संस्था
संस्था नोंदणी कशी करायची?
3 उत्तरे
3
answers
संस्था नोंदणी कशी करायची?
6
Answer link
संस्था नोंदणी कशी करावी
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
संस्था नोंदणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जावे लागते.स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था व फाउंडेशनची नोंदणी करण्यासाठी व संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालये आहेत.
https://bit.ly/32gxNwm
या कार्यालयांत धर्मादाय उपायुक्त, सहायक धर्मादाय आयुक्त यांच्यासह इतर कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी काम पाहतात. केवळ संस्था नोंदणीबद्दल माहिती नसल्याने अनेकजण हजारो रुपये घालवतात आणि त्यात वेळही घालवावा लागतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तुम्हाला मदतही करतात. मात्र त्यांच्यापर्यंत एजंटाशिवाय पोचायला हवे. नाहीतर काहीजण एजंटला गाठुन त्या मार्फत संस्था रजिस्टर करतात.केवळ माहिती नसलेने एजंट गाठावा लागतो.
https://bit.ly/32gxNwm
ग्रामीण व शहरी भागात सध्या अनेक स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था, फाउंडेशन अशा अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत असतात. एखादी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी संस्था पुढाकार घेतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण देणे, वाचनालये असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी संस्था पुढे येतात. त्यासाठी त्यांना मदत हवी असते आणि त्यामुळे संस्थेला कायदेशीररीत्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते.
स्वयंसेवी संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याचा नमुना https://charity.maharashtra.gov.in/Portals/0/Files/Societies%20Registrat या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मराठीमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यात "प्रणाली मार्गदर्शन'मध्ये न्यास नोंदणी येथे संस्था नोंदणीचा अर्ज उपलब्ध आहे. त्याची प्रिंट काढूनही अर्ज करता येऊ शकतो.
*🔹 नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे*
ही कागदपत्रे आवश्यक
संस्था नोंदणी करण्यासाठी किमान सात सदस्य आवश्यक असतात. नोंदणी करताना सर्व सदस्यांची ओळखपत्रे आवश्यक असतात.
संस्थे साठी एक नाव निवडावे.नाव निवडत असताना त्या नावाची त्या भागात दुसरी संस्था नाही ना याची खात्री करावी.सदस्य संख्या ७ ,९ किंवा ११ असावी.संस्थेचा काय ऊद्देश आहे तो नमुद करावा.
📎आधार कार्ड
📎पॅनकार्ड
📎मतदान ओळखपत्र
📎ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र
पासपोर्ट
📎ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी एक स्वत: ऍटेस्टेड केलेले)
याशिवाय पत्त्याचा पुरावा म्हणून लाइट बिल, पॅन कार्ड, अर्ज करणाऱ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो व सदस्यांची मेल आयडी, मोबाईल क्रमांक व व्यवसाय याची यादी असावी लागते.
*🔹 नोंदणी*
संस्था नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.फेबु.२०१७ पासुन ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. सध्या ऑनलाइन अर्ज करण्याकडे नागरिकांचा कल आहे.हि नोंद१९५० व १८६० च्या कायद्याखाली केली जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मग अर्ज पूर्ण तपासून झाल्यानंतर काही ठिकाणी त्याच दिवशी किंवा सात दिवसांच्या आत संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जात असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातून सांगितले जात आहे.
संस्था नोंदणी करण्यासाठी नियमानुसारच शुल्क घेतले जाते. याची सर्व माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणीही विनाकारण पैसे न देता थेट कार्यालयात संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाचा वापर करून संस्थेची नोंदणी करावी. काही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, असे कार्यालयाच्या वतीने सांगितले जात आहे.
https://bit.ly/32gxNwm

0
Answer link
संस्थेची नोंदणी (Registration) करण्यासाठी खालील प्रक्रिया आणि कागदपत्रे आवश्यक आहेत:
1. संस्थेचा प्रकार निश्चित करा:
प्रथम तुमची संस्था कोणत्या प्रकारात मोडते हे निश्चित करा. उदा. धर्मादाय संस्था, सार्वजनिक न्यास, सहकारी संस्था, कंपनी इ.
2. संस्थेचे नाव निश्चित करणे:
आपल्या संस्थेसाठी योग्य नाव निवडा. ते नाव आधीपासूनच नोंदणीकृत नसावे.
3. घटनात्मक कागदपत्रे तयार करणे:
संस्थेचे उद्दिष्ट, नियम, आणि कार्यपद्धती नमूद करणारे घटनात्मक कागदपत्र (Constitution/Memorandum of Association) तयार करा.
4. आवश्यक कागदपत्रे:
- अर्जाचा नमुना (Application Form)
- संस्थेच्या सदस्यांची यादी (List of Members)
- संस्थेचा पत्ता पुरावा (Address Proof of the Organization)
- ओळखीचा पुरावा (Identity Proof)
- घटनात्मक कागदपत्रे (Constitution/Memorandum of Association)
- इतर आवश्यक कागदपत्रे (regulator requirement नुसार)
5. नोंदणी कार्यालयात अर्ज सादर करा:
आपल्या संस्थेच्या प्रकारानुसार योग्य निबंधक कार्यालयात (Registrar Office) अर्ज सादर करा.
6. शुल्क भरा:
नोंदणी शुल्क भरा आणि त्याची पावती जपून ठेवा.
7. पडताळणी आणि मंजुरी:
अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर, निबंधक तुमच्या संस्थेची नोंदणी करतात आणि तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) देतात.
नोंदणीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:
- Cooperative Societies Registration: सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- Charity Commissioner: धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य