पोशाख कपडे काळजी

उन्हाळ्यात जीन्स वापरताना कोणती काळजी घ्यावी?

2 उत्तरे
2 answers

उन्हाळ्यात जीन्स वापरताना कोणती काळजी घ्यावी?

1
*👖उन्हाळ्यात जीन्स वापरताय, अशी घ्या काळजी...*


🥵 उन्हाळ्यात बाहेर निघालं की शरीराची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. अशात जर तुम्ही घट्ट जीन्स वापरत असाल, तर जीन्स वापरताना नक्की काळजी घ्या. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना जीन्स-टॉप किंवा टी शर्ट आणि गॉगल लावला असा रफटफ पेहराव तुम्ही करत असाल. तर तुमच्यासाठी थोडं महत्त्वाचं.....

▪👖जीन्स अतिशय घट्ट असेल तर जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. घट्ट जीन्स वापरल्यामुळे त्वचेची जळजळ, त्वचा काळवंडणं, घामोळ्या येणं, खाज सुटणं, काळे चट्टे येणं असे त्रास होऊ शकतात. गेल्या काही दिवसांत घट्ट जीन्समुळे जंतूसंसर्ग झाल्याचं प्रमाण वाढलंय. विशेष म्हणजे खाज कमी करण्यासाठी स्टेरॉईडयुक्त मलम लावलं जातं. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.

▪👕उन्हाळा असल्यास पातळ, सुती कपडे घालणे योग्य आहे. त्यामुळे शरीरीतील घाम शोषूण घेण्यास मदत होते. जाड कपड्यांचा पेहराव शक्यतो करू नये. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय केणतीही क्रिम वापरू नये.

▪🕶 उन्हाळ्यात प्रामुख्याने अतिनील किरणांमुळे डोळ्यांना त्रास होतो. गॉगल काळा असणं गरजेचं आहे. यूव्ही-रेजपासून संरक्षण करणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्ससुद्धा उपलब्ध आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्या शरीराची काळजी नक्की घ्या.
उत्तर लिहिले · 9/4/2019
कर्म · 569225
0

उन्हाळ्यात जीन्स वापरताना घ्यावयाची काळजी:

  • हलक्या रंगाची जीन्स निवडा: गडद रंगाचे जीन्स उष्णता अधिक शोषून घेतात, त्यामुळे हलक्या रंगाचे जीन्स जसे की फिकट निळा रंग, पांढरा रंग किंवा राखाडी रंग निवडा.
  • पातळ डेनिम (Denim)material ची जीन्स निवडा: जाड डेनिम material ची जीन्स टाळा आणि पातळ डेनिम material ची जीन्स निवडा, ज्यामुळे हवा खेळती राहते.
  • सैल जीन्स (Loose jeans) निवडा: Skin tight जीन्स टाळा, कारण त्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि घाम येतो. सैल जीन्स निवडल्यास हवा खेळती राहते.
  • कॉटन (Cotton) मिश्रित जीन्स निवडा: कॉटन मिश्रित जीन्स अधिक आरामदायक असतात आणि ते घाम शोषून घेण्यास मदत करतात.
  • घाम शोषून घेणारे आंतरवस्त्र (Innerwear): जीन्सच्या आत कॉटनचे किंवा घाम शोषून घेणारे आंतरवस्त्र वापरा.
  • जीन्स नियमितपणे धुवा: घामामुळे जीन्सला वास येऊ शकतो, त्यामुळे जीन्स नियमितपणे धुवा.
  • उन्हाळ्यात जीन्स कमी वापरा: शक्य असल्यास उन्हाळ्यात जीन्सचा वापर कमी करा आणि त्याऐवजी हलके कपडे वापरा.
  • पाणी भरपूर प्या: उन्हाळ्यात जीन्स वापरताना जास्त घाम येतो, त्यामुळे शरीराला हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

गर्भ संस्कारासाठी काय करावे?
निवडुंगाच्या भोवतीच्या पिशवीच्या कशा?
पालतू प्राणियों की की जानेवाली देखभाल के बारे मे अपने विचार स्पष्ट कीजिए?
लहान मुले अंगात बंडी का घालत असतात?
आमच्या मांजराच्या केसांना तेल लागले आहे, ते कसे काढायचे?
आजारपणात आपली देखभाल कोण करते?
बकरीचे पिल्लू दूध बाहेर ओकत आहे, काय करावे?