3 उत्तरे
3
answers
1 मे ला जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
4
Answer link
*_🚩महाराष्ट्र दिन व कामगार दिन विशेष:_*
*🔰📶महा डिजी अपडेट्स*
*1⃣ मे: महाराष्ट्र दिन*
*💁♂️चला मंडळी समजून घेऊ महाराष्ट्र 🚩*
*🚩महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन👨🏻🏭*
महान असे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र आज त्याच्या गौरवाचा दिवस म्हणजेच आज महाराष्ट्र दिन त्याचबरोबर दिवसरात्र कष्ट करून भारताच्या विकासात योगदान देणाऱ्या कामगारांचा आजचा दिवस म्हणजेच कामगार दिन.
छत्रपतींच स्वराज्य महाराष्ट्र आणि त्या राज्यात आपण जन्माला आलो त्याचा अभिमान सर्वांना असायला हवा, अशा मातीत जन्माला येण्यासाठी नशीब लागतं, म्हणजेच या मतीती काहीतरी खास आहे, या मातीला अशा लोकांचा अधिवास लाभलाय ज्यांची नाव इतिहासाच्या निवडक पणात सुवर्ण अक्षरांनी लिहली आहेत. त्या मातीची अस्मिता टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे व आपण ती टिकवू. छत्रपतींच स्वराज्य अबाधित राखू.
*🌺🔰📶महा डिजीटल कडून आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा🌺*
आज एक मे. १९६० साली आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी राज्यातील महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. आजच्या ६० व्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात महराष्ट्राबद्दलच्या खास गोष्टी.
🗺1 मे 1960 या दिवशी 106 हुतात्मांच्या बलिदानानंतर आणि अखंड चळवळीनंतर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
*_आंतरराष्ट्रीय कामगार दिन, जाणून घ्या...._*
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, प्रत्येकाला महाराष्ट्र दिनाचा इतिहास नक्की माहीत असणार. त्यामुळे आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिनाबद्दल जाणून घेणार आहोत. 1मे हा दिवस कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस 80 हून अधिक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी दिन म्हणून बनवला जातो.
औद्योगिक क्रांती झाली आणि रोजगार मिळू लागला,परंतु कामगारांची अधिक पिळवणूक होऊ लागली. यामुळे अनेक कामगार एकत्र आले व कामगार संघटना स्थापन. झाल्या. कामगारांना 12 ते 14 तास काम करावे लागत, तसेच साप्ताहिक सुटी देखील मिळत नसल्याने कामगारांनी अनेक चळवळी सुरू केल्या.
कामगारांच्या अनेक मागण्या होत्या जसे की कामगारांना आठ तास काम असावे, कामगारांना साप्ताहिक सुट्टी असावी..
याला विरोध करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले व दोन वेळी राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले. त्यानंतर 1 मे 1891 पासून कामगार दिन. साजरा केला जातो.

____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
*_महा डिजिटल मॅगेझिन_*
____________________________________
*🚩MAHARASHTRA DAY 2023 : ...म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र दिन*
💥'मंगल देशा, पवित्र देशा.... प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' असं म्हणत आज बुधवारी म्हणजेच १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. अशा याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवसही साजरा केला जातो.
*💁♂का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन?*
⚡१९५६ च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्चयाची मागणी करण्यात आली.
👍याच मागण्या आणि आंदगोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
🌆 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
_⛳ या दिवसाचे विशेष महत्त्व असून प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा हा दिवस. या दिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते_
📣 *आज महाराष्ट्र दिन*
🎯 महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली. मागील 50 वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्राचे नाव देशात आघाडीवर आहे. कला, साहित्य ,क्रीडा,व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा, तसेच कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवरआहे.
🧐 *कशी झाली राज्याची स्थापना?:* स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या या चळवळीत 105 वीरांनी आपले बलिदान दिले. या चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तसेच महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला.
🙏 *मौलिक योगदान:* महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये एस.एम.जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादीअनेक महत्त्वांच्या व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले.
📍 *अव्वल राज्यांमध्ये गणना:* गेल्या काही काळात महाराष्ट्राने अतुलनीय प्रगती केली आहे. देशातील औद्योगिक प्रगतीमध्ये अग्रगण्य राज्य होण्याचा मान राज्याने मिळवला. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक,सांस्कृतिक आणि एकूणच समाज उन्नतीसाठी राज्याचं नाव आज जगभरात अग्रक्रमाने घेतलं जातं. देशातल्या मोजक्याच सुखवस्तू राज्यामध्ये महाराष्ट्राची गणना होते.
💁♂ उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळेच महाराष्ट्र जगला, तर देश जगेल, असं म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
💫 राज्याचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.
★★★★★★★★★★★★★★★★★
🚩 *जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम!*
📍 राज्यात 1 मे हा दिवस _*“महाराष्ट्र दिन”*_ आणि देशभरात *“जागतिक कामगार दिन”* म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित राज्यभरात विविध कार्यक्रम राबवले जातात.महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा.
💁🏻♂ *महाराष्ट्र दिना मागचा इतिहास ?*
◾ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
◾ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
◾ पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.
◾ राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे.
◾ महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे.
*💁🏻♂ कामगार दिना मागचा इतिहास ?*
◾ जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे.
◾ दर वर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.
◾ औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. अल्प मजुरीच्या बदल्यास 12 ते 14 तास राबवून घेतले जात होते.
◾ याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ 8 तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले.
◾ कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व 1891 पासून 1 मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
🗣 _*महाराष्ट्रातील खास बोलीभाषा !*_
🚩 _भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. त्यामुळेच महाराष्ट्रात अगदी कोसाकोसावर भाषेचा लहेजा बदलत जातो. मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे ' कोंकणी मराठी ', कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत असतात. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात._
💁♀ _*राज्यातील स्थानिक भाषा*_
⬛ _*मराठवाडी* - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्य़ात ही बोलीभाषा वापरली जाते. या बोलीभाषेवर कानडी व उर्दू भाषेचा प्रभाव आहे._
⬛ _*मालवणी* - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. विशिष्ट हेल काढून आलेले अनुनासीक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे._
⬛ _*झाडीबोली* - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत._
⬛ _*नागपुरी* - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. यावर काही प्रमाणात हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो._
⬛ _*अहिराणी* - जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे._
⬛ _*तावडी* - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो._
⬛ _*आगरी* - आगरी बोली ही महाराष्ट्राच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारा मोठा समाज आहे._
⬛ _*चंदगडी* - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे._
⬛ _*वऱ्हाडी* - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. या बोलीभाषेवर फारसी व हिंदीचा प्रभाव आहे._
⬛ _*देहवाली* - देहवाली भाषा प्रामुख्याने भिल्ल समाजात प्रचलित आहे. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे._
⬛ _*कोल्हापुरी*_ - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात कोल्हापुरचे विशेष स्थान आहे. ग्रामीण लहेजा असणाऱ्या या भाषेचा रांगडेपणा विशेष लक्ष वेधून घेतो.
⬛ _*बेळगावी* - महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेवर असणाऱ्या बेळगावात ही भाषा बोलली जाते. कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून ही बोलीभाषा निर्माण झाली आहे._
⬛ _*वाडवळी* - ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते._
*_ महाराष्ट्राबद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का_* ❓
_आज एक मे… राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. याच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात महराष्ट्राबद्दलच्या काही खास गोष्टी…_
◼महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य
◼महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कुवेत, पनामा, फिजी, कतार, ओमान, आर्यलँड, भूतान या देशांपेक्षाही अधिक
◼लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य
◼महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत
◼महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
◼महाराष्ट्रात १७ थंड हवेची ठिकाणे आहेत.
◼महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे
◼देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य
◼एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते
◼भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे
◼मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग
◼देशातील सरकारच्या मालकीचे सर्व सोने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूरमधील केंद्रात आहे.
युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अजंठा लेणी, वेरुळ लेणी आणि एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे
🚩 *महाराष्ट्र दिन विशेष*
🙏🏻 _महाराष्ट्र.. संतांनी सहिष्णूतेची बीजं पेरलेला, समाज सुधारकांनी विचारांची मशागत केलेला, साहित्यिकांनी समृद्ध केलेला, असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र..._
☄ *लोणार सरोवर-* _उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर जगभरातील लोकांसाठी हे सरोवर कुतूहलाचा विषय आहे. लोणार सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. बेसॉल्ट खडकातील हे एकमेव मोठं आघाती विवर आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरं आहेत. त्यातील १५ मंदिरं विवरातच आहेत. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलंय._
🏠 *शनीशिंगणापूरातील दरवाजा नसलेली घरं-* _महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथल्या घरांना दरवाजेच नाहीत. हे गाव म्हणजे शनीशिंगणापूर. एकीकडे लोक त्यांचे पैसे, दागिने सांभाळून लॉकरमध्ये ठेवतात. मात्र अहमदनगरमधल्या शनीशिंगणापूरमधील घरांना दरवाजेच नाहीत. कारण शनीशिंगणापूरमधील घरांचं संरक्षण खुद्द शनीदेव करतात, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे._
🚆 *देशातील पहिली रेल्वे-* _देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या याच महाराष्ट्रात धावली देशातली पहिली रेल्वे. स्वातंत्र्यपूर्व भारतात 16 एप्रिल 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे धावली. आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान ही रेल्वे धावली. दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी धावलेल्या या ट्रेननं 34 किलोमीटर अंतर पार केलं._
🏙 *जगातलं सर्वात मोठं नियोजित शहर-* _मुंबईवरील लोकसंख्येचा भार वाढू लागला आणि नवी मुंबईचा जन्म झाला. मात्र मुंबईच्या नियोजनात झालेल्या चुका नवी मुंबईची उभारणी करताना काटेकोरपणे टाळण्यात आल्या. 1972 मध्ये विकसित झालेली नवी मुंबई हे जगातलं सर्वात मोठं नियोजित शहर आहे._
🛣 *देशातलं सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं-* _देशातलं सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं महाराष्ट्रात आहे. यामुळेच महाराष्ट्र कायम उद्योग, व्यापार आणि व्यवसायात अग्रेसर राहिला. महाराष्ट्रात तब्बल पावणे तीन लाख किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते आहेत. देशातल्या कोणत्याच राज्यात इतकं मोठं रस्त्यांचं जाळं नाही._
🗺 *क्षेत्रफळात 'महा'राष्ट्र-* _महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि भौगोलिक स्थान ही राज्याची सर्वात मोठी जमेची बाजू. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. राकट आणि कणखर देश अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचं आकारमान भूतान, फिजी, कतार, ओमान, आर्यलँड, कुवेत, पनामा या देशांपेक्षाही जास्त आहे. युरोप खंडातले अनेक देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहेत._
🏭 *औद्योगिक उत्पादन:* _महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात कायमच अग्रस्थानी राहिलाय. त्यामुळे परदेशातून येणारी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होते. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या 24 टक्के उत्पादन होतं._
🌱 *संपन्न महाराष्ट्र-* _देशातलं सर्वात विकसित आणि संपन्न राज्य ही महाराष्ट्राची ओळख. अनेक आर्थिक अहवाल आणि मापदंडांवरुन हे सिद्धदेखील झालंय. देशात सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि सर्वात श्रीमंत राज्य म्हणजेदेखील महाराष्ट्रच._
💡 *उद्योगांचं माहेरघर-* _अनेक मोठ्या उद्योगांनी बाळसं धरलं ते महाराष्ट्रातच. आज भल्यामोठ्या वटवृक्षात रुपांतरित झालेल्या उद्योगांची बीजं महाराष्ट्रात रोवली गेली. टाटा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स उद्योग, गोदरेज, किर्लोस्कर ब्रदर्स, एस्सार, बजाज आणि असे अनेक उद्योग महाराष्ट्रात जन्माला आले आणि आज त्यांनी संपूर्ण जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय._
💸 *अर्थकारणाचं केंद्र-* _देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक प्रख्यात आणि महत्त्वाच्या वित्तीय संस्था महाराष्ट्रात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि सेबी यांची कार्यालयं मुंबईत आहेत._
*💥महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या १०६ हुतात्म्यांची नावं*
*२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे....*
सिताराम बनाजी पवार
जोसेफ डेव्हिड पेजारकर
चिमणलाल डी. शेठ
भास्कर नारायण कामतेकर
रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे
धर्माजी गंगाराम नागवेकर
रामचंद्र लक्ष्मण जाधव
के. जे. झेवियर
पी. एस. जॉन
शरद जी. वाणी
वेदीसिंग
रामचंद्र भाटीया
गंगाराम गुणाजी
गजानन ऊर्फ बंडू गोखले
निवृत्ती विठोबा मोरे
आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
बालप्पा मुतण्णा कामाठी
धोंडू लक्ष्मण पारडूले
भाऊ सखाराम कदम
यशवंत बाबाजी भगत
गोविंद बाबूराव जोगल
पांडूरंग धोंडू धाडवे
गोपाळ चिमाजी कोरडे
पांडूरंग बाबाजी जाधव
बाबू हरी दाते
अनुप माहावीर
विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे
सुभाष भिवा बोरकर
गणपत रामा तानकर
सिताराम गयादीन
गोरखनाथ रावजी जगताप
महमद अली
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
देवाजी सखाराम पाटील
शामलाल जेठानंद
सदाशिव महादेव भोसले
भिकाजी पांडूरंग रंगाटे
वासुदेव सुर्याजी मांजरेकर
भिकाजी बाबू बांबरकर
सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान
शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत
बबन बापू भरगुडे
विष्णू सखाराम बने
सिताराम धोंडू राडये
तुकाराम धोंडू शिंदे
विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबा महादू सावंत
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते
परशुराम अंबाजी देसाई
घनश्याम बाबू कोलार
धोंडू रामकृष्ण सुतार
मुनीमजी बलदेव पांडे
मारुती विठोबा म्हस्के
भाऊ कोंडीबा भास्कर
धोंडो राघो पुजारी
ह्रुदयसिंग दारजेसिंग
पांडू माहादू अवरीरकर
शंकर विठोबा राणे
विजयकुमार सदाशिव भडेकर
कृष्णाजी गणू शिंदे
रामचंद्र विठ्ठल चौगुले
धोंडू भागू जाधव
रघुनाथ सखाराम बीनगुडे
काशीनाथ गोविंद चिंदरकर
करपैया किरमल देवेंद्र
चुलाराम मुंबराज
बालमोहन
अनंता
गंगाराम विष्णू गुरव
रत्नु गोंदिवरे
सय्यद कासम
भिकाजी दाजी
अनंत गोलतकर
किसन वीरकर
सुखलाल रामलाल बंसकर
पांडूरंग विष्णू वाळके
फुलवरी मगरु
गुलाब कृष्णा खवळे
बाबूराव देवदास पाटील
लक्ष्मण नरहरी थोरात
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
गणपत रामा भुते
मुनशी वझीऱअली
दौलतराम मथुरादास
विठ्ठल नारायण चव्हाण
देवजी शिवन राठोड
रावजीभाई डोसाभाई पटेल
होरमसजी करसेटजी
गिरधर हेमचंद लोहार
सत्तू खंडू वाईकर
गणपत श्रीधर जोशी
माधव राजाराम तुरे(बेलदार)
मारुती बेन्नाळकर
मधूकर बापू बांदेकर
लक्ष्मण गोविंद गावडे
महादेव बारीगडी
कमलाबाई मोहित
सीताराम दुलाजी घाडीगावकर
_______________________________
*_🚩महाराष्ट्र दिन विशेष: महाराष्ट्राबद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?_*
__________________________

*_📍युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अजंठा लेणी, वेरुळ लेणी आणि एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे._*
*📍माहिती स्त्रोत:* विकीपीडिया
____________________________________
*_🛠कामगारांना ‘या’ मराठी माणसामुळे मिळतेय रविवारची सुट्टी_*
_१ मे हा मराठी लोकांसाठी ‘महाराष्ट्र दिन’ आहे, तर हाच दिवस बहुतांश जगात ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतातील सर्व कामगारांना एका मराठी व्यक्तीमुळे रविवारची सुट्टी मिळायला सुरूवात झाली. कामगार दिनाचे औचित्य साधत आपण याविषयी माहिती जाणून घेऊयात.._
*_🤔कशी झाली सुरवात?_*
इंग्रजांच्या काळात मीलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावे लागत होते. आठवड्यात एकही दिवस हक्काची सुटी मिळत नसे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते. मात्र, कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती. कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशन स्थापना केली. त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा. तसेच रविवार खंडोबा या देवाचा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी.
*_📣सात वर्षाचा लढा_*
नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल घ्यावी लागली. मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली. १८८४मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला.
*_🤔कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे ?_*
भारतीयांना हक्काची रविवारची सुट्टी मिळण्यात एका मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच. १८८४मध्ये लोखंडे यांनी कामगारासाठी लढा दिला. त्यांचा लढा तब्बल सात वर्ष चालला. यादरम्यान त्यांनी अनेक आंदोलने केली. अखेर १० जून १८९० रोजी इंग्रंज सरकारने भारतीयांना रविवारची सुट्टी जाहीर केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही भारतामध्ये आजही रविवारची सुट्टी आहे. लोखंडे यांना ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. लोखंडे महत्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. २००५ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले होते.
*_📣म्हणून काही पाश्चिमात्य देशात रविवारी सुट्टी?_*
सर्वसाधारणपणे ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असतो. याचे कारणही मजेशीर आहे. सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली त्याचे वर्णन आहे. पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात. चर्चमध्ये रविवारी सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात.
*🤔 भारतामध्ये कसा साजरा झाला पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन❓*
1⃣ भारतामध्ये पहिला कामगार दिन मद्रास शहरामध्ये 'मद्रास उच्च न्यायालया'समोर 1 मे 1923 मध्ये साजरा करण्यात आला.
▪'लेबर किसान पार्टी हिंदुस्थान' या संघटनेने भारतामध्ये पहिला कामगार दिन पाळला.
❓पहिल्यांदा भारतात याच दिवशी 'लाल बावटा' वापरण्यात आला असं सांगण्यात येते.
📍कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार दिनाचे आयोजन.
📣 जगभरात 1 मे दिवशी कामगारांच्या सन्मानार्थ सुट्टी जाहीर केली जाते.
_📌 गुजरातपासून महाराष्ट्र वेगळा झाला त्यामुळे महाराष्ट्रात 1 मे दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातो_
💫 *१ मे - महाराष्ट्र दिन..आणि जागतिक कामगार दिन..!*
▪१ मे १९६० रोजी अखंड महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.त्यामुळे १ मे हा 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.
▪महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी,यांसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले,त्यांच्या स्मृतीस या दिवशी अभिवादन केले जाते
▪२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिल्याने फ्लोरा फाउंटन परिसरात मराठी माणसांनी काढलेल्या विराट मोर्चामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.
▪हा विशाल मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी प्रारंभी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला.
▪गोळीबार झाला आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.
▪अखेर हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनापुढे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
-----------
💁♂ _*महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिन*_
_आपण 1 मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. आज त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..._
🤔 _*महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?*_
_आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1960साला पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होते. त्यानंतर मात्र कालांतराने स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी जोर धरु लागली. यात अनेकांनी मुंबईसह महाराष्ट्रची मागणी केली. तर मोरारजी देसाई यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी केली._
_देसाईंच्या या मागणीला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी मोठा संघर्षही झाला. या संघर्षात सर्वात मोठा वाटा हा गिरणी कामगारांचा होता. या संघर्षानंतर 1 मे, 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते._
🎯 _*कामगार दिन*_ : _दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो._
🧐 _*कामगार दिन कसा सुरू झाला?*_ : _औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास 12 ते 14 तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली._
_प्रत्येक कामगाराला केवळ 8 तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व 1891 पासून 1 मे हा कामगारदिन पाळण्यात येतो._

*💁♂️चला मंडळी समजून घेऊ महाराष्ट्र 🚩*
आजच्या ६४ व्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात महराष्ट्राबद्दलच्या ६० खास गोष्टी.
*१)*
महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.
*२)*
महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कुवेत, पनामा, फिजी, कतार, ओमान, आर्यलँड, भूतान या देशांपेक्षाही अधिक आहे.
*३)*
लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.
*४)*
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२
*५)*
महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत.
*६)*
मराठी बोलणाऱ्यांची संख्या सहा कोटी २४ लाख ८१ हजारहून अधिक आहे.
*७)*
महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
*८)*
देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.
*९)*
महाराष्ट्रात १७ थंड हवेची ठिकाणे आहेत.
*१०)*
महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे
*११)*
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे.
*१२)*
ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.
*१३)*
प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे भाग पडतात.
*१४)*
महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.
*१५)*
सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची ओळख या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात.
*१६)*
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.
*१७)*
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.
*१८)*
महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंद्यांमध्ये रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योगांचा समावेश होतो.
*१९)*
धातू उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स हे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत.
*२०)*
आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्यासारखी पिके महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत.
*२१)*
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नगदी पिकांमध्ये शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखूचा समावेश होतो.
*२२)*
माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली आहे.
*२३)*
भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई आहे.
*२४)*
भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे.
*२५)*
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.
*२६)*
महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड, शिवनेरी, व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे आहेत.
*२७)*
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.
*२८)*
गोंधळ, लावणी, भारुड, अभंग आणि पोवाडा हे लोकसंगीताचे प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हे लोकसंगीत महाराष्ट्राची खरी ओळख आहेत.
*२९)*
ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर असे काही काही प्रमुख लेखक व कवी महाराष्ट्राने देशाला दिले आहेत.
*३०)*
मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची यादी सांगायची झाल्यास व्ही. शांताराम, दादा कोंडके, बाबुराव पेंटर, पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.
*३१)*
मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला.
*३२)*
संगीतनाटके आणि नाट्यसंगीताचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे.
*३३)*
बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी एकेकाळी रंगभूमी गाजवली आहे.
*३४)*
कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी प्रामुख्याने जास्त खाल्ली जाते.
*३५)*
मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष हा नऊवारी साडी तर पुरुषांचा पारंपारिक वेष हा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे.
*३६)*
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत.
*३७)*
शिवजयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा हे सण देखील उत्साहात साजरे होतात.
*३८)*
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली.
*३९)*
स्त्री शिक्षणाच्या चळवळीसाठी महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते. या लोकांचे कार्य हे देशातील इतर राज्यांमधील समाज सुधारकांसाठी दिशादर्शक ठरले.
*४०)*
राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.
*४१)*
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध आहे.
*४२)*
एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. एस.टी. बस या ग्रामीण महाराष्ट्राची लाइफ लाइन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
*४३)*
महाराष्ट्रात पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.
*४४)*
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.
*४५)*
मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत.
*४६)*
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, सातारा या शहरांचा समावेश होतो.
*४७)*
महाराष्ट्रातील लेणी, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात.
४८)महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे.
*४९)*
महाराष्ट्रातील लोणार सरोवर जगभरात प्रसिद्ध आहे. उल्का पडल्याने तयार झालेल्या या सरोवराचे वय ५२ हजार वर्षांहून अधिक आहे.
*५०)*
महाराष्ट्रातील शनीशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. याच कारणामुळे हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहे.
*५१)*
महाराष्ट्रातील नवापूर रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो तर अर्धा गुजरातमध्ये येतो.
*५२)*
औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते त्यापैकी आज १३ प्रवेशद्वारे सुस्थितीमध्ये आहेत.
*५३)*
देशातील सरकारच्या मालकीचे सर्व सोने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूरमधील केंद्रात आहे.
*५४)*
मुंबईमधील लोकल ट्रेनमधून रोज जवळजवळ ६० लाख प्रवासी प्रवास करतात. हा आकडा इस्त्राइलच्या लोकसंख्येहून अधिक आहे.
*५५)*
युनिस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार स्थळं महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अजिंठा लेणी, वेरुळ लेणी आणि एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.
*५६)*
शेखरु म्हणजेच Indian giant squirrel या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे. तर हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
*५७)*
कब्बडी हा राज्याचा प्रमुख खेळ आहे.
*५८)*
महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.
*५९)*
केंद्र सरकारला सर्वाधिक रक्कम कराच्या स्वरुपात देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. डिसेंबर २०१९ ला महाराष्ट्राने १३ हजार कोटींहून अधिक रक्कम जीएसटी (वस्तू व सेवा कर) म्हणून केंद्राला दिली आहे.
*६०)*
महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधून आल्याचे मानले जाते. संस्कृतमधील 'महा' म्हणजेच महान आणि 'राष्ट्र' म्हणजे देश हे दोन शब्दांना एकत्रित करुन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र.

2
Answer link
⛳️महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
राज्य पुर्नरचना कायदा १९५६ नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या.
यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्चयाची मागणी करण्यात आली.
याच मागण्या आणि आंदोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६+१ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
संकलन
आर.एम.डोईफोडे
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे.

0
Answer link
येथे 1 मे रोजी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो याची माहिती दिली आहे:
जागतिक कामगार दिन (आंतरराष्ट्रीय कामगार दिन):
- सुरुवात: 1886 मध्ये अमेरिकेमध्ये कामगारांनी 8 तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी करत संप पुकारला.
- शिकागोची घटना: 4 मे 1886 रोजी शिकागोतील हेमार्केट स्क्वेअरमध्ये एका बॉम्बस्फोटात अनेक कामगार आणि पोलीस मारले गेले.
- स्मरण: या घटनेतील शहीद कामगारांच्या स्मरणार्थ आणि कामगारांच्या हक्कांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
- उद्देश: कामगारांचे हक्क आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणे.
- भारतात: भारतात 1923 पासून कामगार दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिन:
- स्थापना: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
- विलीनीकरण: मुंबईसह मराठी भाषिक प्रदेश आणि विदर्भातील काही भाग एकत्र करून महाराष्ट्र राज्य बनले.
- संयुक्त महाराष्ट्र चळवळ: मराठी भाषिक लोकांचे एक राज्य असावे यासाठी मोठी चळवळ झाली, ज्यामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिले.
- स्मरण: या चळवळीतील शहीदांचे स्मरण केले जाते आणि महाराष्ट्राच्या निर्मितीचा आनंद साजरा केला जातो.
- उद्देश: महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि परंपरा जतन करणे आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे.
1 मे हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे, म्हणून तो दोन्ही कारणांसाठी साजरा केला जातो.
अधिक माहितीसाठी: