2 उत्तरे
2 answers

तहसीलदार म्हणजे काय?

5
शासनाच्या तहसिलीचा प्रमुख अधिकारी असतो. तहसील म्हणजे वसूली. त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की, इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात. जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिंदीत तहसील म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च मुलकी अधिकारी असतो. त्याला इंग्रजीत मामलतदार आणि मराठीत मामलेदार म्हणतात. मामलेदाराची नेमणूक राज्य लोक सेवा आयोगाकडून होते

मामलेदार करवसूलीव्यतिरिक्त तालुक्यातली इतर अनेक सरकारी कामे करतो. तो प्रसंगी दिवाणी दाव्यांमध्ये न्यायदानही करतो.
     या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते.
तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे –

तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
उत्तर लिहिले · 23/4/2019
कर्म · 210095
0

तहसीलदार हे भारतातील एक महत्त्वाचे शासकीय पद आहे.

तहसीलदार म्हणजे काय:

  • तहसीलदार हा तालुका स्तरावरील महसूल प्रशासनाचा प्रमुख असतो.
  • तो जमीन अभिलेख अद्ययावत ठेवतो.
  • महसूल संकलन करतो.
  • नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत आणि पुनर्वसन कार्याचे व्यवस्थापन करतो.
  • तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी म्हणूनही काम करतो.
  • निवडणुकीच्या कामात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या(Deputy Collector) मदतीने काम करतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1660

Related Questions

लॉर्ड क्लाइव्हची दुहेरी राज्यव्यवस्था स्पष्ट करा?
पाटबंधारे विभागामध्ये ऑनलाईन विनंती अर्ज ग्रामपंचायतीला करता येतो का?
विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे?
खाजगी प्रशासन व शहरी प्रशासन?
न्यायमंडळ कार्यकारी मंडळ काय आहे?
लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला, उत्तम?
विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?