2 उत्तरे
2
answers
कार्य म्हणजे काय?
4
Answer link
‘कार्य’ म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय.
w = f × s
कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही ‘आदिश राशी’ आहे.
SI पद्धतीला बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन – मीटर म्हणजेच ज्यूल हे आहे.
CGS पद्धतीत डाईन-सेंटीमीटर किंवा अर्ग आहे.
1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
1 अर्ग = 1 डाईन × 1 सें.मी.
1 ज्यूल = 107 अर्ग
ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बालाने केलेले कार्य घन असते.
बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्या बलाने केलेले कार्य ऋण असते.
ज्या वेळी बाल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते.
उदाहरणे :-
बंद बस ढकलणे – धन कार्य
चेंडूचा झेल घेणे – ऋण कार्य
दोरीला बांधलेला दगड फिरवणे – शून्य कार्य
पृथ्वी व सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.
यामध्ये केंद्रकीय बलाने केलेले कार्य शून्य आहे.
सरल दोलक विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेने कार्य करते, तर दोरीवरील ताण त्याच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात.
त्यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत असतो. त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते.

0
Answer link
कार्य (Work): भौतिकशास्त्रामध्ये, कार्य म्हणजे एखाद्या वस्तूवर बल (force) लावल्याने ती वस्तू विस्थापित (displace) झाल्यास, कार्य झाले असे म्हटले जाते.
व्याख्या:
- जेव्हा एखादे बल एखाद्या वस्तूवर लावले जाते आणि त्या वस्तूचे സ്ഥാന बदलते, तेव्हा त्या बलाने कार्य केले असे म्हणतात.
- कार्य हे बल आणि वस्तूच्या दिशेने झालेले विस्थापन यांचा गुणाकार आहे.
सूत्र:
कार्य (W) = बल (F) × अंतर (d) × cos θ
येथे,
- F = बल (Force)
- d = अंतर (Distance)
- θ = बल आणि विस्थापन यांच्यातील कोन
कार्याचे SI एकक:
जूल (Joule) हे कार्याचे SI एकक आहे.
उदाहरण: टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलणे, वजन उचलणे, गाडी ढकलणे इत्यादी.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: