नोकरी अधिकारी सरकारी नोकरी

मंडळ अधिकाऱ्याची कामे कोणती?

2 उत्तरे
2 answers

मंडळ अधिकाऱ्याची कामे कोणती?

9
महसुल अधिकारी हा आपली सर्व कार्यालयीन कृत्ये आणि कामकाज यांच्या बाबतीत , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,1966 च्या कलम 224 अन्वये , यांच्या कर्तव्यपालनाचे स्थळ , काळ आणि पध्दती यांच्या संबंधात , तो ज्याच्या दुय्यम असेल त्या अधिका-याचे निर्देश व नियंत्रण यांच्या अधिन असतो.अधिनियमाच्या कलम 11 च्या पोट-कलम 3 अन्वये काढलेला शासकीय आदेश क्रमांक युएनएफ -1467 (एफ)  आर , दिंनाक 14 ऑगस्ट 1967 अन्वये मंडल अधिका-याचा निकट वरिष्ट हा यथास्थिती नायब तहसिलदार किंवा तहसिलदार असून ,तलाठयाचा निकट परिष्ट त्या मंडलाचा प्रभारी असलेला मंडल निरीक्षक / मंडल अधिकारी हा असतो . म्हणून मंडल अधिका-यांना /मंडल निरीक्षकांना आणि तलाठयांना आपली कर्तव्ये आपल्या वरिष्ट अधिका-यंाच्या निदेशानुसार पार पाडावी लागतात. अधिनियमाची निरनिराळी कलमे आणि त्याखालील नियम यांमध्ये त्यांची कर्तव्ये व कार्ये विनिदिष्ट केलेली आहेत. त्यांची सांविधिक कर्तव्ये व कार्ये यांची सुची  या भागातील पुढील दोन प्रकणांमध्ये अधिक तपशिलवार दिलेली आहेत. याखेरीज , मंडल निरीक्षक आणि मंडल अधिकारी यांची कर्तव्ये देखील महाराष्ट्र जमीन महसूल मंडल अधिकारी आधि मंडल निरीक्षक (कर्तव्य  आणि कार्ये )नियम 1970 यामध्ये विहित केलेली आहेत.

आपली कर्तव्य पार पाडतांना त्यांनी अनुसरावयाची कार्यपध्दती ही मुख्यत:अधिनियमाच्या कलम 238 मध्ये तरतूद केलेल्या सर्वसाधारण चौकशीचे काम पार पाडण्यासाठी विहीत केलेली कार्यपध्दती राहील . ही कार्यपध्दती अधिनियमाच्या निरनिराळया तरतुदींखाली तयार केलेल्या नियमांन्वये विहीत केलेली आहे. उदाहरणार्थ  , फेरफाराची नोंद होताच तलाठयांनी धारकांना नोटिसा पाठवणे आवश्यक असते .  कलम 230 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल अधिका-यांची कार्यपध्दती )नियम , 1967 च्या नियम 3 मध्ये , नोटीस पाठविण्यासंबंधीच्या पध्दतीची तरतूद केली आहे. मंडल निरीक्षकांनी आणि तलाठयांनी अधिकार अभिलेख प्रकरणावर कार्यवाही करतांना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख  आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम , 1971 मध्ये केली आहे. सीमा -चिन्हांची दुरुस्ती ,मळईची जमीन , पुराने वाहून गेलेली जमीन , इत्यादी सारख्या बाबी ज्ञ्संबंधही अशीच तरतूद केलेली आहे. मंडल निरीक्षकाच्या किंवा तलाठयाच्या विशिष्ट कर्तव्याशी किंवा कार्याशी संबंधीत असलेला जमीनविषयक अधिनियम आणि नियम यांचे म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , 1966 आणि त्याखालील केलेले नियम , यांचे उतारे परिशिष्ट "अ" मध्ये दिलेले आहेत . याखेरीज , तलाठयाची मुख्य कर्तव्ये महसुली लेखे आणि भूमी अभिलेख योग्य प्रकारे ठेवण्याच्या संबंधतील आहेत. हे लेखे आणि अभिलेख योग्य प्रकारे ठेवण्यासाठी कार्यपध्दतीविषयक बाबींसंबंधी तपशिलवार सुचना या खंडाच्या भाग दोन मधील प्रत्येक नमुन्याची आणि नोंदवहीखाली दिलेल्या आहेत. या सुचनांचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे . पुढील परिच्छेदांमध्ये घालून दिलेल्या कार्यपध्दतीचे देखील काटेकोरपणे पालन करण्यात यावे .
उत्तर लिहिले · 11/4/2019
कर्म · 39105
0

मंडळ अधिकाऱ्याची कामे खालीलप्रमाणे:

  • जमीन महसूल व्यवस्थापन:
    • जमीन महसूल गोळा करणे.
    • जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
    • मिळकत पत्रिकांचे व्यवस्थापन करणे.
  • गावपातळीवरील प्रशासन:
    • गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे.
    • नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करणे.
    • गावातील विकासकामांवर लक्ष ठेवणे.
  • सरकारी योजनांची अंमलबजावणी:
    • शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.
    • योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करणे.
    • योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
  • निवडणूक प्रक्रिया:
    • मतदार याद्या अद्ययावत करणे.
    • निवडणूक प्रक्रियेत मदत करणे.
  • इतर कामे:
    • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे.
    • शासकीय कामात मदत करणे.

मंडळ अधिकारी हा शासनाचा महत्वाचा घटक असतो. तो गावपातळीवर शासनाचे प्रतिनिधित्व करतो आणि लोकांना शासकीय सेवा पुरवतो.

टीप: कामांची यादी थोडीफार बदलू शकते, कारण ती राज्य सरकार आणि वेळोवेळी निघणाऱ्या आदेशांवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

मी १२ वी नापास, वय ३५. तर मला सरकारी नोकरी मिळेल का?
पोलीस पाटील होण्यासाठी येणारे लेखी प्रश्न कोणते?
तुम्ही पोलीस पाटलाची नोकरी का करू इच्छिता?
तो सरकारी अधिकारी आहे किंवा नाही याची चौकशी कशी करावी?
सरकारी अधिकारी कामाच्या ठिकाणी जर राहत नसतील, तर माहिती अधिकार अर्ज कसा करावा?
विभागीय आयुक्तांच्या वरती कोणते अधिकारी असतात?
कलेक्टरच्या वरती कोणता अधिकारी असतो?