सौंदर्य केस सौंदर्य आणि कल्याण आरोग्य

सलूनवाल्याकडून मसाज करून घ्यावा की नको?

2 उत्तरे
2 answers

सलूनवाल्याकडून मसाज करून घ्यावा की नको?

3
♍ *केस कापल्यानंतर सलूनवाल्याकडून मसाज करून घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा* ♍माहिती  सेवा गृप पेठवड़गाव
वृत्तसंस्था, बेंगळुरु केस कापल्यानंतर *सलूनवाल्या कडून मसाज करून घेण्याची सवय अनेकांना असते. मात्र, ही सवय बेंगळुरूतील एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे*.♍
केस कापून झाल्यानंतर त्यांनी सलूनवाल्याकडून मसाज करून घेतला आणि त्यानंतर त्यांना 'वर्टेलो-बॅसिलर स्ट्रोक'चा त्रास झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. इतकच नाही, तर पुढे त्रास वाढत गेल्यानं त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली.
मे महिन्यात बाबू रेड्डी यांनी नाव्ह्याच्या दुकानात जाऊन केस कापले. त्यानंतर मसाजही करून घेतला. मात्र मसाज झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. ते कसेबसे घरी पोहोचले पण त्यांचा त्रास कमी झाला नाही.
त्यांचा रक्तदाबही वाढला. अखेर त्यांना जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाबू यांना श्वसनाचा इतका त्रास जाणवत होता, की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
दहा दिवसाच्या औषधोपचारानंतर बरं वाटू लागल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आलं.आपण वाचत आहात माहिती सेवा गृप पेठवड़गावची पोस्ट 'घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. असं असलं तरी मी स्वत: ते पॅकेज निवडलं असल्यानं केवळ सलूनवाल्याची चूक असल्याचं म्हणणं चुकीचं ठरेल. म्हणून मी त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल करणार नाही', असं बाबू म्हणाले.
मात्र अन्य कुणी अशी चूक करू नये म्हणून मी ही माहिती आपल्याला देत असल्याचं त्यांनी सांगितलं.♍
*https://m.facebook.com/story.php?story_fbid=200883343642930&id=100011637976439*
'बाबू यांनी ज्या सलूनमधून डोक्याचा मसाज करून घेतला तिथला कर्मचारी वर्ग प्रशिक्षित नसावा. चुकीच्या पद्धतीनं मसाज केल्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा करणारी नस दाबली गेली होती, त्यामुळे त्यांना
'वर्टेलो-बॅसिलर स्ट्रोक'चा त्रास जाणवत होता.
'एमआरआय' अहवालातून हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ योग्य उपचार करण्यात आले', असं डॉ. महेश सांबशिवम यांनी सांगितले.♍
'अस्वस्थ वाटू लागल्यावर बाबू त्यांनी योग्य उपचारासाठी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेतला. यासोबत त्यांना इतर कोणताही आजार अथवा त्रास नव्हता. म्हणूनच त्यांची तब्येत चांगली राहिली, अन्यथा
अशा घटनांमध्ये कायमचं अपंगत्व किंवा मृत्यूचाही धोका असतो,' असंही डॉक्टरांनी सांगितलं. अशा घटना टाळण्यासाठी कोणत्याही सलूनमध्ये मसाज घेणं टाळावं, असा सल्लाही त्यांनी दिला.♍
0

सलूनमध्ये मसाज घ्यावा की नको, हे काही गोष्टींवर अवलंबून असते:

फायदे:

  • सोयीस्कर: सलूनमध्ये हेअरकट आणि इतर सौंदर्य सेवांबरोबर मसाजची सुविधा असल्याने वेळ आणि श्रम वाचतात.
  • तज्ञ: काही सलूनमध्ये प्रशिक्षित आणि परवानाधारक मसाज थेरपिस्ट असतात.

तोटे:

  • दर्जा: सर्व सलूनमध्ये उच्च-गुणवत्तेचे मसाज दिले जात नाहीत. काही ठिकाणी अप्रशिक्षित लोक मसाज करू शकतात.
  • स्वच्छता: सलूनमधील स्वच्छता मानके नेहमी उच्च प्रतीची नसतात आणि त्यामुळे त्वचेचे संक्रमण होण्याचा धोका असतो.
  • एकाग्रता: सलूनमध्ये गोंगाट आणि लोकांची सतत ये-जा असल्यामुळे मसाजचा अनुभव शांत आणि एकाग्रचित्त करणारा नसेल.

निष्कर्ष:

जर तुम्ही सलूनमध्ये मसाज करण्याचा विचार करत असाल, तर सलूनची प्रतिष्ठा, मसाज थेरपिस्टचे प्रमाणपत्र आणि स्वच्छतेची खात्री करा. या ऐवजी, तुम्ही स्पा किंवा वेलनेस सेंटरमध्ये मसाजचा अनुभव घेऊ शकता, जिथे तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा मिळतील.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

स्तन वाढवण्यासाठी काय करावे?
मी १८ वर्षांचा आहे, माझे डोळे आत गेले आहेत आणि चेहरा असा दिसतो की महिन्यांपासून काही खाल्लेच नाही. तर मला उपाय सांगा?
माझे वय २२ आहे आणि माझ्या दाढीचे व डोक्यावरचे केस खूप पांढरे होत आहेत, यावर काही उपाय सांगा?
पतंजली केश तेल केस गळतीवर उपाय चांगला आहे का?
मला मांड्यांवरील व पृष्ठभागावरील चरबीमुळे लोकांच्या चिडवणुकीचा त्रास होतो आहे, कृपया यावर काही उपचार व डॉक्टर सुचवा?
सर, माझे वय २७ आहे तर माझ्या चेहऱ्यावरील दाढीचे केस पांढरे का होत आहेत? तर दाढीचे केस काळे राहण्यासाठी उपाय काय आहे?
माझे वय 20 वर्ष आहे पण माझे केस माझ्या वयामानाने खूपच पांढरे झाले आहेत, त्यासाठी काय करावे?