भारत भारतीय सेना संरक्षण लष्करी सराव

भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव झाला?

2 उत्तरे
2 answers

भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव झाला?

6
“बोल्ड कुरुक्षेत्र-2019”: भारत आणि सिंगापूर यांचा लष्करी सराव #Army #Sarav

“बोल्ड कुरुक्षेत्र-2019” या नावाने भारत आणि सिंगापूर या दोन देशांच्या लष्करांच्या संयुक्त सरावाची सांगता झाली. झांसी येथील बाबिना छावणीत दिनांक 8 मार्च 2019 पासून या सरावाचा आरंभ झाला आणि सराव तीन दिवस चालला.

दोन्ही देशांमध्ये 2017 साली झालेल्या संरक्षण कराराच्या पार्श्वभूमीवर हा सराव आयोजित केला जात आहे. दहशतवादविरोधी कार्यात सहकार्य वाढविणे, संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि सागरी सुरक्षा सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.

सिंगापूर हा मलेशियाच्या दक्षिणेकडील एक बेट राष्ट्र आहे. हे एक जागतिक आर्थिक केंद्र आहे. सिंगापूर हे एक शहर, राजधानी आणि राष्ट्र आहे. देशाचे राष्ट्रीय चलन सिंगापूर डॉलर हे आहे. सिंगापूर बेट हे सिंगापूरचे मुख्य बेट आहे, ज्याला ‘पुलाऊ उंजोंग’ असे म्हणतात.
                       संकलन
               आर.एम.डोईफोडे
               शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, पुणे .
*****************************************
उत्तर लिहिले · 13/4/2019
कर्म · 16010
0

भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान अग्नि वॉरियर (Agni Warrior) नावाचा संयुक्त लष्करी सराव झाला. हा सराव तोफखाना सरावावर (Artillery Exercise) आधारित असतो.

highlights:

  • उद्देश: दोन्ही सैन्यांदरम्यान समन्वय वाढवणे आणि परस्परांच्या सर्वोत्तम पद्धती आत्मसात करणे.
  • सहभागी सैन्य: भारतीय तोफखाना दल (Indian Army Artillery) आणि सिंगापूर तोफखाना दल (Singapore Army Artillery).

हा सराव नियमितपणे आयोजित केला जातो.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2140

Related Questions

इंद्र सराव कोणत्या दोन देशा दरम्यान झाला?
युद्ध सराव म्हणजे काय आणि तो कसा केला जातो?