गणित इतिहास

गणिताचे जनक कोण आहेत?

2 उत्तरे
2 answers

गणिताचे जनक कोण आहेत?

4
गणिताचे जनक श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०)हे आहेत



हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात तिरोड या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
उत्तर लिहिले · 7/9/2019
कर्म · 5595
0

गणिताचे जनक म्हणून आर्किमिडीज (Archimedes) यांना ओळखले जाते.

आर्किमिडीज:

  • ते एक ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, खगोलशास्त्रज्ञ आणि शोधक होते.
  • त्यांनी भूमिती, आकडेमोड आणि विश्लेषण यांसारख्या गणिताच्या अनेक शाखांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
  • आर्किमिडीजने पाय (π) ची किंमत काढण्यासाठीinnovative पद्धतीचा वापर केला.
  • त्यांनीintegrals चा पाया घातला,limit ची कल्पना मांडली.
  • त्यांनी lever आणि pulley system चा शोध लावला.

त्यांच्या कार्यामुळे गणिताला एक नवीन दिशा मिळाली आणि म्हणूनच त्यांना गणिताचे जनक मानले जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?