणी विकत घेतलेला असल्यास, त्याविषयी त्या गावच्या सरपंचाला पोलीस स्टेशनला बोलावले जाऊ शकत का? व त्यांना स्वतःचे खर्चे करून जावे लागेल का? काय प्रोसिजर असते ते सांगा?
माझ्या गावात स्टोन क्रेशर मशीन आहे, तरी त्यांना ग्रामपंचायत कर लागू आहे. त्यांना ग्रामपंचायतीतर्फे विनंती अर्ज करून कर पट्टी भरायला सांगितली, तरी त्यांनी ती न दिल्यास काय प्रोसिजर करावी लागेल?
31 वर्षांपूर्वी मोठ्या भावाने भावांचे (आनेवारी) वाटप अर्ज करून केलेले आहे. फेरफार तसाच आहे आणि त्यानुसार वहिवाट चालू आहे. 15 वर्षांनंतर चुलत भावांनी गट वाटप (रजिस्टर) केले. परगावी 2 एकर जमीन मोठ्या भावाच्या नावे होती, ती खराब जमीन डोंगरपड होती. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीवरून चुलत भावांमध्ये वाद होत आहेत, तर ते वाटप कायद्याने परत होऊ शकेल का?
शेजारच्याने जागा न सोडता अनधिकृत बांधकाम करून आमच्या बाजूने खिडक्या ठेवल्या आहेत, याची तक्रार कुठे करून न्याय मिळवावा?
मी आणि माझी पत्नी, दोन मुले व वडील असा ५ व्यक्तींचा परिवार आहे. वडिलांच्या नावे जमीन, राशनकार्ड व सर्व काही वडिलांच्याच ताब्यात आहे. ते आम्हाला जमीन व राशनमधील काहीही देत नाहीत. त्याकरिता, मला माझे राशन वेगळे मिळेल का किंवा राशनकार्ड वेगळे करू शकतो का?
मला माझा मुलगा, सून कोणीही सांभाळ करण्यास तयार नाही. जमीन सर्व त्यांच्या नावावर आहे. माझ्याजवळ काहीही नाही आणि रेशन कार्ड पण त्यांच्या नावाचे आहे. त्यामध्ये माझे पण नाव आहे, पण त्यामधील धान्य ते मला देत नाही. त्याकरिता मला त्यांच्या रेशनमधून नाव कमी करून स्वतःचे राशन मिळू शकेल का?