4 उत्तरे
4
answers
श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल माहिती मिळेल का?
2
Answer link
_*👇🔮✍️@महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून समाजप्रबोधनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीतेतून मांडले. ग्राम विकास, ग्राम स्वच्छता, शेतीविकास, गोधन याविषयी ग्रामगीतेतून विचार मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. खंजिरी भजनाला लोकप्रियता मिळवून दिली. देशभर हिंडून त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. 30 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन.*_
_*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या पंधराव्या अध्यायात गोवंश सुधारविषयक विचार मांडले आहेत. गायीचे महत्त्व पटवून देताना धार्मिक कारणापेक्षा गाई शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयुक्त आहे, असे विचार त्यांनी परखडपणे मांडले. दुधाच्या भेसळीविषयीचे प्रश्न आध्यायाच्या पहिल्या चरणात मांडले आहेत. आजच्या परिस्थितीत दुधाला बाजारभाव नाही. सततचा दुष्काळ आणि शेतकरी हमीभावाची वाट पाहत आहे. असे ग्रामीण व्यवस्थेचे चित्रण तुकडोजी महाराजांनी अगदी वैशिष्ट्येपूर्ण मांडले आहे. याविषयी ते म्हणतात की, हा देश गोपाळांचा होता. आज मात्र गायी कमी झाल्या आहेत. काही कसायाला विकताहेत. चाराही महाग झाला आहे. मनुष्याला रोजगार राहिला नाही मग गायी कशा पाळणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. गोसंवर्धनाविषियी विचार मांडताना त्यांनी गो महत्त्वही विशद केले आहे.*_
_*शेतीसाठी गोवंश बैल महत्त्वाचा आहे. आधुनिक यंत्र असतानाही बैलांद्वारे शेती उत्तम होते. शिवाय गायीच्या दुधात जो सत्वांश आहे. तो कोणत्याच पदार्थात नाही. पूर्वी गायी, बैल ज्या शेतकऱ्याच्या दिमतीला होते तेथे आजारपण नव्हते आणि गरिबीही नव्हती. गाव कशी स्वयंपूर्ण होती हे ग्राम गीतेतून लक्षात येते. आज नको ते साथीचे आजार पसरत आहेत. शिवाय प्रत्येक मनुष्याची रोग प्रतिकारकशक्ती कमी होताना दिसत आहे. जनावरांच्या मलमूत्रापासून शेताला सुबकता येत होती. त्यामुळे धनधान्य मुबलक होते. आज पशुसंवर्धन करताना देशी गाय मात्र नाहिशी होत चालली आहे. शिवाय बैलाविना गायीला संकर कृत्रिम पद्धतीने (कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा) होत आहे. दुधाचा उपयोग चहा कॉफीसाठी होऊ लागला आहे. माणूस मांस भक्षण करू लागला आहे. दुभती जनावरे विकून आराम करू लागल्याने माणूस सुखाच्या दिवसाला मुकला अशी आज माणसाची अवस्था झाल्याचे तुकडोजी महाराज सांगतात.*_
_*गोमातेची सेवा ही शेतकरीच नव्हे तर श्रीकृष्ण, भगवान शिवशंकर, वशिष्ठ ऋषी, दत्तदिगंबर, दिलीप राजा व शिवछत्रपती यांनीही गोसेवा केली. अनेक संत महात्म्यांनी गायीची महती विशद केली आहे. त्यांनी गायीची अपार सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचा नावलौकिक मागे राहिला. ज्यांनी घरादाराचा त्याग केला, भिक्षा मागितली, भटकंती केली, स्वतः उपाशी राहिले तरीही गोसेवेचे विसरणे झाले नाही. महाराजांनी गोमातेतील देवत्वही विशद केले आहे.*_
_*गायीच्या दुधाचा वापर हा मनुष्याबरोबर प्राणीमात्रालाही होतो. गायीच्या दुधाची महती सांगताना महाराज म्हणतात, दुधाने शक्ती व बुद्धीत वाढ होते म्हणून दुधात सरस्वतीचा वास आहे. दुधाने शरीर निरोगी राहते म्हणून धन्वंतरीची दृष्टी आहे. ताक पोटासाठी उपयुक्त, तूप मस्तक शांत ठेवते म्हणून सूर्य चंद्र आहेत तर शेणाने खत म्हणून शेत उत्तम पिकते, धनप्राप्ती होते म्हणून लक्ष्मी आहे. बैल श्रम मूर्ती आहे. गोमूत्र विविध आजारांवर उपयुक्त आहे. महाराजांनी गायीबरोबर गोवंश सुधारणेवर लक्ष दिले आहे. विविध गुण असलेली गाय ही देशाचे अधिष्ठान आहे. तिचक महत्त्व विशद करताना उपयुक्तता मांडली आहे.*_
_*गावोगावी व्हावी गो-उपासना / _*गोसेवा, गोदुग्ध मंदिर स्थापना /*_
_*रुची लावावी थोर लहान/ गो दुग्धाची परोपरी //*_
_*सर्व करावे जे जे करणे / परी _*सुधारावे सात्विक खाणे /*_
_*त्या वाचोनि सद्बुद्धि येणे / कठीण वाटे //*_
_*ग्राम व्यवस्थेत गोशाळा, गो उपासना, गो दुग्धमंदिर म्हणजे दुग्ध संस्था होय. यातून गायी पाळण्याची गोडी वाढवावी तसेच समृद्ध सदृढ बालकासाठी दुधाची गोडी लावावी, असे महाराज सांगतात. पुढे ते म्हणतात, गो रक्षणासाठी शक्य ते करावे. सात्विक आहार घ्यावा. सात्विकतेतून चांगली शक्ती, सद्बुद्धी व उत्तम आरोग्य लाभेल. शक्ती नसेल तर संपत्तीही लाभणार नाही. पुढे महाराज उत्तम मल्ल, उत्तम व्यायाम, आहार, विहार, पौष्टिक खाद्य, दिनचर्या, आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात. गोसेवा ही देशसेवा व ईश्वरसेवा मानतात.*_
_*महाराज सांगतात की, प्रत्येक व्यक्ती जर याप्रमाणे वागला तर त्यास रोग होणार नाही. खेडे असो की शहर असो ते निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. आज अतिशय धकाधकीच्या जीवनात आपण जीवनमूल्य हरवत चाललो आहे. यावर ग्रामगीता हस उत्तम उपाय आहे.*_
____
🙏🏻 _*आधुनिक काळातील महान संत*_
📍 _तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. आज 30 एप्रिल रोजी त्यांचा स्मृतिदिन असून त्यांना अभिवादन._
💁🏻♂ _*काही रंजक गोष्टी*_
◾तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते.
◾तुकडोजीचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली येथे झाला.
◾संपूर्ण नाव माणिकदेव बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट) होय.
◾त्यांच्या काऱ्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते.
◾प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले.
◾श्री संत अडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकडोजी’ ठेवले होते.
◾तुकडोजी महाराजांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.
◾जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
◾देव, धर्म, जाती भेद, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत.
◾सन 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
◾1949 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली.
◾विदर्भ साहित्य संघाच्या तुमसर संमेलनात त्यांचा थोर साहित्यिक म्हणून गौरविण्यात आले.

1
Answer link
🙏 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची माहिती
💫 तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.
💁♂ अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव माणिकदेव बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट) होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत अडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकडोजी’ ठेवले होते.
👌 देव, धर्म, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. आयुष्यभर ते खेड्यापाड्यात फिरले. हा देश त्यांनी बघितला. त्यातून लोकांची दुःख दूर झाली पाहिजे, या उर्मीने ते झटत राहिले. ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.
👍 *विशेष:*
▪ 1949 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली.
▪ जपानमध्ये 1955 मध्ये भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
▪ 18 देशांच्या समितीचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
▪ विदर्भ साहित्य संघाच्या तुमसर संमेलनात त्यांचा थोर साहित्यिक म्हणून गौरविण्यात आले.
▪ युद्धजन्य परिस्थितीत सैन्यास धीर देण्यासाठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गायली.
🎯 देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करु शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
📍 कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
🙏 अशा या महान संतांस विनम्र अभिवादन 🙏

0
Answer link
श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
जन्म: ३० एप्रिल, १९०९
मृत्यू: ११ ऑक्टोबर, १९६८
श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक आध्यात्मिक गुरु, समाजसुधारक आणि कवी होते. त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात.
जीवन
- तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी महाराष्ट्रातील यावली गावी झाला.
- त्यांचे बालपणीचे नाव माणिक बंडोजी इंगळे होते.
- तुकडोजी महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि रूढीवादी विचार दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
- त्यांनी ग्रामगीता लिहिली, जी आजही ग्रामविकासासाठी मार्गदर्शक ठरते.
कार्य
तुकडोजी महाराजांनी अनेक सामाजिक कार्ये केली:
- गावोगावी फिरून त्यांनी ग्राम स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यावर जोर दिला.
- त्यांनी सामुदायिक प्रार्थना आणि भजनांच्या माध्यमातून लोकांमध्ये एकजूट निर्माण केली.
- तुकडोजी महाराजांनी 'अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा'ची स्थापना केली, ज्यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले.
विचार
तुकडोजी महाराजांचे विचार साधे पण प्रभावी होते:
- ग्राम विकास: त्यांनी गावांना आत्मनिर्भर बनवण्यावर लक्ष केंद्रित केले.
- मानवता: त्यांनी मानवतेला सर्वात मोठे मूल्य मानले.
- अंधश्रद्धा निर्मूलन: समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचार दूर करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ग्रामगीता
ग्रामगीता हे तुकडोजी महाराजांनी लिहिलेले एक महत्त्वपूर्ण साहित्य आहे. यात ग्रामविकासाचे आणि आदर्श समाजाचे मार्गदर्शन दिलेले आहे.
अधिक माहितीसाठी: