
संस्था नोंदणी
तुम्ही तुमच्या शैक्षणिक संस्थेची नोंदणी माहिती खालीलप्रमाणे मिळवू शकता:
-
संबंधित कार्यालयात संपर्क साधा:
- तुमच्या संस्थेची नोंदणी ज्या कार्यालयात झाली आहे, तिथे थेट संपर्क साधा.
- उदा. शिक्षण विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय (Charity Commissioner Office).
-
नोंदणीकृत कागदपत्रे तपासा:
- तुमच्या संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) आणि इतर संबंधित कागदपत्रे तपासा.
- त्यामध्ये संस्थेचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि इतर माहिती दिलेली असते.
-
अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या:
- शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन: https://education.maharashtra.gov.in/
- तुम्ही RTI (Right to Information) अंतर्गत माहिती मागू शकता.
नोंदणी माहितीमध्ये संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख आणि संस्थेचे व्यवस्थापन याबद्दलची माहिती असते.
संस्था स्थापन करताना संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव एकाच कुटुंबातील किंवा एकाच आडनावाचे असू शकतात की नाही, याबाबत काही कायदेशीर नियम आहेत. या संदर्भात माहिती खालीलप्रमाणे:
नियमांनुसार:
- संस्थेच्या कायद्यानुसार, अध्यक्ष आणि सचिव एकाच कुटुंबातील नसावेत असा कोणताही स्पष्ट नियम नाही. त्यामुळे, तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे.
- परंतु, अनेक तज्ञ आणि अनुभवी लोकांच्या मतानुसार, अध्यक्ष आणि सचिव एकाच कुटुंबातील नसावेत. कारण संस्थेच्या कारभारात हितसंबंधांचेconflict of interest issues संघर्ष निर्माण होऊ शकतात.
संस्थेच्या कारभारावर परिणाम:
- जर अध्यक्ष आणि सचिव एकाच कुटुंबातील असतील, तर निर्णय प्रक्रियेत bias (एकाच बाजूला झुकण्याची शक्यता) येऊ शकते.
- आर्थिक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये पारदर्शकता कमी होण्याची शक्यता असते.
- कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद झाल्यास संस्थेच्या कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
उपाय काय?
- अध्यक्ष आणि सचिव वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत.
- जर एकाच कुटुंबातील सदस्य असतील, तर संस्थेच्या नियमावलीत conflict of interest टाळण्यासाठी तरतूद करावी.
- निर्णय प्रक्रियेत जास्तीत जास्त सदस्यांचा सहभाग असावा.
अधिक माहितीसाठी, आपण LawRato ([https://lawrato.com/civil-lawyers/trust-ngo-society-lawyers](https://lawrato.com/civil-lawyers/trust-ngo-society-lawyers)) किंवा Vakilsearch ([https://vakilsearch.com/advice/how-to-register-a-society/](https://vakilsearch.com/advice/how-to-register-a-society/)) या वेबसाइट्सला भेट देऊ शकता.
Disclaimer: मी कायदेशीर सल्लागार नाही. त्यामुळे कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
संस्था नोंदणी कशी करावी
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
संस्था नोंदणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जावे लागते.स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था व फाउंडेशनची नोंदणी करण्यासाठी व संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालये आहेत.
https://bit.ly/32gxNwm
या कार्यालयांत धर्मादाय उपायुक्त, सहायक धर्मादाय आयुक्त यांच्यासह इतर कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी काम पाहतात. केवळ संस्था नोंदणीबद्दल माहिती नसल्याने अनेकजण हजारो रुपये घालवतात आणि त्यात वेळही घालवावा लागतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तुम्हाला मदतही करतात. मात्र त्यांच्यापर्यंत एजंटाशिवाय पोचायला हवे. नाहीतर काहीजण एजंटला गाठुन त्या मार्फत संस्था रजिस्टर करतात.केवळ माहिती नसलेने एजंट गाठावा लागतो.
https://bit.ly/32gxNwm
ग्रामीण व शहरी भागात सध्या अनेक स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था, फाउंडेशन अशा अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत असतात. एखादी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी संस्था पुढाकार घेतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण देणे, वाचनालये असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी संस्था पुढे येतात. त्यासाठी त्यांना मदत हवी असते आणि त्यामुळे संस्थेला कायदेशीररीत्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते.
स्वयंसेवी संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याचा नमुना https://charity.maharashtra.gov.in/Portals/0/Files/Societies%20Registrat या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मराठीमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यात "प्रणाली मार्गदर्शन'मध्ये न्यास नोंदणी येथे संस्था नोंदणीचा अर्ज उपलब्ध आहे. त्याची प्रिंट काढूनही अर्ज करता येऊ शकतो.
*🔹 नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे*
ही कागदपत्रे आवश्यक
संस्था नोंदणी करण्यासाठी किमान सात सदस्य आवश्यक असतात. नोंदणी करताना सर्व सदस्यांची ओळखपत्रे आवश्यक असतात.
संस्थे साठी एक नाव निवडावे.नाव निवडत असताना त्या नावाची त्या भागात दुसरी संस्था नाही ना याची खात्री करावी.सदस्य संख्या ७ ,९ किंवा ११ असावी.संस्थेचा काय ऊद्देश आहे तो नमुद करावा.
📎आधार कार्ड
📎पॅनकार्ड
📎मतदान ओळखपत्र
📎ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र
पासपोर्ट
📎ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी एक स्वत: ऍटेस्टेड केलेले)
याशिवाय पत्त्याचा पुरावा म्हणून लाइट बिल, पॅन कार्ड, अर्ज करणाऱ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो व सदस्यांची मेल आयडी, मोबाईल क्रमांक व व्यवसाय याची यादी असावी लागते.
*🔹 नोंदणी*
संस्था नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.फेबु.२०१७ पासुन ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. सध्या ऑनलाइन अर्ज करण्याकडे नागरिकांचा कल आहे.हि नोंद१९५० व १८६० च्या कायद्याखाली केली जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मग अर्ज पूर्ण तपासून झाल्यानंतर काही ठिकाणी त्याच दिवशी किंवा सात दिवसांच्या आत संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जात असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातून सांगितले जात आहे.
संस्था नोंदणी करण्यासाठी नियमानुसारच शुल्क घेतले जाते. याची सर्व माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणीही विनाकारण पैसे न देता थेट कार्यालयात संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाचा वापर करून संस्थेची नोंदणी करावी. काही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, असे कार्यालयाच्या वतीने सांगितले जात आहे.
https://bit.ly/32gxNwm
