2 उत्तरे
2
answers
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
3
Answer link
*मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो ?*
**************************************
माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था तीन ते चार तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.
स्नायूंमध्ये मायोसीन आणि अॅक्टिन नावाचे तंतू असतात. त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व अॅक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.
भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर दोन ते तीन तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरीर परत शिथील होते. मायोसिन व अॅक्टीनचे विघटन झाल्यामुळे स्नायूंचा कडकपणा जातो.
रायगर माॅर्टिसमुळे मृत्यूच्या वेळेसंबंधी अंदाज बांधता येतो. दुसरे म्हणजे मरणाच्या वेळी व्यक्तीची काय अवस्था होती, हेही कळू शकते. असे हे रायगर माॅर्टिस म्हणजेच मृतदेहांचे कडक होणे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याद्वारे जणू मृतदेहही मदत करतो !

0
Answer link
मृत्यूनंतर मानवी शरीरात अनेक बदल होतात, त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे शरीर कडक होणे. याला इंग्रजीमध्ये rigor mortis म्हणतात.
मृतदेह कडक होण्याची कारणे:
- ATP ( adenosine triphosphate) चा अभाव: स्नायूंच्या कार्यासाठी ऊर्जा आवश्यक असते, जी ATP द्वारे पुरवली जाते. मृत्यूनंतर, शरीरात ATP तयार होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे स्नायू शिथिल होण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि ते आकुंचन पावतात.
- कॅल्शियमचे असंतुलन: सामान्य स्थितीत, कॅल्शियम स्नायूंच्या पेशींमध्ये साठवले जाते. मृत्यूनंतर, हे कॅल्शियम पेशींमधून बाहेर पडते आणि स्नायूंच्या तंतूंना बांधून ठेवते, ज्यामुळे ते कडक होतात.
- स्नायू प्रथिने (muscle proteins): ऍक्टिन (actin) आणि मायोसिन (myosin) नावाचे प्रथिने स्नायूंच्या आकुंचनासाठी (contraction) आवश्यक असतात. ATP च्या अभावामुळे, ही प्रथिने एकमेकांना घट्ट धरून ठेवतात आणि स्नायू कडक बनतात.
कडकपणा कधी सुरू होतो आणि किती वेळ टिकतो?
- मृत्यू झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 तासांनी शरीर कडक होण्यास सुरुवात होते.
- 12 तासांनंतर कडकपणा पूर्णपणे जाणवतो.
- हा कडकपणा 24 ते 72 तास टिकून राहतो, त्यानंतर शरीर पुन्हा हळू हळू शिथिल होते.
कडकपणा कमी होण्याची प्रक्रिया:
शरीरातील प्रथिने आणि ऊती विघटित (decompose) होऊ लागतात, ज्यामुळे स्नायू हळू हळू शिथिल होतात आणि कडकपणा कमी होतो.