भारत आकाशवाणी रेडिओ तंत्रज्ञान

भारतात नभोवाणीची सुरुवात कधी झाली?

3 उत्तरे
3 answers

भारतात नभोवाणीची सुरुवात कधी झाली?

0
______________________________
💫 _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 💫

_*‼भारतीय नभोवाणी प्रसारण प्रारंभ   ‼*_
📻


____________________________
💫 *_माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव_*💫
____________________________
.        *_☒दि. २३ जून २०१९☒_*
*☒🎙(२३जून १९२७)*
आकाशवाणी : (ऑल इंडिया रेडिओ). रेडिओ-कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची यंत्रणा. भारतात नभोवाणीचा विकास गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षातच झालेला आहे. १९२६ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या एका खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई व कलकत्ता येथे जुन ते आँगस्ट १९२७ या काळात दोन रेडिओ-केंद्रे सुरू केली. या केंद्रांची कार्यक्रम ४८ किमी. च्या परिसरातच ऐकू येण्याची व्यवस्था होती. या सुमारास देशात १,००० रेडिओ-परवाने होते. १९२७ च्याही अगोदर भारतात नभोवाणीचा प्रसार खाजगी हौशी क्लबांद्वारा झालेला होता. १९२४ मध्ये मद्रास येथे पहिला रेडिओ-क्लब स्थापन झाला. हौशी रेडिओ-क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर, व डेहराडून येथे चालविले जात होते. सरकारने भावी काळात स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रांचे हे रेडिओ-क्लब अग्रदूत ठरले. म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद ह्या पाच ठिकाणीही नभोवाणी-कार्य चालू होते. म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले. परदेशी वृत्तपट व इंग्रजीमधून प्रसारित होणाऱ्या वार्तापटांच्या वेळी मात्र ‘ऑल इंडिया रेडिओ’ (ए आय् आर्) असे संबोधण्यात येऊ लागले. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी १ मार्च १९३० मध्ये बुडाली व भारत सरकारने लगोलग नभोवाणी-कार्य स्वतःकडे घेतले. १९३६ मध्ये लायोनल फील्डन ह्यांनी नभोवाणी-प्रमुख ह्या नात्याने सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली. स्वातंत्र्योत्तर काळातच आकाशवाणीचा खऱ्या अर्थाने विकास होत गेला.        
*_∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭_*
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_🌈
https://m.facebook.com/story.php?story_fbid=521516234912971&id=100011637976439
____________________________
☒उद्दिष्टे : देशी विदेशी बातम्यांचे संकलन करून बातमीपत्रे प्रक्षेपित करणे, देशाचा योजनाबद्ध सर्वांगीण विकास कसा होईल ह्याबद्दलचे विचार व माहिती जनतेला पुरविणे, त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या सांस्कृतिक विकासाकडेही मनोरंजक कार्यक्रम आखून लक्ष पुरविणे, ही आकाशवाणीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मनोरंजन व माहितीकरिता नभोनाट्ये, संगीताचे बहुविध कार्यक्रम, भाषणे, संभाषणे, चर्चा वगैरे सादर केल्या जातात. विद्यार्थी, महिला, मुले व ग्रामीण जनता ह्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित करण्यात येतात. देशातील सर्व पक्षांशी व राज्य-सरकारांशी विचार विनिमय करून केंद्र सरकारने आकाशवाणीवरील भाषणांविषयी एक नऊ-कलमी संहिता तयार केली आहे.
आकाशवाणीची एप्रिल १९७३ अखेर ६९ प्रसारकेंद्रे असून त्यांचे पाच विभाग करण्यात आले आहेत. याशिवाय बडोदे, दरभंगा, म्हैसूर, विशाखापटनम् व शांतिनिकेतन या शहरांत साहाय्यक प्रसारकेंद्रे कार्य करीत आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट मध्यम तरंगांवरूरन प्रसारित केले जाणारे आकाशवाणीचे कार्यक्रम देशातील सु. ३२ कोटी लोक ऐकू शकतात. लघु-तरंगांवरही कार्यक्रम ऐकता येण्याची सोय उपलब्ध आहे. तथापि भारताच्या सु. ५६ टक्के प्रदेशात व सु. ७३ टक्के लोकसंख्येलाच मध्यमतरंगांवरील कार्यक्रम ऐकू येतात. देशात एकूण एक कोटीवर रेडिओ आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने प्रत्येक पाच व्यक्तींमागे किंवा विकसनशील देशांत वीस व्यक्तींमागे एक रेडिओ असावा, असे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात हे उद्दिष्ट साध्य करणे हे किती अवघड कार्य आहे, याची त्यावरून कल्पना येईल.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_
*🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵*
.       _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
0
नभोवाणीची स्थापना कुठे झाली?
उत्तर लिहिले · 20/7/2021
कर्म · 0
0

भारतामध्ये नभोवाणीची (Radio Broadcasting) सुरुवात १९२३ मध्ये झाली.

१९२३ मध्ये 'रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे'ने पहिले प्रसारण केले.

नंतर, १९३६ मध्ये 'ऑल इंडिया रेडिओ' (All India Radio - AIR) ची स्थापना झाली आणि या संस्थेने नभोवाणीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

डिजिटल आर्टचे तोटे काय आहेत?
कॉम्प्युटरच्या भाषेतील वॉइड (void) आणि आपल्या आयुष्यातील void (शून्य, खालीपणा) यामध्ये काही साम्य आहे का? असल्यास तुमचा दृष्टिकोन काय?
If use a want to send a on cryted message to use b theb plaintextbis en crypted with the public key of?
गुगल न वापरलेले खाते बंद करण्याची प्रक्रिया काय आहे?
गुगल अकाउंट परत परत साइन इन केले, मी लॉगिन आयडी व पासवर्ड रिकव्हरी आयडी विसरलो आहे. मोबाईल नंबर आहे, मूळ आयडी कसा रिकव्हर करू?
तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
हिंदी किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी ॲप्स?