लष्करी सराव
0
Answer link
इंद्र हा लष्करी सराव भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. हा सराव 2003 पासून सुरू आहे. इंद्र सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान समन्वय वाढवणे आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहकार्य करणे आहे.
6
Answer link
“बोल्ड कुरुक्षेत्र-2019”: भारत आणि सिंगापूर यांचा लष्करी सराव #Army #Sarav
“बोल्ड कुरुक्षेत्र-2019” या नावाने भारत आणि सिंगापूर या दोन देशांच्या लष्करांच्या संयुक्त सरावाची सांगता झाली. झांसी येथील बाबिना छावणीत दिनांक 8 मार्च 2019 पासून या सरावाचा आरंभ झाला आणि सराव तीन दिवस चालला.
दोन्ही देशांमध्ये 2017 साली झालेल्या संरक्षण कराराच्या पार्श्वभूमीवर हा सराव आयोजित केला जात आहे. दहशतवादविरोधी कार्यात सहकार्य वाढविणे, संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि सागरी सुरक्षा सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.
सिंगापूर हा मलेशियाच्या दक्षिणेकडील एक बेट राष्ट्र आहे. हे एक जागतिक आर्थिक केंद्र आहे. सिंगापूर हे एक शहर, राजधानी आणि राष्ट्र आहे. देशाचे राष्ट्रीय चलन सिंगापूर डॉलर हे आहे. सिंगापूर बेट हे सिंगापूरचे मुख्य बेट आहे, ज्याला ‘पुलाऊ उंजोंग’ असे म्हणतात.
संकलन
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, पुणे .
*****************************************

5
Answer link
दहशतवाद, तस्करी आणि घुसखोरी हे प्रश्न जगभरात महत्त्वाचे ठरत आहेत. अशा वेळी त्याविरोधात कारवाईसाठी देशादेशांत लष्करी सहकार्य वाढवणे आणि दहशतवाद, घुसखोरी तसेच तस्करीविरोधात कारवाई करताना मदत करणे यासाठीच हा युद्ध सराव होत असतात. दहशतवाद, तस्करी आणि घुसखोरी याविरोधात कारवाईसाठी एकमेकांना मदत करणे सोपे जावे, भू-सुरुंगाचा शोध घेऊन ते नष्ट करणे आणि शांतता मोहिमे दरम्यान कारवायांचा सराव करणे, जागतिक शांतता वस्थैर्यासाठी आपली बांधिलकी दर्शवणे, तसेच परस्परांतील लष्करी सहकार्य वाढवणे, या हेतूने या संयुक्त युद्ध सरावाचे नियोजन करण्यात येते. विविध देशांतील जवान या सरावात सहभागी झाल्याने त्यांना भाषेचा अडथळा येऊ नये, म्हणून त्या त्या देशाच्या भाषेतील इंटरप्रेटर उपलब्ध करून देण्यात येतात.