कायदा कर्ज वसुली

थकबाकी वसूल करण्यासाठी कायदा काय आहे?

2 उत्तरे
2 answers

थकबाकी वसूल करण्यासाठी कायदा काय आहे?

1
थकबाकी वसूल करण्यासाठी कायदा काय आहे?
*थकबाकी वसूल करण्यासाठी कायदा*🕘

१०१ कलमाचा अंतर्भाव हा मूलत: महसुलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कायद्याने करण्यात आला.

१०१ कलमाचा अंतर्भाव हा मूलत: महसुलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कायद्याने करण्यात आला. परंतु गृहनिर्माण संस्था, सहकारी बँका यांचे सभासद आणि ऋणको यांजकडील थकबाकी वसूल करणे शक्य व्हावे म्हणून या कायद्यात दुरुस्ती करून सहकारी संस्थांवर त्या कलमाचा लाभ करून देण्यात आला.


- त्यासाठी सहकार खात्यात वसुली अधिकारी नेमले जातात. परंतु थकबाकीधारकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी बँका यांनी नेमलेल्यांना शासनाने विशेष वसुली अधिकारी असे पदनाम देऊन त्यांनी थकबाकी वसूल करण्याचे अधिकार दिले. मात्र, त्यांना शासकीय दर्जा देण्यात आलेला नाही. ते त्या त्या सहकारी संस्थांचे कर्मचारी असतात. त्यांची नियुक्ती शासकीय राजपत्रात होत असते, तसेच थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजेत याचेही काही नियम आहेत. या नियमानुसारच विशेष वसुली अधिकाऱ्यांनी आपले काम करायचे असते.

- विशेष वसुली अधिकारी किती नेमायचे हे ज्या त्या सहकारी संस्थेच्या मगदुरावर अवलंबून असते. थकबाकी वसूल करताना त्यांच्याकडून विहित पद्धतीत चूक झाली तर थकबाकी वसुली प्रक्रिया अवैध ठरते. थकबाकी वसूल करण्यासाठी उपनिबंधक/ साहाय्यक निबंधकांकडून वसुली दाखला मिळाल्यावरच थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी संबंधित संस्थेने अगोदर थकबाकीदाराला पत्र पाठवून थकबाकी भरावी, अशी विनंती करण्यात येते. त्यासाठी संबंधित संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत/ व्यवस्थापन समितीत तसा ठराव संमत करावा लागतो.

- थकबाकी कशी वसूल करावी याबाबतची पुस्तिका जिल्हा हौसिंग फेडरेशनमध्ये विक्रीस उपलब्ध असते. या पुस्तिकेत थकबाकीदाराला पाठवायच्या नोटिसीचे नमुने दिलेले असतात. तसेच वसुली दाखला मिळविण्यासाठी लावायच्या चार प्रकारच्या कोर्ट स्टँप फीची माहिती, चौकशी शुल्काचे कोष्टक, लेखा-शीर्षक यांचीही माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

*अन्य स्वरूपाची माहिती :*

१) वसुली दाखला मिळविण्यासाठी करावयाचा अर्ज

(२) व्यवस्थापक समितीने करावयाचा ठराव

(३) सभासदाला द्यावयाची नोटीस

(४) सभासदाला द्यावयाची अंतिम नोटीस

५) चौकशी फी सरकारी खजिन्यात भरून मूळ चलन सादर करण्याबाबत

६) वसुली दाखला. या अर्जासोबत जोडावयाच्या नमुन्यांचा तपशीलही दिला आहे.

*थकबाकी वसुलीचे स्वरूप :*

- वसुली दाखला मिळविणे, ही थकबाकी वसुली प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. त्यासाठी सहकारी संस्था समितीचा ठराव, व्यवस्थापन समितीमध्ये किंवा सर्वसाधारण सभेने मान्य करावयास पाहिजे व या ठरावाच्या मान्यतेनंतर निबंधकांकडे वसुली मागणी केल्याप्रमाणे होत नाही. या कारणास्तव वसुली प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला पाहिजे. ज्याच्या विरुद्ध ठराव करण्यात आला आहे, तो थकबाकीदार आहे किंवा नाही आणि संस्थेच्या कागदपत्रांवरून त्याप्रमाणे ते सिद्ध होते की नाही, एवढेच निबंधकाने पाहावयाचे असते. त्यानंतरच निबंधकाने वसुली प्रमाणपत्र द्यावयास पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका प्रकरणात हा निर्णय आहे.

क्रमशः
उत्तर लिहिले · 20/8/2019
कर्म · 569265
0

थकबाकी वसूल करण्यासाठी भारतात अनेक कायदे आहेत, जे कर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यास मदत करतात. या कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे कायदे खालीलप्रमाणे:

1. नादारी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 (Insolvency and Bankruptcy Code, 2016):

  • या कायद्यानुसार, जर एखादी कंपनी किंवा व्यक्ती त्यांचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरली, तर लेनदार (creditor) नादारी प्रक्रिया सुरू करू शकतात.
  • या प्रक्रियेमध्ये, कर्जदाराच्या मालमत्तेचे मूल्यांकन केले जाते आणि लेनदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याची संधी दिली जाते.
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

2. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल एसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्योरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (SARFAESI Act, 2002):

  • हा कायदा बँकांना आणि वित्तीय संस्थांना त्यांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी अधिकार देतो.
  • या कायद्यानुसार, जर कर्जदार कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरला, तर बँक त्याची मालमत्ता जप्त करू शकते आणि ती विकून आपले पैसे वसूल करू शकते.
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

3. लिमिटेशन ॲक्ट, 1963 (Limitation Act, 1963):

  • या कायद्यानुसार, कर्जदाराला कर्ज वसुलीसाठी न्यायालयात जाण्याची एक अंतिम मुदत असते.
  • ठराविक वेळेत न्यायालयात अर्ज न केल्यास, कर्जदार आपले पैसे वसूल करण्याचा अधिकार गमावतो.
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

4. करार कायदा, 1872 (Contract Act, 1872):

  • कर्ज देणे आणि घेणे हे एक प्रकारचे करार (contract) असते.
  • या कायद्यानुसार, जर कोणी कराराचे उल्लंघन केले, तर दुसरा पक्ष न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई मागू शकतो.
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

या कायद्यांव्यतिरिक्त, विशिष्ट परिस्थितीनुसार इतर कायदे देखील लागू होऊ शकतात. त्यामुळे, थकबाकी वसूल करण्याच्या प्रक्रियेत योग्य कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5400

Related Questions

माझे काम केलेले पैसे समोरचा माणूस देत नाही, आणि माझा नंबर पण ब्लॉक केला, एक वर्ष झाले फक्त देतो देतो म्हणतोय पण देत नाही, तर त्याच्याकडून कसे पैसे काढावेत?
उधारी कशी वसूल करावी?
विशेष वसुली अधिकारी?
एखाद्या कडून दिलेले पैसे कसे परत मिळतील?
मी एका मित्राला आपल्या अकाउंट मधून 14 लाख रुपये दिले, ते परत कसे घेऊ? आणि त्याने नाही दिल्यास त्याच्यावर काय कारवाई केली जाईल?
बँक रिकव्हरी बद्दल माहिती पाहिजे?
आपण एखाद्याला दिलेल्या पैशाची वसुली कशी करावी?