भारताचा इतिहास शिवाजी महाराज राजेशाही इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला?

3 उत्तरे
3 answers

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला?

8
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तरबालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता.अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्यनिनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारतीओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणिधनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला
1
या प्रश्नाचे उत्तरासाठी खाली एक लिंक देत आहे ती पहावी.
६ जून १६७४ ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार ...
https://www.uttar.co/answer/5cf8d266f7a707e4b6b72727
उत्तर लिहिले · 9/6/2019
कर्म · 12245
0

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. हा दिवस मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण या दिवसापासून मराठा साम्राज्य एका सार्वभौम आणि स्वतंत्र राज्याच्या रूपात ओळखले जाऊ लागले.

राज्याभिषेकाची पूर्वतयारी:

  • शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी रायगडाची निवड केली. रायगडाला राजधानी बनवून त्याची डागडुजी करण्यात आली.
  • देशभरातून विद्वान ब्राह्मण आणि मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले.
  • राज्याभिषेकासाठी आवश्यक असणारी सामग्री जमवण्यात आली.

राज्याभिषेकाचा विधी:

  1. राज्याभिषेकाच्या दिवशी सकाळी महाराजांनी विविध धार्मिक विधी केले.
  2. अभिषेकासाठी विविध नद्यांमधील पवित्र जल आणले गेले.
  3. आठ प्रधान (अष्टप्रधान मंडळ) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांना सिंहासनावर बसवण्यात आले.
  4. गागाभट्ट नावाच्या काशीच्या प्रसिद्ध ब्राह्मणाने मंत्रोच्चार करत महाराजांना अभिषेक केला.
  5. महाराजांनी 'छत्रपती' ही पदवी धारण केली, आणि मराठा साम्राज्य स्वतंत्र घोषित केले.

राज्याभिषेकानंतर:

  • राज्याभिषेकानंतर महाराजांनी नवीन नाणी जारी केली, ज्यात 'शिवराई' हे तांब्याचे नाणे आणि 'होन' हे सोन्याचे नाणे होते.
  • त्यांनी नवीन शक सुरू केले, ज्याला 'राज्याभिषेक शक' म्हटले जाते.

या राज्याभिषेकाने शिवाजी महाराजांना एक सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळाली आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1860

Related Questions

राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी कोणती?
राणी कशाशी संबंधित आहे?
शिवाजी महाराजांचे छत्रपती कोण झाले?
शिक्षण विकासाला ह्या राजाने प्रोत्साहन दिले?
राजे हे काय असते?
छत्रपती शिवाजी महाराजांना "राजा" ही पदवी कोणी बहाल केली?
भारताचा शेवटचा आदर्श राजा कोण होता?