2 उत्तरे
2
answers
मॅच्युअल फंड म्हणजे काय?
7
Answer link
*⭕ म्युचुअल@ फंड म्हणजे काय? ⭕*
*म्युच्युअल फंड म्हणजे काय?* म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारचे सहभागाने युनिट ट्रष्ट औफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी.@ १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळालि. सद्या देशात ३२ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. पहिली बाब म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. आपल्या पैशानी मोठ काम कराव आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात.@तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. @तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स।डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. @
त्याला कॉर्पस या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य NAV जाहीर केले जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला @तुलनात्मक दॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.@
*_✍🏼संकलन_*
*_९८ ९० ८७ ५४ ९८_*

0
Answer link
म्युच्युअल फंड: म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून जमा केलेला निधी, जो शेअर्स, बाँड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवला जातो.
हे कसे काम करते:
- गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात युनिट्स खरेदी करतात.
- fund व्यवस्थापक या पैशांचा वापर विविध प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करतो.
- गुंतवणुकीतून मिळणारा नफा युनिटधारकांना त्यांच्या युनिट्सच्या प्रमाणात वितरित केला जातो.
म्युच्युअल फंडांचे फायदे:
- विविधता (Diversification): म्युच्युअल फंड विविध क्षेत्रांतील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे धोका कमी होतो.
- व्यवसायिक व्यवस्थापन: तज्ञ फंड व्यवस्थापक गुंतवणुकीचे निर्णय घेतात.
- लिक्विडिटी (Liquidity): युनिट्स कधीही विकून रोख रक्कम मिळवता येते.
- पारदर्शकता: म्युच्युअल फंड त्यांच्या गुंतवणुकीची माहिती नियमितपणे जाहीर करतात.
म्युच्युअल फंडांचे प्रकार:
- इक्विटी फंड: मुख्यतः शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.
- डेब्ट फंड: बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करतात.
- हायब्रिड फंड: शेअर्स आणि बाँड्स या दोहोंमध्ये गुंतवणूक करतात.
- मनी मार्केट फंड: अल्प मुदतीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात.
गुंतवणूक करण्यापूर्वी: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी आपली आर्थिक उद्दिष्ट्ये आणि धोका पत्करण्याची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे.