3 उत्तरे
3
answers
एनसीसीचे फायदे कोणते?
9
Answer link
NCC अर्थात National Cadet Corps म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना.

छात्रांमध्ये शील, शिस्त, संयम, निर्णयक्षमता, बुद्धी, एकोपा, समानता, राष्ट्राभिमान, उच्चविचारसरणी, ध्येयनिष्ठा, समयनिष्ठता, आज्ञाधारकपणा, इत्यादी गुणांचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय छात्र सेना कार्य करते.
सोबतच असे गुणी छात्र सैन्यात भरती करता यावेत यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते.
राष्ट्रीय छात्र सेना देशपातळीवर तीन प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन करते.
शालेय स्तरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती ए प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना ए प्रमाणपत्र मिळते.
महाविद्यालयीन स्थरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती बी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना बी प्रमाणपत्र मिळते.
महाविद्यालयीन स्थरावर ३ वर्षांचे प्रशिक्षणांती व बी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास सी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना सी प्रमाणपत्र मिळते.
उपरोक्त सर्व प्रमाणपत्रांवर श्रेणी दिलेल्या असतात. ए किंवा बी श्रेणीत उत्तीर्ण होणे गरचेचे असते.
ज्या छात्रांना सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ए किंवा बी श्रेणी प्राप्त होते ते खालील फायदे मिळवू शकतात.
- तीनही दलांचे मूलभूत प्रशिक्षण छात्रांना राष्ट्रीय छात्र सेना देते.

- सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ए किंवा बी श्रेणी प्राप्त छात्र राष्ट्रीय छात्र सेना विशेष प्रवेश योजनेद्वारे अर्थात एन सी सी स्पेशल एन्ट्री स्कीमद्वारे कोणतीही लेखी परीक्षा न देता, सेवा निवड आयोग अर्थात सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस एस बी) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या साक्षात्कारास उपस्थित राहू शकतात आणि सैन्यात अधिकारी म्हणून भरती होऊ शकतात.
- याउपर सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ए किंवा बी श्रेणी प्राप्त छात्र, सैनिक पदाकरिता लेखी परीक्षा न देता सैन्यात भरती होऊ शकतात.
- पोलीस खात्यात भरतीप्रक्रियेमध्ये सी प्रमाणपत्राचे वाढीव गुण मिळतात शिवाय प्रमाणपत्राचा उपयोग बढती वेळेस ही होतो.
0
Answer link
एनसीसी मध्ये स्वच्छता ठेवायची आहे.
एनसीसी मध्ये डिसिप्लिन ठेवायचे असते.
एनसीसी पासून आपल्याला पोलीस भरती किंवा आर्मी मध्ये भरती होऊ शकते आणि एअरफोर्स मध्ये पण भरती होऊ शकते.
0
Answer link
एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) चे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
1. व्यक्तिमत्व विकास:
- एनसीसी विद्यार्थ्यांना शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये शिकवते.
- हे विद्यार्थ्यांना टीमवर्क आणि सहकार्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत करते.
2. करिअरच्या संधी:
- सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये भरतीसाठी एनसीसी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
- 'सी' सर्टिफिकेट धारकांना संरक्षण दलात विशेष सवलती मिळतात.
- अनेक खाजगी क्षेत्रातील कंपन्या एनसीसी प्रशिक्षित उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देतात.
3. शारीरिक तंदुरुस्ती:
- एनसीसीमध्ये नियमित शारीरिक प्रशिक्षण आणि कवायती केल्या जातात, ज्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती सुधारते.
- विद्यार्थ्यांना खेळ आणि साहसी उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते.
4. सामाजिक सेवा:
- एनसीसी विद्यार्थी रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या सामाजिक सेवा कार्यात सक्रियपणे सहभागी होतात.
- हे विद्यार्थ्यांना समाजाप्रती जबाबदार नागरिक बनण्यास प्रोत्साहित करते.
5. शैक्षणिक लाभ:
- काही महाविद्यालये आणि विद्यापीठे एनसीसी कॅडेट्सना प्रवेश प्रक्रियेत अतिरिक्त गुण देतात.
- एनसीसी कॅडेट्सना शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक लाभांसाठी देखील संधी उपलब्ध असतात.