2 उत्तरे
2
answers
लोकसभेचे अध्यक्ष कोण असतात?
3
Answer link
भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी सभापतीवर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा सभापती लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो. सुमित्रा महाजन ह्या लोकसभेच्या विद्यमान सभापती आहेत.
0
Answer link
लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेच्या सदस्यांमधून निवडले जातात. ते लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी जबाबदार असतात.
निवड:
- लोकसभेच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष निवडले जातात.
- अध्यक्षांची निवड लोकसभेच्या सदस्यांद्वारे केली जाते.
कार्य:
- सभागृहाचे कामकाज व्यवस्थित पार पाडणे.
- सदस्यांना बोलण्याची संधी देणे.
- मताधिकार वापरणे (केवळ निर्णायक स्थितीत).
- शिस्त पाळणे आणि नियमांचे पालन करणे.
भारताचे विद्यमान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. अधिक माहितीसाठी येथे पहा