व्यक्तिमत्व इतिहास

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगा?

4 उत्तरे
4 answers

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगा?

3
*जोतीराव गोविंदराव फुले*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक*

*जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७*

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –

“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।  ”

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’
मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
उत्तर लिहिले · 11/4/2019
कर्म · 16010
1
🙏



थोर भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचे देहावसन झाले.  त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...

▪ महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये पहिली, 1851 मध्ये दुसरी आणि तिसरी मुलींची शाळा काढली.

▪ महात्मा फुले शिक्षणाचे महत्व असलेले व स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय होत. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून, तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.

▪ अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत 1852 मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत.

▪ इ.स. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. 

▪  समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

▪ सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.

▪ सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला. केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘बालहत्या प्रतिबंधगृह' ही संस्था सुरु केली.

▪ वयाच्या 60 व्या वर्षी जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना ‘महात्मा' ही पदवी बहाल केली. डॉ. आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत.

✍ महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या काही कवितेच्या ओळी अशा :

“विद्येविना मती गेली; मतीविना नीती गेली;
नीतीविना गती गेली; गतीविना वित्त गेले;
वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

- LetsUp
उत्तर लिहिले · 15/4/2019
कर्म · 6700
0

महात्मा ज्योतिबा फुले (१८२७-१८९०) हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते.

जन्म: ११ एप्रिल १८२७

मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०

कार्ये:

  • शैक्षणिक कार्य: त्यांनी १८४८ मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
  • सामाजिक कार्य: त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण यांसाठी कार्य केले.
  • लेखन: त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यामध्ये 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा असूड' हे महत्त्वाचे आहेत.

महत्व:

  • ज्योतिबा फुले यांनी समाजातील दुर्बळ घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.
  • शिक्षणाचे महत्व त्यांनी जाणले आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1820

Related Questions

आता कोणतं युग चालू आहे?
एकूण युग किती व कोणकोणते?
सर्वात जुनी भाषा कोणती?
1906 शतकात मुला-मुलीचे लग्न किती वर्षांचे असताना व्हायचे?
1850 च्या दशकात मुलगा व मुलगी किती वर्षांचे असताना लग्न व्हायचे?
सातारा येथील तांबवे येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
मगध नालंदा विद्यापीठ काय आहे?