गणित भूमिती

काटकोनाची व्याख्या सांगा?

2 उत्तरे
2 answers

काटकोनाची व्याख्या सांगा?

3



​९० अंशाच्या कोनाला भूमिती अथवा त्रिकोणमितीमध्ये काटकोन असे म्हणतात. वर्तुळाभोवतीचे एक चतुर्थांश वळण काटकोनाच्या मापाच्या समान असते. ज्याच्या दुप्पट कोन हा १८०° अथवा अर्ध्या वळणाच्या समान आहे असा कोन म्हणजे काटकोन होय अशी काटकोनाची व्याख्या करता येते.


​या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.
उत्तर लिहिले · 29/6/2019
कर्म · 3930
0

काटकोन:

ज्या कोनाचे माप 90 अंश असते, त्या कोनाला काटकोन म्हणतात.

काटकोनाची वैशिष्ट्ये:

  • हा कोन नेहमी 90 अंशाचा असतो.
  • काटकोन दर्शवण्यासाठी कोनाच्या आत एक लहान चौरस काढला जातो.
  • त्रिकोणामध्ये एक काटकोन असल्यास, त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात.

उदाहरण:

  • घड्याळातील 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन असतो.
  • टेबलच्या कडा एकमेकांना काटकोनात असतात.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440

Related Questions

वृत्तचितीचे क्षेत्रफळ किती?
एका सायकल दुकानांमध्ये काही दुचाकी व काही तीन चाकी सायकल आहेत. त्यांची हँडल मोजली असता 40 भरतात व त्यांच्या चाकांची संख्या 104 भरते, तर अनुक्रमे तीन चाकी व दोन चाकी सायकलची संख्या किती?
एका सायकलच्या दुकानात काही तीन चाकी व काही दोन चाकी सायकल आहेत. जर हँडल मोजले तर 40 भरतात आणि चाके मोजले तर 104 भरतात, तर अनुक्रमे किती सायकल असतील?
32 फूट विहिरीचा घेरा आहे तर लांबी किती?
एका दोरीला समान तेरा भाग करायचे असल्यास ती किती ठिकाणी कापावी लागेल?
79 साठी स्वच्छता दिलेल्या आकृतीमधील वेगळी आकृती ओळखा?
1900 साठी सूचना दिलेल्या आकृतीमध्ये वेगळी आकृती ओळखा?