कायदा कागदपत्रे

प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

2 उत्तरे
2 answers

प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

2
*⭕ प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त@ प्रमाणपत्र कागदपत्राची पुर्तता ⭕*
शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.शासकीय नोकरीमध्ये आरक्षण,कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.
प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-.
🔹कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
🔹.ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
🔹.रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सहप्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .

🔹.संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
🔹.मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.

🔹.मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीचीमूळप्रती..इ – स्टेटमेंटची प्रत.
🔹.मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
🔹.घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
🔹प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
🔹प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
🔹.मतदार यादीची नक्कल.
🔹तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
🔹.शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
🔹ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र
.🔹.पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
🔹प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.@

0
projektagrasta dakhala milavanyasathi laganari kagadapatre khali प्रमाणे आहेत:

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल
  • ग्रामपंचायत दाखला (ग्रामसेवक / तलाठी यांचा​)
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर

प्रकल्पाच्या कागदपत्रांची प्रत (झेरॉक्स):

  • अधिग्रहण नोटीस
  • award पंचनामा
  • 7/12 उतारा (हिस्सा नंबर सह​)
  • 8 अ चा उतारा
  • valuation रिपोर्ट
  • भोगवटादाराचे संमतीपत्र

इतर कागदपत्रे (लागू असल्यास):

  • वारस दाखला (आवश्यक असल्यास)
  • नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र
  • विवाह नोंदणी दाखला

टीप:

  • तुम्ही ज्या कार्यालयात अर्ज करत आहात, तेथील नियमांनुसार कागदपत्रांमध्ये बदल संभवतात. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी:

  • तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालयात (Rehabilitation Office) संपर्क साधू शकता.
  • महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: maharashtra.gov.in
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

आरटीआय माहिती तक्रार अर्जावर आपण काय कारवाई केली? मुद्देनिहाय अर्जाचा नमुना.
आरटीआय अंतर्गत माझ्या तक्रारींवर आपण काय कारवाई केली? मुद्देसूद अर्ज नमुना.
आरटीआय अर्जावर माहिती दिली नाही, तर तक्रार केल्यावर आपण काय कारवाई कराल? अर्जाचा नमुना सांगा.
वडील 1967 मध्ये मयत झाले, मोठ्या भावाने 1994 मध्ये इतर दोन भावांना अर्ज करून जमीन समान वाटप (सरस निरस) करून दिली, आणि आज एका मयत भावाची मुले वारस हक्काने जमीन मागत आहेत?
मला ग्रामसेवक ८ अ, फेरफार आणि खरेदी कागदपत्रे देत नाही?
पत्नीने घटस्फोट घेतल्यास मुलांची जबाबदारी कुणाकडे असते?
पत्नीला पतीकडून घटस्फोट पाहिजे आहे परंतु पत्नी सरकारी नोकरीत आहे. तर पत्नीने पतीकडून घटस्फोट घेतल्यास पत्नीच्या नोकरीवर त्याचा काही परिणाम होतो का?